लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : पुलगाव शहरामधील मागील दोन वर्षांपासून आर्वी नाका पुलगाव रोडवरील पुलाचे बांधकाम सुरू झाले होते. काही कारणास्तव हे बांधकाम बंद झाले आहे. यामुळे सर्वसामान्य नागरिक, विद्यार्थी यांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. या रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर खड्डे पडले आहे. एका शाळकरी मुलाला या ठिकाणी अपघात झाला. तसेच रुग्णांनाही रुग्णालयात आणताना त्रास होत आहे.रेल्वे क्रॉसींगनंतर पुलाचे काम सुरू झाले. या रस्त्यावरून मोठ्या प्रमाणावरून रहदारी राहते. मोटारसायकली, लहान वाहन, जड वाहने आदी मोठ्या प्रमाणावर आवागमण होते. त्यामुळे या पूलाचे काम तातडीने सुरू होणे गरजेचे आहे. यासंदर्भात प्रहाराच्या वतीने रस्त्याची पाहणी करण्यात आली. त्वरीत रस्त्याची दुरुस्ती न झाल्यास आंदोलन करण्याचा इशारा पुलगाव शहर प्रमुख तुषार कोंडे यांनी दिला आहे. पुलगाव शहरात अतिक्रमणही मोठ्या प्रमाणावर वाढले आहे. अमरावतीकडे जाणाऱ्या मार्गावर दोनही बाजूला व्यावसायीक प्रतिष्ठाने आहे. या मार्गावरून बसस्थानक, रेल्वेस्थानक, नगर पालिका आहे. अनेक ठिकाणी नागरिक मुख्य रस्त्याला लागून वाहने ठेवून देतात. तसेच व्यावसायिकांचे साहित्य घेवून येणारे वाहनही येथेच उभे राहतात. अशा स्थितीत एस.टी. च्या बसगाड्या काढताना चालकांची कसरत होते. या मार्गावरील अतिक्रमण काढण्यात यावे, अशी मागणी पुलगाववासियांनी केली आहे.स्थानिक नगर पालिका प्रशासनाने अनेकदा अतिक्रमण हटाव मोहीम राबविली. मात्र त्यानंतर अतिक्रमण जैसे थे झाले. अतिक्रमण काढून या भागाच्या कामांना त्वरीत गती द्यावी, अशी मागणी अलीकडेच सामाजिक संघटनांतर्फे करण्यात आली आहे. याबाबतचे निवेदनही प्रशासनाला देण्यात आले.
उड्डाणपुलाचे काम थांबल्याने हाल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 09, 2018 12:44 AM
पुलगाव शहरामधील मागील दोन वर्षांपासून आर्वी नाका पुलगाव रोडवरील पुलाचे बांधकाम सुरू झाले होते. काही कारणास्तव हे बांधकाम बंद झाले आहे. यामुळे सर्वसामान्य नागरिक, विद्यार्थी यांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. या रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर खड्डे पडले आहे. एका शाळकरी मुलाला या ठिकाणी अपघात झाला. तसेच रुग्णांनाही रुग्णालयात आणताना त्रास होत आहे.
ठळक मुद्देपुलगाववासी त्रस्त : प्रहारचा आंदोलनाचा इशारा