लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : शेतकरी आणि ग्रामीण भागातील लोकांच्या प्रश्नावर राज्यभर काम करणाऱ्या भूमिपुत्र संघर्ष वाहिनी २०१८ ची राज्यकार्यकारिणी गठीत करण्यात आली. अध्यक्षपदी अभिजीत फाळके तर संयोजकपदी रितेश घोगरे यांची निवड करण्यात आली आहे. कार्यकारणीमध्ये महाराष्ट्रातील १२ जिल्ह्यातील शेतकरीपुत्रांचा समावेश करण्यात आला आहे.अध्यक्ष म्हणून अभिजीत फाळके- पाटील, वर्धा, शिवकुमारजी चांडक बुलढाणा, अविनाश जोगदंड, वाशीम - संयोजक, अमिताभ पावडे , नागपूर धनंजय ठाकरे ,बुलढाणा , प्रा. विजय घायाळ , बुलढाणा, तेजस्वी बारब्दे अमरावती , दीपक देशमुख, अमरावती रितेश घोगरे ,वर्धा ,विपुल देशमुख , अकोला, मिलिंद बागल ,नगर, योगेश देशमुख ,अकोला, अनुप भुतडा ,नाशिक, मिथुन मोंढे, यवतमाळ संतोष उमाटे , नांदेड ,बालाजी हेंद्रे, नांदेड, करण ढेकले, यवतमाळ यांची निवड करण्यात आली आहे.२०१८ - १९ हा निवडणुकीचा काळ आहे तेव्हा या वर्षात शेतकऱ्यांनी अतिशय कणखर भूमिका घेवून आपल्या मागण्या पूर्ण करून घ्याव्यात असे आवाहन करण्यात आले आहे. चळवळीची भविष्यातील दिशा ठरवण्याचे आणि आपल्या भागात संगठण उभे करण्याचे महत्वपूर्ण काम ही नवीन टीम नव्या जोमाने करेल असा विश्वास भूमिपुत्र संघर्ष वाहीनीचे अध्यक्ष अभिजीत फाळके- पाटील यांनी व्यक्त केला. २०१५ मध्ये भूमिपूत्र संघर्ष वाहिनीची स्थापना करण्यात आली होती. मागील तीन वर्षांत जवळपास आठ आंदोलने संघटनेच्या वतीने करण्यात आले. शेतकºयांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी भूमिपुत्रांच्या मुलांनी एकत्र येवून ही संघटना काम करीत आहे. शेतकºयांच्या हक्कासाठी हा लढा भविष्यात तीव्र करण्यात येईल, असे फाळके यांनी म्हटले आहे.
भूमिपुत्र संघर्ष वाहिनीची राज्य कार्यकारिणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2018 10:25 PM
शेतकरी आणि ग्रामीण भागातील लोकांच्या प्रश्नावर राज्यभर काम करणाऱ्या भूमिपुत्र संघर्ष वाहिनी २०१८ ची राज्यकार्यकारिणी गठीत करण्यात आली. अध्यक्षपदी अभिजीत फाळके तर संयोजकपदी रितेश घोगरे यांची निवड करण्यात आली आहे. कार्यकारणीमध्ये महाराष्ट्रातील १२ जिल्ह्यातील शेतकरीपुत्रांचा समावेश करण्यात आला आहे.
ठळक मुद्देमहाराष्ट्र अध्यक्षपदी फाळके तर संयोजकपदी घोगरे