शहरं
Join us  
Trending Stories
1
संजय शिरसाट यांच्या लेकाच्या वाहनावर हल्ला; उद्धव ठाकरे गटाच्या उमेदवारावर आरोप
2
बारामतीत हाय व्होल्टेज सामना: अजित पवारांनी बजावला मतदानाचा हक्क, मताधिक्याविषयी म्हणाले...
3
मुंबईत घरभाड्याचे दर देशात सर्वाधिक; दिल्ली दुसऱ्या क्रमांकावर, ठाण्यात किती भाडेवाढ?
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live : अजित पवारांसह अनेकांनी बजावला मतदानाचा हक्क; अनेक ठिकाणी ‘ईव्हीएम’मध्ये बिघाड!
5
A.R.Rahman divorce: "आम्हाला वाटलं होतं ३० वर्ष पूर्ण करू, पण...", ए. आर. रहमानचा २९ वर्षांचा संसार मोडला
6
केवळ शॉपिंग नाही, आता कमाई पण करून देणार 'ही' कंपनी; येणार ₹८००० कोटींचा बहुप्रतीक्षीत IPO
7
मुंबई, ठाण्यात ठाकरे, शिंदेंची प्रतिष्ठा पणाला! ठाकरे बंधूंच्या मतदारसंघांकडे लक्ष
8
पराभव दिसू लागल्यानेच मविआकडून तावडेंवर हल्ला; देवेंद्र फडणवीसांचा आरोप
9
जनसुराज्य शक्ती पक्षाचे उमेदवार पादेश्वर महाराजांच्या गाडीवर दगडफेक; महाराज जखमी
10
नालासोपाऱ्यात कॅश ड्रामा! पैसे वाटपाच्या आरोपांवरून विनोद तावडेंना घेरले; तीन गुन्हे दाखल
11
जगभर : मुजतबा खामेनेई : ‘शांत’ डोक्याचा ‘सुप्रीम लीडर’!
12
Vaibhav Suryavanshi: १३ वर्षांच्या मुलाला उघडेल आयपीएलचं दार?
13
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: सकाळची वेळ नवीन कार्यारंभासाठी अनुकूल!
14
टक्का वाढला पाहिजे..! सर्वोच्च अधिकार नाकारून कसे चालेल...?
15
Maharashtra Assembly elections 2024: कोणत्या मुद्द्यांभोवती फिरली प्रचारचक्रे ? 
16
विशेष लेख: ‘अर्बन नक्षल’- भाजपच्या मानगुटीवरचे भूत 
17
नरेंद्र मोदी, राहुल गांधी, ठाकरे करणार कोथरुडात मतदान; नामसाधर्म्यामुळे प्रशासनाची धावपळ
18
नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी आज मतदान; काँग्रेस-भाजपमध्ये लढत 
19
झारखंड : दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला; अंतिम टप्प्याचे आज ३८ जागांवर मतदान
20
वाशिम येथे मतदानास सुरुवात; मतदारांना मिळतेय सहकार्य

आर्वी पालिकेतील जनतेची लूट थांबवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 05, 2018 11:56 PM

युवा स्वाभिमान पार्टीच्या पदाधिकाऱ्यांनी कॉग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण व जनसंघर्ष यात्रेत आलेल्या नेत्यांची भेट घेऊन आर्वी नगर पालिकेत होत असलेली जनतेची लूट थांबविण्यासाठी कॉँॅग्रेसने नगर विकास खात्यावर रेटा वाढवावा अशी मागणी केली.

