शहरं
Join us  
Trending Stories
1
मविआचा जागावाटपाचा गुंता सुटेना; राज्यातील काँग्रेसच्या नेत्यांना दिल्लीत थांबण्याचे आदेश
2
नारायण राणेंचे निकटवर्तीय नवव्यांदा रिंगणात, कालिदास कोळंबकरांना भाजपकडून उमेदवारी
3
आजचे राशीभविष्य : नोकरीत वरिष्ठांचे सहकार्य लाभेल, सामाजिक मान-सन्मान मिळाल्याने प्रसन्न वाटेल
4
T20 World Cup: न्यूझीलंडच्या महिला जगज्जेत्या! दक्षिण आफ्रिकेवर ३२ धावांनी विजय
5
ही शाळा की कोचिंग क्लास? शिक्षणाचा मूळ उद्देश काय आहे, याचे भान व्यवस्थांना कधी येईल?
6
Mutual Fund Investment : ३००० रुपयांच्या SIP नं बनले ५ कोटी रुपये; 'या' म्युच्युअल फंडानं गुंतवणूकदारांवर पाडला पैशांचा पाऊस
7
'आई आणि बाबा रिटायर होत आहेत' मालिकेची तारीख अन् वेळ ठरली! ही मालिका घेणार निरोप?
8
मुंबई विद्यापीठाने नियोजित परीक्षा पुढे ढकलल्या; विद्यार्थी मतदारांसाठी घेतला निर्णय
9
विशेष लेख: कॅनडा, भारत अन् पाकिस्तान... देशादेशातल्या गाठी, निरगाठी... आणि उकल!
10
भाजपच्या पहिल्या यादीत बहुतेक जुन्याच चेहऱ्यांना संधी; फडणवीस यांच्यासह सर्व १० मंत्री मैदानात
11
तीन आमदारांचे टेन्शन वाढले; मुंबईत नार्वेकर, लोढा, शेलार यांचा अपेक्षेप्रमाणे पहिल्या यादीत समावेश
12
नालासोपाऱ्यातून भाजपाच्या राजन नाईक यांना उमेदवारी; क्षितिज ठाकूर यांचे आव्हान
13
भाजपच्या ठाणे जिल्हा यादीत प्रस्थापितांवरच पसंतीची मोहोर! तर्कवितर्कांना पूर्णविराम, उमेदवारी जाहीर
14
विधानसभेसाठी भाजपाकडून महामुंबईत विद्यमान २३ आमदार निवडणुकीच्या रिंगणात उतरणार!
15
महाविकास आघाडी तुटण्याच्या दिशेने?; भास्कर जाधव कडाडले, काँग्रेसला करून दिली आठवण
16
जम्मू काश्मीरात दहशतवादी हल्ला; गांदरबल इथं गोळीबारात ३ मजूर ठार तर ५ जखमी
17
"आमच्यात वाद नव्हताच..."; उमेदवारी न मिळालेल्या भाजपा आमदार अश्विनी जगपात यांचं विधान
18
१५ बैठका, ३४० तास चर्चा तरीही जागावाटप सुटेना; 'मातोश्री'तील बैठकीत काय घडलं?
19
पक्षफुटीनंतरही एकनिष्ठ राहिलेल्या आमदाराचा शरद पवारच करणार 'करेक्ट कार्यक्रम'?
20
कुटुंबवादामुळे तरुणांचे नुकसान; 1 लाख तरुणांना राजकारणात आणणार, PM मोदींची घोषणा

अपंग हेमंतची जगण्यासाठी धडपड

By admin | Published: May 05, 2017 1:55 AM

वृद्ध आई, आजारी पत्नी आणि दोन चिमुकली मुलं. यात अंगी आलेले अपंगत्त्व. पण जगण्याचा बाणा कायम.

