शहरं
Join us  
Trending Stories
1
दिलीप वळसे, मुश्रीफांना पाडण्याचे शरद पवारांचे आवाहन; अजितदादांवर म्हणाले, "तिथं काय बोलणार..."
2
भाजपानं घोषित केलेली 'भावांतर योजना' गेमचेंजर ठरणार?; शेतकर्‍यांची चिंता मिटणार
3
भाजपच्या किती जागा येणार? जयंत पाटलांनी सांगितला आकडा; केली मोठी भविष्यवाणी!
4
त्यांना बॅगा, खोके पुरत नाहीत, कंटेनर लागतो; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्ला
5
धारावीची जमीन अदानींना द्यायची होती म्हणून सरकार चोरले; राहुल गांधींचा भाजपवर आरोप
6
'मिस्टर इंडिया'तील ही क्युट टीना आठवतेय का? आता तिला ओळखणं झालंय कठीण
7
महाराष्ट्राचे बेस्ट मुख्यमंत्री कोण? अजित पवारांनी घेतले या नेत्याचे नाव, म्हणाले...'युती-आघाडीच्या युगात...'
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :वाईतील सभेत शरद पवारांना अचानक एक चिठ्ठी आली,पवारांनी वाचूनच दाखवली, म्हणाले,...
9
वडील घरी न आल्याने अमेरिकेतील मुलांनी आयफोनने अहमदाबादचं लोकेशन केलं ट्रॅक अन्...
10
प्रियांका गांधी यांच्याकडून भरसभेत बाळासाहेब ठाकरे यांचा उल्लेख; PM मोदी, अमित शाह यांना मोठं आव्हान
11
काँग्रेसमध्ये बंडखोरी, पण अजित पवारांच्या मंत्र्यासाठी निवडणूक किती कठीण?
12
Lawrence Bishnoi : सलमान ते श्रद्धा वालकरचा मारेकरी आफताबपर्यंत...; लॉरेन्स बिश्नोईच्या हिटलिस्टमध्ये कोण आहे?
13
"केम छो वरली, जिलेबी फाफडा उद्धव ठाकरे आपडा तुम्ही बोलायचं अन्..."
14
टीम इंडियाला मोठा धक्का; दुखापतीमुळं Shubman Gill पहिल्या कसोटीतून 'आउट'?
15
दोन मित्रांमध्ये प्रतिष्ठेची लढत; राजकीय आखाड्यात कोणता पैलवान मारणार बाजी? 
16
मौलाना सज्जाद नोमानींनी जारी केली यादी; मुंबईतील ३६ जागांवर कुणाला दिला पाठिंबा?
17
बंडखोर उमेदवारांमुळे मतविभाजनाची भीती; भाजप, ठाकरेंच्या शिवसेनेसमोर आव्हान
18
आगीचा भडका, किंकाळ्या, चेंगराचेंगरी, पालकांचा आक्रोश...; मन हेलावून टाकणारा Video
19
पुन्हा बाबा झाल्याचा आनंद! रोहित शर्मानं पत्नी रितिकाला टॅग करत शेअर केला खास फोटो
20
वाढत्या महागाईत व्हिलेन बनताहेत भाज्या; टोमॅटो, कांदा, बटाट्याच्या वाढत्या किंमतींनी बिघडवलं किचनचं बजेट

जिल्ह्यात कोरोना नियमांची कठोर अंमलबजावणी करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 17, 2021 5:00 AM

मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी मंगळवारी राज्यातील सर्व जिल्हाधिकारी यांच्याशी दूरस्थ प्रणालीद्वारे संवाद साधून रुग्ण संख्येत वाढ होत असलेल्या जिल्ह्यांचा आढावा घेतला. ९ ते १५ फेब्रुवारी दरम्यान राज्यातील काही भागात रुग्णसंख्येत वाढ होत असून यात विदर्भातील सात जिल्ह्यांचा समावेश आहे. 

