विरूळ (आकाजी) : भरधाव येणाऱ्या सुमोने एका शाळकरी विद्यार्थिनीस जबर धडक दिली. यात ती गंभीर जखमी झाली. सेवाग्राम येथे उपचारार्थ नेत असताना वाटेतच तिचा मृत्यू झाला. ही हृदयद्रावक घटना सोमवारी सकाळी ११ वाजता विरूळ (आकाजी) परिसरात घडली.शिवानी प्रमोद नेवल (१५) असे मृतक विद्यार्थिनीचे नाव आहे. या प्रकरणात वाहन चालक विजय पेटकर (३०) रा. विरूळ (आकाजी) याला अटक करण्यात आली. या घटनेमुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण होते. पोलीस सुत्रानुसार, शिवानी ही नित्याप्रमाणे तिच्या सायकलने शाळेत जात होती. दरम्यान समोरून आलेल्या एका भरधाव सुमोने तिला जबर धडक दिली. या धडकेत ती ६ ते ७ फूट फेकल्या गेली. घटना घडताच सुमो चालकाने तेथून पळ काढला. यावेळी संतप्त नागरिकांनी सुमोला अडविण्याचा प्रयत्न केला; मात्र तो सुसाट पळाला. घटनास्थळी उपस्थित असलेल्या नागरिकांनी पुलगाव पोलिसांना माहिती देत जखमी शिवानीला उपचारार्थ सेवाग्राम येथे नेले. मात्र वाटेतच तिचा मृत्यू झाला. पुलगाव पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस उपनिरीक्षक विठ्ठल दुधकोहळे व शिपाई राजू कुरसंगे यांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. वाहन चालक विजय पेटकर याला त्याच्या घरून अटक केली. विशेष म्हणजे राजू यावेळी दारू पिऊन असल्याचे पोलिसांनी सांगितले. घटनास्थळी काही काळ तणाव निर्माण झाला होता. मात्र पोलिसांच्या उपस्थितीत तणावावर ताबा मिळविण्यात आला.(वार्ताहर) दुचाकी धडकल्या; एक ठार, तिघे जखमीआर्वी : तळेगाव आर्वी मार्गावर मांडला शिवारात दोन दुचाकी समोरासमोर धडक झाली. या जबर धडकेत दुचाकीस्वार रोशन ताराचंद भिवगडे (१९) रा. विठ्ठल वॉर्ड, आर्वी हा जागीच ठार झाला. तर अन्य दुचाकीवरील संदीप वझरकर, नितीन वझरकर रा. वसंतनगर आर्वी व सागर रामभाऊ हेडाऊ हे तिघे गंभीर जखमी झाले आहे. हा अपघात सोमवारी सकाळी ११.३० वाजताच्या सुमारास झाला.रोशन हा दुचाकी एमएच-३२ झेड-३९०२ ने आर्वीकडे येत होता. यावेळी संदीप, नितीन आणि सागर हे तिघेजण दुचाकी एमएच-३२ के-५७२१ ने तळेगावकडे जात होते. दरम्यान मांडला फाट्याजवळ दोन दुचाकीत धडक झाली. यात रोशन जागीच ठार झाला. या प्रकरणी आर्वी पोलिसांना माहिती मिळताच घटनास्थळी जावून जखमींना रुग्णालयात उपचार्थ दाखल करण्यात आले. पोलिसांनी दोन्ही दुचाकीचालकावर कलम २७९, ३७७, ३८८, ३०४ अन्वये गुन्हा दाखल केला.(तालुका प्रतिनिधी)दुचाकी अपघातात एक ठार एक गंभीर समुद्रपूर : जाम-गिरड मार्गावर अज्ञात वाहनाच्या धडकेत एक दुचाकीस्वार ठार तर एक गंभीर जखमी झाला. ही घटना रविवारी सायंकाळी घडली. चेतन एकनाथ लाखे (२९) रा. बोथुडा असे मृतकाचे नाव आहे तर रवींद्र दादाजी भुसारी (३५), रा. बेला हा गंभीर जखमी झाला. पोलीस सूत्रानुसार, चेतन लाखे व रवींद्र भूसारी हे दोघे एमएच-३२-एल-६०१३ क्रमांकाच्या दुचाकीने जात असताना त्याच्या वाहनाला अज्ञात वाहनाने धडक दिली. यात चेतन लाखे ठार झाला, तर रवींद्र भुसारी गंभीर जखमी झाला. त्याच्यावर सेवाग्राम रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अपघातानंतर हे दोघे रात्रभर खैरगाव शिवारातच पडून होते. ही घटना सोमवारी सकाळी सुमारास खैरगाव येथील शेतात जात असलेल्या इसमाच्या लक्षात आल्यानंतर गावातील नागरिकांना त्याने या घटनेची माहिती दिली. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठले.(तालुका प्रतिनिधी) ट्रकची दुचाकीला धडक, एक ठारदेवळी : शहरालगतच्या अंदोरी फाट्यावर ट्रकने दुचाकीला धडक दिली. यात भिडी येथील प्रशांत प्रभाकर भांडे (३३) हे जागीच ठार झाले. ही घटना रविवारी उघड झाली. प्राप्त माहितीनुसार, प्रशांत भांडे व त्याचा सहकारी गुणवंत उंबरकर हे दोघे एमएच ३२ एच ०६९४ क्रमांकाच्या दुचाकीने दोघे कामानिमित्त देवळीकडे जात होते. दरम्यान अंदोरी फाट्यावर अज्ञात ट्रकने त्यांच्या दुचाकीला धडक दिली. या जरब झालेल्या धडकेत दुचाकीचे समोरील चाक गाडीपासून वेगळे झाले. यात प्रशांतचा जागीच मृत्यू झाला.(प्रतिनिधी)
विरूळ (आकाजी) येथे विद्यार्थिनीला चिरडले
By admin | Published: September 15, 2015 4:39 AM