तीन चाकीवर थाटले दुकान : पोटाची खळगी भरण्यासाठी शिवतो चपला जोडे सचिन देवतळे   विरूळ (आकाजी) वृद्ध आई, आजारी पत्नी आणि दोन चिमुकली मुलं. यात अंगी आलेले अपंगत्त्व. पण जगण्याचा बाणा कायम. कुणासमोर हात पसरवायचे नाही, भिक मागायची नाही, असे म्हणत रसुलाबाद येथील हेमंत शेगोकार याने थेट तीन चाकीवर जोडे चप्पल शिवण्याचा व्यवसाय थाटून कोणत्याही परिस्थितीत स्वाभीमानाने जगणे शक्य असल्याचे सर्वांना दाखिवले आहे. आर्थिक परिस्थितीने व्यक्ती गरीब किंवा श्रीमंत ठरतो. यातही हे अपंगत्व गरीब घरातील व्यक्तीला आले तर त्याच्यावर उपचार करणेही कठीण जाते. तुमची परिस्थिती हलाखीची असली आणि त्यातही शरीर अधू असले तर जगताना कोणी आधार देईलच असे नाही. यात अनेक अडचणींवर मात करीत जीवन जागावे लागते. अशीच काहीशी स्थितीत नजीकच्या रसुलाबाद येथील हेमंत शेगोकार या युवकाची झाली. मात्र त्याने हिम्मत न सोडता अपंगत्वाचे ओझे घेवून स्वाभीमानाने आपला संसार थाटला. संसाराचा गाडा हाकण्याकरिता त्याने तीन चाकी सायकलवरुन लोकांची फाटकी पादत्राने शिवून आपल्या व पत्नी दोन लहान मुले व वृद्ध आईचा उदरनिर्वाह करीत आहे अत्यंत गरीब कुटुंबात जन्मलेल्या हेमंतची कहानी तशी विदारकच. जन्मापासुन दोन्ही पायांनी अपंग असलेल्या हेमंतला चालताच येत नाही. इतरांच्या मदतीने दिवसभराच्या क्रिया पार पाडाव्या लागतात. कोणाची मदत भेटली तर ठीक नाही तर त्याच जागेवर पडुन राहावे लागते. पत्नीच्या मजुरीवर संसार चालायचा. अशातच पत्नी आजारी पडल्याने दोन लहान मुले आणि आईच्या भरणपोषणाचा प्रश्न निर्माण झाला. यात कुणाची मदत घ्याची नाही, असे म्हणत त्याने तीनचाकी सायकलीचा आधार घेत त्या सायकलवर चपला जोडे शिवण्याचे दुकान थाटले. एखाद्या परक्या व्यक्तीला तो सायकलवर बसुन मागतो व गावोगावी फीरुन चपला जोडे शिवून परत घरी येतो. यातुन आपल्या संसाराचा गाडा चालवितो. त्याला राहायला पडके घर आहे, तेही जीर्ण झाले आहे. घराकरिता शासन दरबारी अनेक चकरा मारल्या; परंतु अद्यापही घरकुलचा लाभ भेटला नाही. साधे राशन कार्डही त्याच्या नावाने बणले नाही. हा व्यवसाय करतांना त्याला कमालीच्या वेदना सहन कराव्या लागतात; परंतु ईलाज नाही, एक दिवस जर काम बंद असले तर ऊपवास पडतो. ऐखादे कर्ज काढून घरबसल्या दुकान टाकावे अशी त्याची ईच्छा आहे; परंतु त्याला साधे कर्जही भेटले नाही. असा एकच हेमंत नसून अनेक आहेत. त्यांच्या पुनर्वसनाकरिता शासनाकडून काही ठोस उपाययोजना आखणे गरजेचे आहे. गाडीवर बसताना लागतो कुणाचातरी आधार हेमंतला त्याच्या तीनचाकीवर बसण्याकरिता कुणाचातरी आधार घ्यावा लागतो. कुठे अडचण आल्यास कुणालातरी शोधावे लागते. अपंगांकरिता शासनाच्यावतीने कोट्यवधी रुपयांच्या योजना आखण्यात येतात. त्यातील एखाद्या योजनेचा लाभ हेमंतला देत त्याला सोईचे होईल, असे एखादे दुकान देण्यात यावे अशी मागणी करण्यात येत आहे.