लोकमत न्यूज नेटवर्कआर्वी : कठुआ येथील अल्पवयीन मुलीवर नराधमांनी केलेल्या अमानवीय अत्याचाराच्या निषेधार्थ येथील शेकडो नागरिकांनी व विविध सामाजिक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांनी शुक्रवारी सायंकाळी उशीरा कॅन्डल मार्च काढला. यावेळी आंदोलनकर्त्यांन आरोपी बलात्काऱ्यांना फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली.स्थानिक बस स्थानक येथून हिंदू-मुस्लीम एकता समितीच्या नेतृत्त्वात गुरूवारी रात्री हा कॅन्डल मार्च काढण्यात आला. यात आ. अमर काळे, नगराध्यक्ष प्रशांत सव्वालाखे, डॉ. रिप्पल राणे, गौरव जाजू, मैफूज कुरेशी, शिवसेनेचे माजी जिल्हा प्रमुख निलेश देशमुख, बाळा जगताप, प्रणिता हिवसे, वीरेंद्र कडू, परवेज साबीर, सुशिलसिंह ठाकुर, सतीश शिरभाते, दिलीप पोटफोडे, रितेश जांगडे, सुनील डोंगरे, दर्पण टोकसे, सुधीर वाकोडकर, पंकज वाघमारे, गजानन गावंडे, पुरुषोत्तम नागपूरे आदी प्रमुख्याने सहभागी झाले होते. सदर कॅन्डल मार्च गांधी चौकात पोहचल्यावर तेथील जयस्तंभा समोर सर्वांनी कॅन्डल लावून मृतक पीडितेला श्रद्धांजली अर्पण केली.कॅन्डल मार्चमध्ये गफ्फूर शेख, इफत्तकार अहमद, रहिम कुरेशी, शहबाज मुल्ला, अरसलम खान, साजिद, हाजी अकील अंडेवाला, राजीद कुरेशी, सुधीर जाचक, चंद्रकांत राऊत, अतुल खोंडे, बाळा केळतकर, अशोक वानखेडे यांच्यासह मराठा महासंघ, शेरे-हिंद संघटना, काँग्रेस, भाजप, बसपा,श्रीराम सेना, प्रहार सोशल फोरम, आर्वी मित्र परिवार, मराठा सेवा संघ, यंग मुस्लीम वेलफेअर असोशिएशन, लायन्स क्लब आदी सामाजिक संघटनेचे कार्यकर्ते सहभागी झाले होते.युवा स्वाभिमान पार्टीच्यावतीने तहसीलदारांना निवेदनआर्वी - जगात भारत देश हा संपूर्ण जगाला समता, बंधुता, शांतीप्रियता संस्कृती जपणारा व महिलांना सन्मान देणारा म्हणून ओळला जातो. परंतु, गत काही काळापासून देशात महिलांवर होणाऱ्या अत्याचारात प्रचंड प्रमाणात वाढ झाली आहे. त्यामुळे महिलांमध्ये असुरक्षीततेची भावना निर्माण झाली आहे. कठुआ येथील एका अल्पवयीन मुलीवर काहींनी बलात्कार करून तिची हत्या केली. सदर घटना निंदनिय आहे. या प्रकरणातील आरोपींवर कठोर कारवाई करीत त्यांना फाशीची शिक्षा ठोठावण्यात यावी, अशी मागणी युवा स्वाभिमान पार्टीच्यावतीने तहसीलदारांना सादर केलेल्या निवेदनातून करण्यात आली आहे. सदर निवेदन तहसीलदारांच्या मार्फत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठविण्यात आले आहे. कठुआ व उन्नव या दोन्ही ठिकाणी घडलेल्या बलात्कार प्रकरणाचा तपास सी.बी.आय.कडे देण्यात यावा. सदर प्रकरण अतिजलदगती न्यायालयात चालविण्यात यावे. तसेच आरोपींना फाशीची शिक्षा होईल अशा प्रकारेच न्यायालयात बाजू मांडण्यात यावी. अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. निवेदन देताना आदिवासी नेते सुनील घोडाम, नितीन मनवर, कमलेश चिंधेकर, किसन राठोड, साजिद पटेल, शेख चाँद शेख हनीफ, रमजान शहा, रज्जाकभाई, राजू बोरकुटे, राहुल विरेकर, बादल काळे, अमोल बेलकर, शेख सोनु सौदागर, अविनाश गाठे, अंकुश मोटघरे, सिद्धांत कळंबे यांच्यासह युवा स्वाभिमान पार्टीचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
बलात्काऱ्यांना कठोर शिक्षा द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2018 12:29 AM
कठुआ येथील अल्पवयीन मुलीवर नराधमांनी केलेल्या अमानवीय अत्याचाराच्या निषेधार्थ येथील शेकडो नागरिकांनी व विविध सामाजिक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांनी शुक्रवारी सायंकाळी उशीरा कॅन्डल मार्च काढला. यावेळी आंदोलनकर्त्यांन आरोपी बलात्काऱ्यांना फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली.
ठळक मुद्देकॅन्डल मार्च काढून नोंदविला घटनेचा निषेध