वर्धा : वनस्पतीचा रस, जवळ असलेली राख व मंत्रोपचाराचा वापर करून किडलेल्या दातातील किडा कानातून काढणाऱ्या भोंदूबाबाला सेवाग्राम पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याववर जादूटोणा विरोधी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई शनिवारी रात्री सेवाग्राम-पवनार मार्गावरील रेल्वे फाटकानजीक करण्यात आली. रज्जूलाल पटेल असे या भोंदूबाबाचे नाव नाव असल्याचे पोलिसांनी सांगितले. पोलीस सुत्रानुसार, वर्धेतील हेमंत वाकडे हा दाताच्या दुखण्याकरिता सेवागाम रुग्णालयात गेला होता. यावेळी त्याला एका इसमाने पवनार-सेवाग्राम मार्गावरील रेल्वे फाटकानजीक एक बाबा वनस्पतीच्या सहायाने दाताची किडा काढत असल्याचे सांगितले. यावरून हेमंत तिथे गेला असता त्याच्यावर हा प्रयोग करण्यात आला. यावेळी त्या भोंदूबाबाने हेमंतच्या कानात एका वनस्पतीचा रस टाकत जवळील राख त्याच्या दुखणाऱ्या दाताला लावली. यानंतर तोच प्रकर दुसऱ्या कानात करून दोन मोठे किडे काढून दाखविले. याकरिता त्याने २०० रुपये घेतले. दात दुरूस्तीत मंत्रोपचार४फाटकाजवळ वास्तव्यास असलेला हा भोंदूबाबा दातदुखी रोखण्याकरिता स्वत:जवळ असलेली राख लावून मंत्रोपचाराचा वापर करण्यात येत असल्याचे समोर आले. यामुळे हा प्रकार अंधश्रद्धेचा ठरत असल्याने पोलिसांकडून कारवाई करण्यात आल्याचे सांगण्यात आले.
दातातील किडे कानातून काढणाऱ्या भोंदूबाबाला अटक
By admin | Published: April 04, 2016 5:17 AM