राज्यातील विविध जिल्ह्यातील ७०० विद्यार्थ्यांचा समावेश कारंजा(घा.) : राज्यस्तरीय युसीमास अॅबॅकस स्पर्धेचे आयोजन महर्षी व्यास सभागृह नागपूर येथे झाले होते. या स्पर्धेत पुसद, कारंजा, काटोल, आर्वी, वर्धा, आष्टी, नागपूर, गोंदिया, मलकापूर, तेल्हारा या महाराष्ट्राच्या कनाकोपऱ्यात ७०० विद्यार्थी सहभागी झाले. ज्यात जिनिअस किड्स अॅकेडमीचा विद्यार्थी रूद्रांश लोखंडे हा चॅम्पीयन आॅफ चॅम्पीयन ठरला आहे. कारंजा येथील पल्लवी शेंदुरकर ही चॅम्पीयन ठरली. प्रथम क्रमांक तेजस्वीनी कामडी, हर्ष बनवाडे, टिना बारंगे, द्वितीय क्रमाक प्रथमेश प्रांजळे, जतीन भांगे, श्याम खेनवार, रिया तिवारी, तृतीय क्रमांक रियांशु पाचपोहर, विनित राक्षे, मानसी ताकसांडे, श्रेयाली बैंगणे, समर भांगे सर्व विद्यार्थ्यांना अवघ्या आठ मिनिटात २०० गणित सोडवून या स्पर्धेत यशाची मुद्रा उमटवली. वैदही भस्मे, निहारिका हाडे, कस्तुरी मस्की, फाल्गुनी मस्की, वेदिका मस्की, रिया भांगे, नयन भांगे, डिम्पल बारंगे, ओम चौधरी, वैभव देवासे, यथार्थ कोठारी, दक्ष बोकडे, नित्या डोबले, यश चौधरी, धृवी मोटवाणी, आशुतोष देवासे, समर्थ घाडगे, प्रणव माहुरे, यश कोठारी, वृषाली डिग्रसे, समिक्षा कडवे, दिपाली भांगे, अस्मीता हाडे, वैष्णवी शिवणकर, मंथन मस्के, मानस प्रांजळे हे सर्व विद्यार्थी मिरीट मध्ये आहे. सर्वोत्कृष्ट निकाल दिल्यामुळे दिनेश मस्के व शोभना मस्के या दाम्पत्यांना सन्मानित करण्यात आले. सर्व मुलांनी आपल्या यशाचे श्रेय आई-वडील व शिक्षिका अर्चना जैस्वाल यांना दिले. सर्वच विद्यार्थ्यांचे कौतुक होत आहे.(तालुका प्रतिनिधी)
विद्यार्थ्यांनी उमटवली यशाची मुद्रा
By admin | Published: March 11, 2017 12:43 AM