शहरं
Join us  
Trending Stories
1
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
2
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
3
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
4
रिझर्व्ह बँक व्याजदरात कपात करणार की नाही? Moodys नं सांगितला काय आहे देशाचा 'मूड'
5
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
6
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
7
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
8
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
9
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
10
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
11
ढगाळ हवामानामुळे मुंबईत थंडी पळाली; बदलत्या हवामानाचा परिणाम
12
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
13
लॉटरी किंगकडून आठ कोटींची रक्कम जप्त
14
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
15
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
16
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
17
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
18
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
19
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
20
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."

वीज पुरवठ्यासाठी ग्रामस्थांचा रस्तारोको

By admin | Published: June 12, 2017 1:45 AM

तारासावंगा येथील वीज पुरवठा एक महिन्यापासून अनियमीत होता. महावितरणला वारंवार सांगूनही दुर्लक्ष केले जात होते.

२३ जणांची अटक व सुटका : तारासावंगात एक महिन्यापासून ब्रेकडाऊनलोकमत न्यूज नेटवर्कआष्टी (श.) : तारासावंगा येथील वीज पुरवठा एक महिन्यापासून अनियमीत होता. महावितरणला वारंवार सांगूनही दुर्लक्ष केले जात होते. परिणामी, संतप्त ग्रामस्थांनी शनिवारी रात्री ९ वाजता साहुर कार्यालयावर धडक दिली. अभियंता व कर्मचारी नसल्याने थेट रस्तारोको आंदोलन सुरू केले. याबाबत माहिती मिळताच पोलिसांनी आंदेलन स्थळ गाठत २३ जणांना अटक करीत सुटका केली. यामुळे तणाव निर्माण झाला होता.तारासावंगा हे तालुक्याचे शेवटचे गाव असून २८ किमी अंतरावर आहे. गावात कुठल्याच सुविधा नाही. वीज वितरण कंपनीचा भोंगळ कारभार त्यात भर घालत आहे. विद्युत तारा तुटल्या, इन्सुलेटर फुटले असून दुरुस्ती केली जात नाही. याबाबत सरपंच रत्नपाल पाटील यांनी वारंवार कार्यकारी अभियंत्यांना निवेदने दिली; पण दुर्लक्ष करण्यात आले. यामुळे ब्रेकडाऊन झाले होते. परिणामी, महावितरण लक्ष देत नसल्याचा आरोप करीत ग्रामस्थांनी सरपंच पाटील यांच्यासह साहुर येथील विद्युत कार्यालय गाठले. अभियंता हजर नसल्याने वरिष्ठांना माहिती देण्यात आली. वीज पुरवठा सुरू झाल्याशिवाय कार्यालयातून जाणार नाही, अशी भूमिका ग्रामस्थांनी घेतली; पण अभियंता आलेच नाही. अखेर ग्रामस्थांनी राष्ट्रीय महामार्गावर रस्तारोको आंदोलन सुरू केले. एक तासातच वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. याबाबत माहिती मिळताच पोलीस जमादार खांडरे, पिसे, बावणे, रघाटाटे आंदोलनस्थळी दाखल झाले. यावेळी २३ आंदोलकांना कलम ६८ नुसार अटक करून काही वेळाने कलम ६९ नुसार सुटका करण्यात आली. यामुळे तणाव निर्माण झाला होता. रस्तारोको आंदोलनात सरपंच रत्नपाल पाटील, योगेश तुमडाम, सतीश निपाणी, विनोद कावळे, विलास पाटणकर, संजय सुरजूसे, विक्की कावळे, चेतन इंगळे, किरण ठोंबरे, पंकज कावळे व ग्रामस्थ सहभागी होते.