कामगारांच्या मागण्यांचा तिढा कायमलोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : शहरानजीकच्या वायगाव (नि.) शिवारातील संस्कार अॅग्रो प्रोसेसमधील कामगाराला कुठलीही पूर्व सूचना न देता कामावरून कमी करण्यात आले. सदर कामगाराला तात्काळ कामावर घेण्यात यावे या मुख्य मागणीसह विविध मागण्यांसाठी रविवार ७ मे पासून संस्कार अॅग्रोप्रोसेसमधील कामगारांनी कामबंद आंदोलन सुरू केले आहे. सोमवार १५ रोजी कामबंद आंदोलनाच्या आठव्या दिवशीही कामगारांच्या मागण्यांवर समाधानकारक तोडगा न निघाल्याने हे आंदोलन सुरूच होते. कुठलीही पूर्व सूचना न देता सदर कंपनी प्रशासनाने जवळपास ४० कामगारांना कामावरून कमी केल्याचा आरोप करीत हा प्रकार कामगारांवर अन्याय करणारा असल्याचे आंदोलनकर्त्यांचे म्हणणे आहे. कुठलीही सुचना न देता कामावरून कमी करण्यात आलेल्या कामगारांना तात्काळ कामावर घेण्याच्या मागणीसाठी सोमवार ७ मे पासून प्रहारच्या नेतृत्त्वात कंपनीतील जवळपास ३५० कामगारांनी कामबंद आंदोलन सुरू केले आहे. या आंदोलनाचे नेतृत्त्व प्रहारचे गजु कुबडे, शहर प्रमुख विकास दांडगे करीत असून आंदोलनात दादा बोरकर, प्रशांत घोडखांदे, नितीन काटकर, उमेश ठाकरे, सुधाकर भोमले, दिवाकर भोभरे, राजु सेलेकर, प्रशांत वेले, ज्योती यादव, वंदना भोयर आदी सहभागी झाले आहे.भरायला लावला फॉर्मसंस्कार अॅग्रो प्रोसेसमधील चार कामगारांचे प्रकरण कामगार न्यायालयात न्यायप्रविष्ट आहे. शुक्रवार १२ मे ला सदर चार कामगार वगळता इतर सर्व कामगारांना कामावर घेण्यात यावे, असे निर्देश कामगार न्यायालयाने दिले होते. त्या अनुषंगाने १३ मे ला कामगार कामावर गेले असता कामगारांना एक फार्म भरून देण्यास सांगण्यात आले. परंतु, कंपनी प्रशासनाचा हा प्रकार न्यायालयाच्या आदेशाला बगल देणारा असल्याचा आरोप करीत कामगार कामावर रुजू झाले नाही.
आंदोलन सुरूच
By admin | Published: May 16, 2017 2:51 AM