ठळक मुद्देकॉग्रेस प्रदेशाध्यक्षांना निवेदन : सरकारवर दबाव आणा

लोकमत न्यूज नेटवर्कआर्वी : युवा स्वाभिमान पार्टीच्या पदाधिकाऱ्यांनी कॉग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण व जनसंघर्ष यात्रेत आलेल्या नेत्यांची भेट घेऊन आर्वी नगर पालिकेत होत असलेली जनतेची लूट थांबविण्यासाठी कॉँॅग्रेसने नगर विकास खात्यावर रेटा वाढवावा अशी मागणी केली.मंगळवारी विदर्भात चौथ्या टप्प्यात जनसंघर्ष यात्रा आर्वीत आली त्यावेळी आमदार अमर काळे यांच्या निवासस्थानी युवा स्वाभिमान पार्टीच्या कार्यकर्त्यांनी विधानसभा अध्यक्ष दिलीप पोटफोडे यांच्या नेतृत्वात अशोक चव्हाण यांची भेट घेतली व त्यांना निवेदन सादर करून त्यांच्याशी चर्चा केली. यावेळी युवा स्वाभिमानच्या पदाधिकाºयांनी माहिती देताना सांगितले की, आर्वी शहरात शत प्रतिशत १०० टक्के सत्ता भाजपची आहे. या पालिकेत १०० टक्के भ्रष्टाचाराची लागण झाली आहे. गैरप्रकाराची एकही संधी सत्ताधारी सोडत नसून आर्वी शहराची खुल्ली लूट सध्यास्थितीत नगर परिषदकडून सुरु आहे. यात प्रामुख्याने आरोग्य विभाग अग्रक्रमावर आहे. आर्वी शहरात सुरु असलेला घनकचरा संकलन व प्रक्रिया कंत्राटात महिन्या काठी लाखोंचा भ्रष्टाचार होत आहे. ज्या अटी शर्थीवर कंत्राटदाराला कंत्राट देण्यात आला होता त्याची शुन्य टक्के पूर्तता न करता लाखो रुपयांची अवाजवी बिल मात्र नियमांना बगल देऊन नियमांना धाब्यावर बसवून केली जात आहे. वेगवेगळ्या प्रकारे मजीर्तील कंत्राटदाराला फायदा पोहचवून सत्ताधारी स्वत: चा विकास साधत आहे. तसेच स्वच्छ सर्वेक्षण उपक्रमात सत्ताधाºयांनी अधिकाºयांंना हाताशी धरून संगणमत करून लाखोंचा गंडा घातल्या गेल्याचे निवेदनात नमूद केले आहे. आर्वी शहरात जवळपास १० लोकांचे मृत्यू डेंग्यूमुळे झाले परंतु फॉगिंग मशीनव्दारे फवारणी किंवा डेंग्यूवर प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यासाठी पालिका सपशेल अपयशी ठरली. बांधकाम विभाग सुद्धा कुठे गैरप्रकारात कमी दिसत नसल्याचा दावा यांनी केला. आर्वी न प बांधकाम विभागात प्रचंड अनियमितता असून ठरलेल्या कंत्राटदारनाच काम देण्यासाठी बांधकाम विभागाची पायपीट सुरु असते, नियमांना डावलून अनावश्यक अटी टाकल्या जाते. कर विभागाला सोबत घेऊन आर्वी नगर परिषदने आणखी नवीन प्रताप सतेत आल्यापासून सुरु केला आहे. न. प अधिकार क्षेत्रात येणाºया मोक्याच्या जागा सत्ताधारी पदाधिकारी, नगरसेवक घशात घालत असून अवैध रित्या अनेक नगरसेवक व पदाधिकाºयांंनी दुकाने, गाळे सुद्धा स्वत:च्या ताब्यात घेतले आहे. विरोधी पक्ष म्हणून तसेच आर्वी शहराला भ्रष्टाचारापासून मुक्ती देण्यासाठी काँग्रेस पक्षाच्यावतीने मुद्दे लावून धरण्यात यावे अशी मागणी खासदार अशोक चव्हाण यांच्याकडे युवा स्वाभिमानी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी लावून धरली. यावर सकारात्मक प्रतिसाद देत नगरविकास खात्याला धारेवर धरून सदर प्रकार मुख्यमंत्र्याच्या निदर्शनास आणून देण्याची ग्वाही यावेळी खासदार चव्हाण यांनी दिली. आमदार अमर काळे यांनी सुद्धा लक्ष घालून पाठपुरावा करू असे आश्वासन दिले. यावेळी निवेदन देताना विधानसभा अध्यक्ष दिलीप पोटफोडे, तालुका अध्यक्ष नितीन मनवर , शहर अध्यक्ष कमलेश चिंधेकर, राहुल विरेकर राजू राठोड, अजय इंगळे राजु बोरकुटे वासुदेव सपकाळ, विशाल जाधव, मंगेश लांजेवार, सिद्धांत कलंबे, अमोल बेलेकर, निखिल वानखेडे, अक्षय काटनकर ,बादल काळे व स्वाभिमानी कार्यकर्ते उपस्थित होते.

टॅग्स :Ashok Chavanअशोक चव्हाणcongressकाँग्रेस