शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election 2024: निकालानंतर अजित पवारांना सोबत घेण्याची वेळ आली, तर काय? जयंत पाटील म्हणाले... 
2
बाबा सिद्दिकी हत्येप्रकरणी मोठी अपडेट; मुंबई पोलिसांनी दिली महत्त्वाची माहिती, म्हणाले...
3
टाटाच्या ब्रँडने मोठा निर्णय घेतला; जग्वारने ब्रिटनमध्ये कारची विक्री थांबविली, कारण काय?
4
केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीत सरकारचा मोठा निर्णय; लाखो विद्यार्थ्यांचा होणार फायदा
5
Maharashtra Vidhan Sabha 2024: नवी मुंबईत अपक्ष कोणाच्या व्होट बँकेला पाडणार भगदाड?
6
“काँग्रेसने आत्मविश्वास गमावला आहे, जाहिरातीत पराभूत मानसिकतेचे लक्षण दिसते”: अशोक चव्हाण
7
IPL मेगा लिलावाआधी Shreyas Iyer पेटला! ज्या संघाला चॅम्पियन केलं त्यांनी दिला 'नारळ'; आता...
8
ट्रम्प यांचं अभिनंदन करण्यास पुतिन यांचा नकार; अमेरिका-रशिया संबंधांवर मोठं विधान
9
डोनाल्ड ट्रम्प यांच्या विजयाने नोकऱ्यांवर गदा? भारतीय सॉफ्टवेअर इंजिनीअर्सचे भविष्य अंधारात
10
ना ऑस्ट्रेलिया, ना इंग्लंड! भारतानंतर IPL लिलावात कोणत्या देशाच्या खेळाडूंची सर्वाधिक नावे?
11
कडक सॅल्यूट! जन्मापासूनच दिसत नव्हतं; नेत्रदिपक कामगिरी करत झाल्या IFS अधिकारी
12
David Warner चं कॅप्टन्सीचं ग्रहण सुटलं! RTM एन्ट्रीसह DC त्याला Rishabh Pant च्या जागी आजमावणार?
13
डोनाल्ड ट्रम्पना आणखी एक मुलगी? पाकिस्तानातल्या तरुणीचा खळबळजनक दावा, Video व्हायरल
14
शाहरुख-अमिताभ यांचे फॅन आहेत डोनाल्ड ट्रम्प! हे दोन बॉलिवूड सिनेमे आवडीने पाहतात
15
"अजित दादांच्या जाहीरनाम्यात 'प्रिंटिंग मिस्टेक', एक ओळ छापायची राहून गेली!"; काय म्हणाले अमोल कोल्हे?
16
डोनाल्ड ट्रम्प यांच्या लाल टोपीवर '45-47' हे काय लिहिलेलं होतं, जे खरं ठरलं? असं आहे कनेक्शन
17
IPL Auction 2025 : पाकिस्तानची वाट लावणारा IPL च्या लिलावात; अमेरिकेच्या दहा खेळाडूंनी केली नोंदणी
18
'ज्यांच्या घरावर बुलडोझर चालवला, त्यांना २५ लाख रुपये द्या'; सुप्रीम कोर्टाचे योगी सरकारला आदेश
19
"कुणी कुणाचं काहीही चोरलेलं नाही"; राज ठाकरेंच्या टीकेवर अजितदादा म्हणाले, "कधी काय बोलतील..."
20
Priyanka Gandhi : "मी मागे हटणार नाही, तुमच्यासाठी लढेन"; प्रियंका गांधींनी स्वतःला म्हटलं 'योद्धा', भाजपावर टीकास्त्र

विद्यार्थ्यांसह गावकºयांचा रस्ता रोको

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 10, 2017 12:56 AM

तळेगाव-आष्टी राज्य मार्गावर शिरकुटनी, सुजातपूर, ममदापूर फाट्यावरुन धावणाºया बस दोन-तीन तास उशीरा येवून व थांबताच निघून जाते.

ठळक मुद्देआगार व्यवस्थापकाचे दुर्लक्ष : वेळेवर बस येत नसल्याने शिक्षणाचा खेळखंडोबा

लोकमत न्यूज नेटवर्कआष्टी (शहीद) : तळेगाव-आष्टी राज्य मार्गावर शिरकुटनी, सुजातपूर, ममदापूर फाट्यावरुन धावणाºया बस दोन-तीन तास उशीरा येवून व थांबताच निघून जाते. यामुळे अनेक विद्यार्थ्यांवर शिक्षणापासून वंचित राहण्याची वेळ आली आहे. त्यामुळे संतप्त गावकरी व शाळेतील विद्यार्थ्यांनी गुरुवारी एकत्र येवून रस्तारोको केला.यावेळी राज्यमार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली. एक बस आल्यावर काही विद्यार्थी बसवून घेतले तर उर्वरित विद्यार्थी दुसºया बसच्या प्रतीक्षेत होते. या प्रकरणी परिवहन मंत्री दिवाकर रावते यांना निवेदन पाठविण्यात आले. शिरकुटणी, ममदापूर, सुजातपूर या तीन गावातील शंभरावर विद्यार्थी आष्टीला शिक्षणासाठी जातात. विद्यार्थ्यांच्या सराव परीक्षा सुरू आहे. त्यामुळे वेळेवर परिक्षासाठी जावे लागते. शाळेत गेल्यावर शिक्षक विद्यार्थ्यांना धारेवर धरतात अशा वेळी विद्यार्थ्यांना दोन्हीकडून मनस्ताप सहन करावा लागतो. गत महिन्याभरापासून सकाळी आर्वी-मोर्शी व आर्वी-वरुड या दोन्ही बस ११.३० ते १२ वाजता येतात तर काही बस आल्यावर थांबा न देता सरळ निघून जातात. त्यामुळे खासगी वाहनांचा आधार घेवून आष्टीला यावे लागते. आर्वी येथील आगार व्यवस्थापक आणि तळेगाव येथील आगार व्यवस्थापक बस येतात एवढे सांगून जबाबदारी झटकत आहे. त्यामुळे प्रचंड त्रास होत आहे. यामुळे आज सकाळी ९.३० वाजता ३० ते ४० विद्यार्थी शिरकुटणी काल्याजवळ थांबले. ११.२५ झाले तरी बस आली नाही. मोर्शी आगाराची एनएच ४० ए ८८७५ ही बस आल्यावर थांबली नाही. त्यामुळे वातावरण आणखिच तापले. याचा निषेध करीत लागलीच विद्यार्थ्यांनी रस्त्यावर बसून संताप व्यक्त केला. रस्तारोको होताच गावातील नागरिकही आले. दरम्यान आर्वी आगाराची ०८५२ ही बस आली. बसला विद्यार्थी व गावकºयांनी घेराव घातला. चालकाने अर्धे विद्यार्थी बसून नेले. उर्वरित विद्यार्थी बसच्या प्रतीक्षेत थांबले. रस्तारोको वेळी गावकरी जयराम कोहरे, ईश्वर वाघाडे, कपील श्रीराम, पंकज इरपाचे, दिनेश कुमरे, अंकुश सहारे, शक्ती कोहरे, दिपक निकाळजे, श्याम धोटे, शेषराव गवळीकर, प्रकाश धोटे, विद्यार्थीमध्ये गौरी उईके, हरिष पुसाम, दामिनी खानपासोडे, प्रासिक डोंगरे, चेतन दुधकवरे, सारंग नेहारे, सचिन उकार, गायत्री इरपाची, रणजीत आत्राम, हितेश धुर्वे यांच्यासह गावकºयांनी ठिय्या मांडला होता.