ठळक मुद्देजिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश : जिल्ह्याचा पॅाझिटिव्ह रेट १५.६३ टक्के

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा :  राज्यातील २१ जिल्ह्यामध्ये गेल्या आठवड्यात कोरोना रुग्ण संख्येत वाढ होत आहे. विदर्भातील अमरावती, वर्धा, अकोला, बुलढाणा, यवतमाळ आणि नागपूर या जिल्ह्यांच्या रुग्णसंख्येतील वाढ ही चार टक्केपेक्षा जास्त आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी मास्क वापरणे, सामाजिक अंतर पाळणे आणि वारंवार हात धुणे या नियमांची कडक अंमलबजावणी करण्याचे निर्देश सर्व जिल्हाधिकारी यांना दिलेत. या पार्श्वभूमीवर वर्धा जिल्ह्यात कोरोना नियमांची कठोर अंमलबजावणी करण्यासोबतच लोकांमध्ये कोरोनाबाबत काळजी घेण्यासाठी जनजागृती करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार यांनी यंत्रणेला दिलेत.मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी मंगळवारी राज्यातील सर्व जिल्हाधिकारी यांच्याशी दूरस्थ प्रणालीद्वारे संवाद साधून रुग्ण संख्येत वाढ होत असलेल्या जिल्ह्यांचा आढावा घेतला. ९ ते १५ फेब्रुवारी दरम्यान राज्यातील काही भागात रुग्णसंख्येत वाढ होत असून यात विदर्भातील सात जिल्ह्यांचा समावेश आहे. यात वर्धा जिल्हाही एक असून जिल्ह्याचा पहिल्यांदाच पॉझिटिव्ह रेट १५.६३ टक्के आढळून आला आहे. या मागच्या कारणांचा शोध घ्यावा, त्यासाठी तात्काळ उपाययोजना राबवाव्या, असे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले. यासंदर्भात जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार यांनी तात्काळ सबंधित अधिकाऱ्यांची बैठक बोलावून अधिकाऱ्यांना निर्देश दिलेत. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सचिन ओम्बासे, पोलीस अधीक्षक प्रशांत होळकर, निवासी उपजिल्हाधिकारी अर्चना मोरे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सचिन तडस, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अजय डवले, जिल्हा माहिती अधिकारी मनीषा सावळे, सावंगी रुग्णालयाचे विशेष कार्य अधिकारी डॉ. अभ्युदय मेघे उपस्थित होते. 

विवाह सोहळ्याच्या आनंदावर पुन्हा विरजण?कारोनाचा पॉझिटिव्ह रेट बघता विवाह समारंभ, मेळावे, मोर्चे, सार्वजनिक कार्यक्रम या ठिकाणी ५० लोकांपेक्षा जास्त व्यक्तींना उपस्थित राहण्याची मंजुरी देऊ नयेत. रेस्टॉरंट तसेच गर्दीच्या ठिकाणी संख्येच्या मर्यादेबाबत घालून दिलेल्या बंधनाचे काटेकोरपणे पालन करावे. गर्दीच्या ठिकाणी सामाजिक अंतर, मास्कचा वापर बंधनकारक करावा तसेच हातांची स्वछता राखली जाईल याची काळजी घ्यावी. शहरात गर्दीच्या ठिकाणी फवारणी आणि हॅन्ड वॉश सेंटर पुन्हा सुरू करावेत, असे आदेश दिलेत. त्यामुळे आता विवाह सोहळ्यासह इतर कार्यक्रमांच्या उत्साहावर विरजण पडण्याची शक्यता आहे.

चाचणींची संख्या वाढवावीसर्व खाजगी डॉक्टरांनी ताप, खोकला व कोरोनाची लक्षणे असलेल्या रुग्णांना तातडीने कोरोना चाचणी करण्यास सांगणे बंधनकारक करावे. चाचण्यांची संख्या वाढवावी तसेच अति जोखमीचे रुग्ण आणि ज्येष्ठ नागरिक यांचे सर्वेक्षण सुरू करावे. मोबाईल टेस्टिंग व्हॅन ग्रामीण भागात सुरू करावी जेणेकरून रुग्णांची चाचणी लवकर होऊन त्यांना तातडीने उपचार घेता येतील, असेही जिल्हाधिकारी यांनी अधिकाऱ्यांना सांगितले. 

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याcollectorजिल्हाधिकारी