आर्वी पालिकेतील जनतेची लूट थांबवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 5, 2018 11:56 PM2018-12-05T23:56:33+5:302018-12-05T23:57:10+5:30
युवा स्वाभिमान पार्टीच्या पदाधिकाऱ्यांनी कॉग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण व जनसंघर्ष यात्रेत आलेल्या नेत्यांची भेट घेऊन आर्वी नगर पालिकेत होत असलेली जनतेची लूट थांबविण्यासाठी कॉँॅग्रेसने नगर विकास खात्यावर रेटा वाढवावा अशी मागणी केली.
लोकमत न्यूज नेटवर्क
आर्वी : युवा स्वाभिमान पार्टीच्या पदाधिकाऱ्यांनी कॉग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण व जनसंघर्ष यात्रेत आलेल्या नेत्यांची भेट घेऊन आर्वी नगर पालिकेत होत असलेली जनतेची लूट थांबविण्यासाठी कॉँॅग्रेसने नगर विकास खात्यावर रेटा वाढवावा अशी मागणी केली.
मंगळवारी विदर्भात चौथ्या टप्प्यात जनसंघर्ष यात्रा आर्वीत आली त्यावेळी आमदार अमर काळे यांच्या निवासस्थानी युवा स्वाभिमान पार्टीच्या कार्यकर्त्यांनी विधानसभा अध्यक्ष दिलीप पोटफोडे यांच्या नेतृत्वात अशोक चव्हाण यांची भेट घेतली व त्यांना निवेदन सादर करून त्यांच्याशी चर्चा केली. यावेळी युवा स्वाभिमानच्या पदाधिकाºयांनी माहिती देताना सांगितले की, आर्वी शहरात शत प्रतिशत १०० टक्के सत्ता भाजपची आहे. या पालिकेत १०० टक्के भ्रष्टाचाराची लागण झाली आहे. गैरप्रकाराची एकही संधी सत्ताधारी सोडत नसून आर्वी शहराची खुल्ली लूट सध्यास्थितीत नगर परिषदकडून सुरु आहे. यात प्रामुख्याने आरोग्य विभाग अग्रक्रमावर आहे. आर्वी शहरात सुरु असलेला घनकचरा संकलन व प्रक्रिया कंत्राटात महिन्या काठी लाखोंचा भ्रष्टाचार होत आहे. ज्या अटी शर्थीवर कंत्राटदाराला कंत्राट देण्यात आला होता त्याची शुन्य टक्के पूर्तता न करता लाखो रुपयांची अवाजवी बिल मात्र नियमांना बगल देऊन नियमांना धाब्यावर बसवून केली जात आहे. वेगवेगळ्या प्रकारे मजीर्तील कंत्राटदाराला फायदा पोहचवून सत्ताधारी स्वत: चा विकास साधत आहे. तसेच स्वच्छ सर्वेक्षण उपक्रमात सत्ताधाºयांनी अधिकाºयांंना हाताशी धरून संगणमत करून लाखोंचा गंडा घातल्या गेल्याचे निवेदनात नमूद केले आहे. आर्वी शहरात जवळपास १० लोकांचे मृत्यू डेंग्यूमुळे झाले परंतु फॉगिंग मशीनव्दारे फवारणी किंवा डेंग्यूवर प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यासाठी पालिका सपशेल अपयशी ठरली. बांधकाम विभाग सुद्धा कुठे गैरप्रकारात कमी दिसत नसल्याचा दावा यांनी केला. आर्वी न प बांधकाम विभागात प्रचंड अनियमितता असून ठरलेल्या कंत्राटदारनाच काम देण्यासाठी बांधकाम विभागाची पायपीट सुरु असते, नियमांना डावलून अनावश्यक अटी टाकल्या जाते. कर विभागाला सोबत घेऊन आर्वी नगर परिषदने आणखी नवीन प्रताप सतेत आल्यापासून सुरु केला आहे. न. प अधिकार क्षेत्रात येणाºया मोक्याच्या जागा सत्ताधारी पदाधिकारी, नगरसेवक घशात घालत असून अवैध रित्या अनेक नगरसेवक व पदाधिकाºयांंनी दुकाने, गाळे सुद्धा स्वत:च्या ताब्यात घेतले आहे. विरोधी पक्ष म्हणून तसेच आर्वी शहराला भ्रष्टाचारापासून मुक्ती देण्यासाठी काँग्रेस पक्षाच्यावतीने मुद्दे लावून धरण्यात यावे अशी मागणी खासदार अशोक चव्हाण यांच्याकडे युवा स्वाभिमानी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी लावून धरली. यावर सकारात्मक प्रतिसाद देत नगरविकास खात्याला धारेवर धरून सदर प्रकार मुख्यमंत्र्याच्या निदर्शनास आणून देण्याची ग्वाही यावेळी खासदार चव्हाण यांनी दिली. आमदार अमर काळे यांनी सुद्धा लक्ष घालून पाठपुरावा करू असे आश्वासन दिले. यावेळी निवेदन देताना विधानसभा अध्यक्ष दिलीप पोटफोडे, तालुका अध्यक्ष नितीन मनवर , शहर अध्यक्ष कमलेश चिंधेकर, राहुल विरेकर राजू राठोड, अजय इंगळे राजु बोरकुटे वासुदेव सपकाळ, विशाल जाधव, मंगेश लांजेवार, सिद्धांत कलंबे, अमोल बेलेकर, निखिल वानखेडे, अक्षय काटनकर ,बादल काळे व स्वाभिमानी कार्यकर्ते उपस्थित होते.