लोकमत न्यूज नेटवर्कआर्वी : अंबिकापूर पुनर्वसन ते भाईपूर पुनर्वसन पर्यंतच्या तीन किमीच्या रस्त्याची दैनावस्था झाली आहे. यामुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. नागरिकांची समस्या लक्षात घेता या मार्गाचे तात्काळ सिमेंटीकरण करण्यात यावे, अशी मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सादर केलेल्या निवेदनातून करण्यात आली आहे.गत अनेक वर्षांपासून दुर्लक्षीत असलेला अंबिकापूर ते भाईपूर हा तीन कि.मी.चा रस्ता सरकारने गुळगुळीत करून दिल्यास आर्वी ही बाजारपेठ गाठण्यासाठी अंबिकापूर येथील शेतकºयांसह नागरिकांचा वेळ व फेरा वाचनार आहे. याच रस्त्यावर गावातील अनेक प्रकल्पग्रस्तांच्या शेजजमिनी असून त्यांनाही याचा फायदा होणार आहे. तेथील रहिवाशांना आर्वी ही बाजारपेठ गाठण्यासाठी सुमारे १३ किमीच्या फेºयाचा प्रवास सध्या करावा लागत आहे. या गावातील सुमारे ५० विद्यार्थी दररोज आर्वी शहरात शिक्षणाकरिता ये-जा करतात. त्यांनाही सध्या नाहक त्रास सहन करावा लागत आहे.आर्वी हे तालुक्याचे ठिकाण असल्याने प्रत्येक कामासाठी या गावातील नागरिकांना येथे यावे लागते. वि. पा. वि. मंडळाने कुठलाही विचार न करता व गावातील नागरिकांना विश्वासात न घेता १३ किमी अंतराचा रस्ता या गावातील लोकांच्या वहिवाटीसाठी तयार केला. परंतु, तो मार्ग सध्या अडचणी वाढविणाराच ठरत आहे, असे निवेदनात नमुद करण्यात आले आहे. सदर प्रकरण ग्रामस्थांनी माजी आमदार दादाराव केचे यांच्या निदर्शनास आणून दिली असता त्याच्या नेतृत्त्वात ग्रामस्थांनी नागपूर येथील हिवाळी अधिवेशन गाठून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सदर मागणीचे निवेदन सादर केले.यावेळी झालेल्या चर्चेअंती नागरिकांच्या शिष्टमंडळाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सदर प्रकरणी तात्काळ योग्य कार्यवाही करून तेथील रहिवाशांना दिलासा देण्यात येईल, असे आश्वासन दिले. निवेदन देताना माजी आमदार दादाराव केचे यांच्यासह राजु कदम, प्रमोद चौहान, रामदास कडु, रामेश्वर खोंडे, रितेश बोके, मारोतराव खोंडे, सुकेश खोंडे, विठ्ठल गवळीकर आदींची उपस्थिती होती.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करताना माजी आमदार दादाराव केचे यांनी अंबिकापूर परिसरातील नागरिकांची समस्या प्रभाविपणे मांडली. मुख्यमंत्री फडणवीस यांनी योग्य कार्यवाहीचे आश्वासन दिल्याने तेथील रहिवाशांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत.
रस्त्यासाठी मुख्यमंत्र्यांना साकडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 24, 2017 11:35 PM
अंबिकापूर पुनर्वसन ते भाईपूर पुनर्वसन पर्यंतच्या तीन किमीच्या रस्त्याची दैनावस्था झाली आहे. यामुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. नागरिकांची समस्या लक्षात घेता या मार्गाचे तात्काळ सिमेंटीकरण करण्यात यावे,.....
ठळक मुद्देतीन किमीचा मार्ग दुरूस्तीच्या प्रतीक्षेत : तत्काळ कार्यवाहीची मागणी