लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : स्थानिक ठाकरे मार्केट भागातील शिवसेना कार्यालयातून काढण्यात आलेला शिवसैनिक व शेतकऱ्यांचा मोर्चा बजाज चौकात पोहोचताच रस्ता रोको आंदोलन करण्यात आले. तब्बल तासभर हे आंदोलन सुरू राहिल्याने वाहतूक खोळंबली होती. या आंदोलनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या विविध मागण्या रेटून धरण्यात आल्या. आंदोलनादरम्यान जिल्हाधिकाऱ्यांमार्फत नायब तहसीलदार विलास कातोरे यांनी निवेदन स्वीकारले.छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना जाहीर करून एक वर्षाचा कालावधी होत आहे; पण अद्यापही अनेक शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळाला नाही. शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ देण्यात यावा. विविध बँका शेतकऱ्यांना पीक कर्ज देण्यास टाळाटाळ करीत आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या अडचणीत भर पडली असून बँकांच्या अधिकाºयांना पीक कर्ज वितरणाबाबत स्पष्ट निर्देश द्यावे. गतवर्षी गुलाबी बोंडअळीने कपाशी उत्पादकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले. सदर नुकसानीपोटी देण्यात येणारी शासकीय मदत जाहीरही करण्यात आली; पण अनेक शेतकऱ्यांना ही मदत मिळालेली नाही. ती त्वरित देण्यात यावी. वर्षभराच्या कालावधीत सुमारे ५५ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्यात; पण यापैकी केवळ २८ प्रकरणेच शासकीय मदतीसाठी पात्र ठरविण्यात आली आहेत. राज्यातील भाजपा सरकारने शेतकरीविरोधी धोरणांचा अवलंब त्वरित बंद करावा व शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी नियोजनबद्ध कार्यक्रम आखून त्यांची अंमलबजावणी करावी आदी मागण्या आंदोलनाद्वारे रेटून धरण्यात आल्या. तत्सम निवेदनही देण्यात आले. नायब तहसीलदार विलास कातोरे हे आंदोलनस्थळी निवेदन स्वीकारण्याकरिता हजर झाले. आंदोलनाचे नेतृत्व माजी खासदार तथा शिवसेनेचे जिल्हा संपर्क प्रमुख अनंत गुढे, माजी आमदार अशोक शिंदे, शेतकरी नेते शैलेश अग्रवाल, जिल्हा प्रमुख राजेश सराफ, महिला आघाडीच्या सुधा शिंदे, गणेश इखार आदींनी केले. आंदोलनात महिला व पुरूष शिवसैनिकांसह मोठ्या संख्येने शेतकरी सहभागी झाले होते.
शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी शिवसेनेचा रास्ता रोको
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 27, 2018 12:00 AM
स्थानिक ठाकरे मार्केट भागातील शिवसेना कार्यालयातून काढण्यात आलेला शिवसैनिक व शेतकऱ्यांचा मोर्चा बजाज चौकात पोहोचताच रस्ता रोको आंदोलन करण्यात आले. तब्बल तासभर हे आंदोलन सुरू राहिल्याने वाहतूक खोळंबली होती.
ठळक मुद्देजिल्हा प्रशासनाच्या अनास्थेमुळे संताप : आंदोलनामुळे बजाज चौकात एक तास वाहतुकीची कोंडी