शहरं
Join us  
Trending Stories
1
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
2
"तुम्हाला आत टाकणार"; आदित्य ठाकरेंचा सदा सरवणकरांना भरसभेत इशारा
3
आधी २ 'बदक' आता 'पदक' मिळवणारी सेंच्युरी! संजूनं मोडला KL राहुलचा रेकॉर्ड
4
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
5
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
6
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
7
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
8
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
9
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
10
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
11
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
12
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
13
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
14
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
15
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
16
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
17
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
18
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
19
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
20
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!

पुलगावात आकार घेताहेत गणरायांच्या मूर्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2019 11:28 PM

एकेकाळी प्रसिद्धीस आलेल्या पुलगावच्या गणेशोत्सवात सध्या काही प्रमाणात उदासीनता असली तरीही सार्वजनिक गणेशोत्सवाचे सातत्य अजूनही कायम आहे. शहरामध्ये साधारणत: १५ सार्वजनिक मंडळे असून जवळपास सात हजार घरगुती गणरायाची स्थापना केली जाते.

ठळक मुद्देसार्वजनिक गणेशोत्सवाचा उत्साह कायम : शहरात दोन कोटींची होतेय उलाढाल

प्रभाकर शहाकार।लोकमत न्यूज नेटवर्कपुलगाव : एकेकाळी प्रसिद्धीस आलेल्या पुलगावच्या गणेशोत्सवात सध्या काही प्रमाणात उदासीनता असली तरीही सार्वजनिक गणेशोत्सवाचे सातत्य अजूनही कायम आहे. शहरामध्ये साधारणत: १५ सार्वजनिक मंडळे असून जवळपास सात हजार घरगुती गणरायाची स्थापना केली जाते. या उत्सवात शहरामध्ये २ कोटीच्या आसपास उलाढाल होत असल्याने गणरायाच्या आकर्षक मूर्ती साकारण्याच्या कामाला जोर चढला आहे.महाराष्ट्राचे लाडके दैवत असलेल्या बाप्पाच्या आगमनासाठी आता पंधरवडा शिल्लक आहे. त्यामुळे शहरातील १५ मुर्तिकारांकडे गणरायाच्या जवळपास सात हजार लहान-मोठ्या मूर्ती आकार घेत आहे. मुर्तिकरिता लागणारी माती, साहित्य, रंग यामध्ये झालेली भाववाढ व प्लास्टर आॅफ पॅरिसच्या मुर्तिवरील निर्बंध तसेच मजुरीचे वाढलेले दर या समस्यांचा सामना करीत मुर्तिकार विघ्नहर्त्यांची विविध आकारात, विविध रंगात व मुद्रेत मूर्ती साकारण्यासाठी दिवसरात्र धडपडत आहे. या मातीकला व्यवसायातून शहरातील २०० बेरोजगारांच्या हातांना काम मिळाले असून मुर्तिकार वडिलोपार्जीत व्यवसायाचा वारसा जोपासत आहे.मूर्ती कलेच्या क्षेत्रात वारसा जतन करणारे कुंभारपुऱ्यातील गाते कुटुंबीय, राजू ठाकरे, बबलू राठोड, प्रजापती ठाकूर व इतर मंडळीसुद्धा मूर्ती साकारण्यात व्यस्त आहे. पुलगाव परिसरात शहरी व ग्रामीण भागात जवळपास ६० सार्वजनिक गणेशाची स्थापना केली जाते.सात गावात एक गाव एक गणपती बसविला जातो. आता या बाप्पाची तयारी जोरात सुरु झाली असून रस्त्यावरील खड्डे, भारनियमन, नदी पात्राचे प्रदुषण व सुरक्षा व्यवस्था याकरिता पोलीस प्रशासन व नगरपालिका मोठ्या जोमाने कामाला लागली आहे.इंगळे परिवार जोपासतोय तीन पिढ्यांचा वारसाशंभर वर्षांची परंपरा असलेला पुलगाव कॉटन मिलचा गणेशोत्सव तीन दशकापूर्वी व्यवस्थापनाच्या उदासीन धोरणामुळे इतिहासजमा झाला. परंतु यानंतरही ५० वर्षांपासून काम करणारी सार्वजनिक मंडळे बाप्पाच्या उत्सवाचे सातत्य राखून आहे. त्याकाळी गणेशमूर्तींच्या निर्मितीसाठी हरिरामनगरातील नागोराव इंगळे व परिवाराची ओळख होती. यानंतर मारोतराव व सुरेश या दोन मुलांनी हा वारसा पुढे चालू ठेवला तर आता मागील ५ ते ६ वर्षांपासून स्वप्निल व निखिल हे दोघे बंधू इंगळे परिवारातील तिसºया पिढीचा वारसा चालवित आहे. यावर्षी त्यांच्याकडे २५ मोठ्या मूर्तींचे बुकींग असून १२ फुटांची रामदरबार गणेशाची मूर्ती सार्वजनिक गणेश मंडळासाठी सज्ज होत आहे.आनंद मेळावा घालतो उत्साहात भरपुलगावच्या बाजारपेठेत गणेशोत्सवासाठी बडनेरा, अमरावती, धामणगाव, तळेगाव, नागपूर, वर्धा येथून गणेश मूर्ती विक्रीसाठी येतात. तसेच सजावटीच्या साहित्याचाही मोठा बाजार भरतो. त्यामुळे या उत्सवात २ कोटींची आर्थिक उलाढाल होते. तसेच उत्सावाच्या दहा दिवस शहरात आनंदमेळा लागत असून या मेळ्यातूनही ४ ते ५ कोटीची कमाई केली जात असल्याचे बोलेले जाते.

टॅग्स :Ganpati Festivalगणेशोत्सव