लोकमत न्यूज नेटवर्कगिरड : विदर्भातील प्रसिद्ध बाबा फरीद दर्गा टेकडी व शक्करबाहुली हजरत शेख फरीद दर्गाह येथे येणारे हजारो भाविक आपली कामना पूर्ण होताच येथे पशुबळी देतात. ही प्रथा फार पूर्वीपासून आहे. या प्रथेमुळे दरवर्षी लाखो निर्दोष पशुची हत्या होते. ही पशुहत्या थांबवावी, अशी मागणी गुरुदेव सेवा मंडळ, विश्व हिंदू परिषद व युवकांनी केली. याबाबत गिरड ग्रा.पं. च्या ग्रामसभेत सर्वसंमतीने ठरावही पारित करण्यात आला.मागील कित्येक वर्षांपासून प्रथा म्हणून गिरड येथील फरीद बाबा तथा शक्करबाहुली दर्गाह येथे पशुबळी दिला जात आहे. मनोकामना पूर्ण झाली की, भाविक पशुबळी देतात. यामुळे पशुंची नाहक हत्या होते. ही पशुबळी प्रथा थांबविण्याकरिता थेट २ आॅक्टोबरला झालेल्या ग्रा.पं. च्या ग्रामसभेत सर्वसंमतीने बंद करण्याचा ठराव पारित करण्यात आला. ठरावाची प्रत जिल्हाधिकारी शैलेश नवाल, जिल्हा वनपरीश्रेत्र अधिकारी दिगंबर पगार यांना देण्यात आली. या ठरावाची त्वरित दखल घेत पशुबळीची पद्धत कायमस्वरुपी बंद करावी, अशी मागणी करण्यता आली. ठरावाच्या प्रती देताना विष्व हिंदू परिषदेचे मंगेश गिरडे, गुरुदेव सेवा मंडळाचे बबन दाभणे, संदीप शिवणकर, निलेश पिंजरकर यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
बाबा दर्गा टेकडी व शक्करबाहुली येथील पशुबळी थांबवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 09, 2017 12:08 AM
विदर्भातील प्रसिद्ध बाबा फरीद दर्गा टेकडी व शक्करबाहुली हजरत शेख फरीद दर्गाह येथे येणारे हजारो भाविक आपली कामना पूर्ण होताच येथे पशुबळी देतात.
ठळक मुद्देग्रामस्थांची मागणी : ग्रामसभेत सर्वसंमतीने ठराव