शहरं
Join us  
Trending Stories
1
रवींद्र वायकर यांना मोठा दिलासा, कथित भूखंड घोटाळा प्रकरण अखेर बंद, गैरसमजातून गुन्हा दाखल केला
2
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
3
Maharashtra Election 2024: "सगळीकडं जायचं, फक्त भुंकायचं"; आनंदराव अडसूळांचं नवनीत राणांवर टीकास्त्र
4
प्रियंका गांधींची आज कोल्हापुरात 'महाराष्ट्र स्वाभिमान' सभा, सभेची जय्यत तयारी
5
Mutual Funds नं 'या' १५ स्टॉक्समध्ये केली सर्वाधिक खरेदी, तुमच्याकडे आहेत का?
6
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
7
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
8
रिझर्व्ह बँक व्याजदरात कपात करणार की नाही? Moodys नं सांगितला काय आहे देशाचा 'मूड'
9
अश्नीर गोव्हरची Bigg Boss 18 मध्ये एन्ट्री; सलमान खानने 'दोगलापना'वर केली टीका म्हणाला- "तुम्ही जे चुकीचं..."
10
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
11
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
12
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
13
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
14
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
15
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
16
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
17
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
18
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
19
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
20
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला

कुपोषणमुक्तीसह मागण्यांसाठी धडक

By admin | Published: May 28, 2017 12:32 AM

कुपोषण मुक्तीसाठी त्वरित उपाययोजना अंमलात आणावी यासह विविध मागण्यांसाठी विदर्भ प्रदेश विकास परिषदेने

लोकमत न्यूज नेटवर्क वर्धा : कुपोषण मुक्तीसाठी त्वरित उपाययोजना अंमलात आणावी यासह विविध मागण्यांसाठी विदर्भ प्रदेश विकास परिषदेने जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिली. याप्रसंगी जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विविध मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले. सन २०१६ मध्ये राज्यात १७ हजार जणांचा कुपोषणामुळे मृत्यू झाला. यात बालक व महिलांचा समावेश होता. कुपोषणाने मृत्यूचे सर्वाधिक प्रमाण विदर्भात आहे. एकट्या मेळघाट परिसरातील धारणी व चिखलदरा तालुक्यात एक वर्षात ८०० च्या वर बालकांचा मृत्यू झाला. अमरावती, यवतमाळ, गडचिरोली व गोंदिया या ४ जिल्ह्यातील आदिवासी भाग मोठ्या प्रमाणात कुपोषित आहे. नुकत्याच एका सर्व्हेत नागपूर शहरात विविध वस्त्यांमधून ५ हजार मुले कुपोषित असल्याचे आढळले. उच्च न्यायालयाने याबाबत उपाययोजना आखण्याचे निर्देश राज्य सरकारला दिले होते; पण अद्यापही उपाययोजना केल्या नाही. यामुळे विदर्भच नव्हे तर राज्य कुपोषणमुक्त होण्यासाठी त्वरित उपाययोजना अंमलात आणाव्या. सर्व शासकीय यंत्रणा कार्यान्वित कराव्या, अंगणवाडीच्या माध्यमातून प्रत्येक आरोग्य केंद्रावर गरोदर माता व कुपोषित बालकांना नियमित औषध द्यावे, तज्ज्ञ डॉक्टरांची नियुक्ती करावी आदी मागण्या करण्यात आल्या. निवेदन देताना विदर्भ विकास परिषदेचे जिल्हाध्यक्ष विलास कांबळे, सचिव मंगेश चोरे व पदाधिकारी उपस्थित होते.