लोकमत न्यूज नेटवर्कहिंगणघाट : देशभरात रस्त्याच्या रुंदिकरणाचा सपाटा सुरु असून यात रस्त्यालगतच्या झाडांची कत्तल केल्या जात आहे. दिवसेंदिवस पर्यावरणाचा समतोल बिघडत असल्याने या झाडांच्या संरक्षणासाठी आता पर्यावरण संवर्धन समितीने पुढाकार घेतला आहे. रस्त्यालगतचे झाडे वाचविण्यासाठी त्यांनी प्रत्येक झाडावर ‘मला वाचवा’ असे फलक लावण्यात आले आहे.वाढते शहरीकरण, जंगल कटाई यामुळे झाडाची संख्या कमी होत आहे. त्याचे दुष्परिणाम आपण अनुभवतो आहे. सध्या उन्हाळ्याचा कालावधी वाढला असून हिवाळा व पावसाळ्याचे दिवस कमी झाले आहे. त्यातच रस्त्याच्या रुंदिकरणात मोठ्या प्रमाणात वृक्षतोड होत आहे. वर्धा ते हिंगणघाट रस्त्याचे रुंदिकरण सुरु असून यामध्ये ६० ते ७० वर्षापासूनचे झाडं तोडल्या जात आहेत. या वृक्ष तोडीला परिसरातील नागरिकांचा विरोध आहे. पर्यावरणाचा ºहास करुन देशाचा विकास नागरिकांना मान्य नाही. याचा विचार करुनच पर्यावरण संवर्धन संस्थेने वेळा ते कापड गिरणी (नवीन) या ३ कि.मी अंतरात असलेल्या झाडांना वाचविण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहे.याबाबत उपविभागीय अधिकाऱ्यांमार्फत जिल्हाधिकाºयांना निवेदन देण्यात आले. तसेच पालकमंत्री तथा वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याशीही भ्रमणध्वनीवरुन चर्चा केली असता त्यांनी या विषयाकडे लक्ष देणार असल्याचे आश्वस्त केले. सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता बोरकर, सह अभियंता तोंडूलवार यांच्याशी संपर्क साधाला असता त्यांनी प्रकल्प व्यवस्थापक राघवन यांची भेट घेण्यास सांगितले. या विषयाला गांभीर्याने घेत राघवन यांच्याशीही चर्चा करण्यात आली. तेव्हा त्यांनी या मार्गावरील जास्तीत जास्त झाडं वाचविण्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले. ज्या बाजुने कमीतकमी झाडं असतील त्या बाजुनेच रस्त्याचे रुंदीकरण करु आणि त्याही बाजुची झाडं वाचवता आली तर नक्कीच प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. या मोहिमेत पर्यावरण संवर्धन संस्थेचे रुपेश देऊळकर, अॅड. ओमप्रकाश भोयर, अमोल क्षीरसागर, पवन डफ, शुभम घोडे, ज्ञानेश्वर चौधरी, प्रा. अभिजीत डाखोरे यांचा सहभाग आहे. या संदर्भात असाच पाठपुरावा सुरु राहणार असल्याचे संस्थेचे अध्यक्ष आशिष भोयर यांनी सांगितले.
रुंदीकरणात झाडं वाचविण्याची धडपड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 03, 2018 10:48 PM
देशभरात रस्त्याच्या रुंदिकरणाचा सपाटा सुरु असून यात रस्त्यालगतच्या झाडांची कत्तल केल्या जात आहे. दिवसेंदिवस पर्यावरणाचा समतोल बिघडत असल्याने या झाडांच्या संरक्षणासाठी आता पर्यावरण संवर्धन समितीने पुढाकार घेतला आहे. रस्त्यालगतचे झाडे वाचविण्यासाठी त्यांनी प्रत्येक झाडावर ‘मला वाचवा’ असे फलक लावण्यात आले आहे.
ठळक मुद्देपर्यावरण संवर्धन संस्थेचा पुढाकार : प्रत्येक झाडावर लावले फलक