शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
4
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
5
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
6
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
7
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
8
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
9
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
10
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
12
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
13
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
14
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
15
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
16
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
17
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
18
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
19
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
20
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं

विसर्जनातील जलस्त्रोतांचे प्रदूषण थांबवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2017 11:33 PM

पाण्याचे स्त्रोत प्रदूषित होऊ नये म्हणून सर्वोच्च न्यायालय, शासन व पाणी प्रदूषण मंडळाने आदेश दिले आहेत.

ठळक मुद्देमहाराष्टÑ अंनिसचे जिल्हाधिकाºयांना निवेदन : पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी पुढाकार गरजेचा

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : पाण्याचे स्त्रोत प्रदूषित होऊ नये म्हणून सर्वोच्च न्यायालय, शासन व पाणी प्रदूषण मंडळाने आदेश दिले आहेत. याचा आधार घेत नदी, नाले, विहिरींतील विसर्जन रोखून जलस्त्रोत नष्ट होण्यापासून थांबवावे, अशी मागणी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने केली आहे. याबाबत निवासी उपजिल्हाधिकारी मंगेश जोशी यांना निवेदन देण्यात आले.सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश, महाराष्ट्र अंनिसच्या याचिकेवर औरंगाबाद उच्च न्यायालयाने दिलेले आदेश, महाराष्ट्र शासनाने काढलेले आदेश, केंद्रीय व राज्य पाणी प्रदूषण मंडळ यांनी मूर्ती व निर्माल्यामुळे पिण्याचे व वापरात येणारे पाणी प्रदूषित होणार नाही, यासाठी काढलेल्या सर्व आदेशांच्या सत्यप्रती जिल्हाधिकाºयांना देण्यात आल्या. जिल्हा प्रशासन व स्थानिक स्वराज्य संस्थेने कृत्रिम हौद उपलब्ध करून देण्याचे आदेश आहे; पण जिल्ह्यातील कोणत्याही नदी, नाला, ओढ्यावर वा इतर पर्यायी हौद निर्माण केले नाहीत. यामुळे न्यायालयाच्या आदेशाची अवमानना होत आहे. ती होऊ नये म्हणून लोकांना पर्याय उपलब्ध करून द्यावा. हिंदु जनजागृतीसारख्या संघटना नदीतच मूर्तीचे विसर्जन करा, असे सांगतात. त्यांना समज देत प्रसंगी गुन्हे दाखल करावे, भाविकांचे प्रबोधन करावे, अशी मागणी निवेदनातून केली. यावेळी गजेंद्र सुरकार, प्रकाश कांबळे, सुधीर पांगुळ, अतुल शर्मा, ढाले, उटाणे आदी उपस्थित होते.लहान मूर्ती स्थापनेचा संकल्पनाचणगाव : दरवर्षी गणेशोत्सवात मोठ-मोठ्या आकर्षक अशा गणेशमूर्ती दिसतात व त्यांची स्थापना विविध मंडळांद्वारे करण्यात येते; पण यंदा पावसाने दडी मारल्याने पाण्याचे प्रमाण कमी झाले. परिणामी, नदी, नाल्यांना पाणी कमी आहे. यामुळे मिरा कॉलनी येथील गणेशोत्सव मंडळाने लहान मूर्ती स्थापन करून पर्यावरणपूरक उत्सव साजरा करण्याचा संकल्प केला आहे.दरवर्षी शहर व परिसरातील गणेशमूर्तीचे विसर्जन वर्धा नदी पात्रात केले जाते. लहान-मोठे सर्वच मंडळ या पात्रात मूर्ती विसर्जित करतात. नदीचे पात्रही तुडुंब भरलेले असते; पण यंदा अत्यल्प पावसामुळे नदी पात्रातील पाण्याचे प्रमाण कमी झाले आहे. यामुळे विसर्जनाचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. मिरा कॉलनी येथील नागरिक दरवर्षी गणेशोतसव साजरा करतात. यात यंदा लहान मूर्ती बसविण्याचा संकल्प केला आहे. यामुळे कमी पाण्यात मूर्तीचे सहज विसर्जन होईल. मूर्ती मातीची असल्याने पाण्यात लवकर विसर्जित होईल. हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून यंदाचा गणेशोत्सव पर्यावरणपूरक साजरा करण्याचा मानस कॉलनीतील नागरिकांनी व्यक्त केला आहे. पावसाचे प्रमाण दिवसेंदिंवस कमी होत असल्याने मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. भविष्यात पेयजल संकट निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. कमी पाण्यात मोठ्या मूर्तीचे विसर्जन करणे शक्य नाही. शिवाय प्लास्टर आॅफ पॅरिसच्या मूर्तीमुळे नैसर्गिक जलस्त्रोत बुजतात. हा प्रकार टाळण्यासाठी केवळ मातीच्याच मूर्ती स्थापन करणे गरजेचे झाले आहे. मिरा कॉलनीमध्ये लहान मूर्तीचा संकल्प केला असून नागरिकांनीही या उपक्रमाचे अनुकरण करणे पर्यावरणाच्या दृष्टीने गरजेचे झाले आहे.उत्सव काळात पर्यावरणपूरक वस्तू वापरावर्धा शहरात धार्मिक मंडळांतर्फे मोठ्या प्रमाणात लंगरचे कार्यक्रम आयोजित करण्यात येतात. यात प्लास्टिक प्लेटस् व वाट्यांचा उपयोग केला जातो. यामुळे शहरात प्रदूषण होत असून प्लास्टिक मातीत नष्ट होत नाही. यामुळे लंगरमध्ये प्लास्टिक प्लेटा व वाट्यांचा उपयोग न करता पळसाच्या पानाच्या पत्रावळी, द्रोणचा वापर करून शहर स्वच्छ ठेवण्यास सहकार्य करावे, असे आवाहन नगर पालिका प्रशासनाकडून करण्यात आले आहे.