लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : जिल्ह्यात पाणी संकट गडद होत असल्याने बांधकामासह पाण्याशी संबंध येणाऱ्या कामांना पावसाळ्यापर्यंत थांबा देण्यात यावा. तसेच पाणी टंचाईची समस्या पुन्हा निर्माण होऊ नये याकरिता प्रत्येक ग्रामपंचायतींनी घरोघरी जल पुनर्भरणाची अंमलबजावणी करावी, यावर निर्णय घेण्यासाठी सोमवारी जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत चर्चा घेण्यात आली.निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे दोन महिन्यानंतर सोमवारी सर्वसाधारण सभेत तब्बल ६ तास ‘पाणीदार’ चर्चा झाली. यासभेला जि.प. अध्यक्ष नितीन मडावी, उपाध्यक्ष कांचन नांदूरकर, मुख्य कार्यपालन अधिकारी डॉ. सचिन आेंबासे, उपमुख्य कार्यपालन अधिकारी विवेक इलमे, विपूल जाधव, लेखाधिकारी शेळके व सभापती मुकेश भिसे, जयश्री गफाट, सोनाली कलोडे, नीता गजाम यांची उपस्थिती होती. या सभेदरम्यान जिल्ह्यात पाणी टंचाई उपाययोजने अंतर्गत टप्पा दोन व तीनमध्ये मंजूर असलेल्या कामांना तत्काळ गती देऊन ती कामे एप्रिलच्या अखेरपर्यंत पूर्ण करावे व उर्वरित जून महिन्याच्या आत पूर्ण करण्याच्या सूचना संबंधित विभागाला देण्यात आल्या. सेलसुरा येथील पाणीपुरवठ्याची विहीर महामार्गात गेल्यामुळे त्या ठिकाणी पर्यायी व्यवस्था म्हणून विंधन विहीर किंवा इतर सुविधा उपलब्ध करुन द्यावी तसेच वायगाव येथील आॅक्सिजन पार्कसाठी पाण्याची सोय करुन द्यावी, अशी मागणी जि.प. सदस्य चंद्रकांत ठक्कर यांनी केली. पिपरी (मेघे) व वरुड या गावांमध्ये आठ ते पंधरा दिवसाआड पाणीपुरवठा होत असल्याने यावर उपाययोजना करण्याची मागणी शिंदे व धनवीज यांनी केली. आष्टा येथे राष्ट्रीय पेयजल योजनेअंतर्गत मंजूर झालेल्या कामांना गती देण्याची मागणी तरोडा सर्कलच्या सदस्या उज्ज्वला देशमुख यांनी केली. तर ग्रामीण भागातील जनावरांना पाणी मिळण्यासाठी ज्या शेतकऱ्यांच्या विहिरीला मुबलक पाणी आहे, अशा शेतकºयांना अनुदान देत पाण्याचे तळे बनिवण्याची योजना अमलात आणण्याची मागणी लाखे यांनी केली.पाणी टंचाई लक्षात घेता बांधकामांना पावसाळ्यापर्यंत स्थगिती देण्याचा निर्णय घेतला आहे. टंचाई संदर्भात सभागृहात सदस्यांनी केलेल्या सूचनांनुसार आराखडा तयार करण्यात येईल. त्यानुसार उपाययोजना सुरु केल्या जाईल. निधीची कमतरता भासल्यास शासन व पालकमंत्र्यांकडे विशेष किंवा अतिरिक्त निधीची मागणी करण्यात येईल.नितीन मडावी, अध्यक्ष, जि.प., वर्धा
पावसाळ्यापर्यंत बांधकामांना थांबा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 15, 2019 9:43 PM
जिल्ह्यात पाणी संकट गडद होत असल्याने बांधकामासह पाण्याशी संबंध येणाऱ्या कामांना पावसाळ्यापर्यंत थांबा देण्यात यावा. तसेच पाणी टंचाईची समस्या पुन्हा निर्माण होऊ नये याकरिता प्रत्येक ग्रामपंचायतींनी घरोघरी जल पुनर्भरणाची अंमलबजावणी करावी, यावर निर्णय घेण्यासाठी सोमवारी जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत चर्चा घेण्यात आली.
ठळक मुद्दे‘झेडपी’त चर्चा : सर्वसाधारण सभेत ६ तास ‘पाणीदार’ चर्चा