लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : स्थानिक केसरीमल कन्या शाळेतील इयत्ता पाचवीच्या विद्यार्थिनीचा प्रामाणिकपणा पाहून शाळेच्या प्राचार्य भारावून गेल्या. बालपणापासून पालक व शिक्षकांनी दिलेल्या संस्कारामुळे ही घटना घडली, अशी प्रतिक्रिया प्राचार्या जयश्री कोटगीरवार यांनी व्यक्त केली आहे.कार्याजंली उत्सवात केसरीमल कन्या शाळेचे शिक्षक हिरहिरीने भाग घेत आहेत. सुजाता जोशी यांना पिसथनमध्ये भाग घ्यायचा होता. आॅनलाईन रजिस्ट्रेशन करताना अडचण सोडविण्यासाठी जोशी या मुख्याध्यापिकेकडे आल्या. तेवढ्यात दहा-बारा वर्षाची ५ वीत शिकणारी मुलगी प्राचार्यांना आत येवू का, असे विचारत होती. तिच्या हातात ५०० रूपयाची नोट होती. त्यापूर्वी प्राचार्यांनी घरातील ठेवून असलेल्या तीन स्कूल बॅग शाळेतील काही गरजू विद्यार्थ्यांना देण्याचे ठरविले होते. त्यानुसार १८ सप्टेंबरला तीन पैकी दोन स्कूल बॅग शाळेच्या दोन विद्यार्थिनींना वितरीत करण्यात आल्या होत्या व एक बॅग शाळेत ठेवण्यात आली होती. पाचवीच्या वर्गशिक्षीकेला बोलावून वर्गात दप्तर नसलेल्या दोन मुलींची निवड करून त्यांना दप्तर द्या, असे प्राचार्यांनी सांगितले होते.या दोनही मुलींनी दप्तर दिल्यानंतर त्यापैकी वैष्णवी मारोतराव मोहुर्ले या मुलीला मिळालेल्या दप्तराच्या बॅगमध्ये ५०० रूपयाची नोट सापडली होती. ती नोट परत आणून देण्यासाठी ती प्राचार्यांना आता येवू का म्हणून परवानगी मागत होती. तिचा हा प्रामाणीकपणा पाहून प्राचार्या काही वेळ भारावूनच गेल्या.या घटनेने आजही प्रामाणीकता जीवंत असल्याचा परिचय प्राचार्या कोटगीरवार यांना आला. तिला बालपणापासून पालक व शिक्षकांनी दिलेल्या संस्कारामुळे हे शक्य होवू शकले, अशी प्रतिक्रिया प्राचार्यांनी व्यक्त केली आहे.तिसरी बॅगही वैष्णवीला दिली भेटवैष्णवीचा प्रामाणिकपणा पाहून भारावलेल्या प्राचार्य जयश्री कोटगीरवार यांनी त्या विद्यार्थीनीला त्यांच्याजवळ शिल्लक असलेली तिसरी बॅग भेट म्हणून दिली तिचे विद्यार्थ्यासमोर कौतुकही केले.या घटनेमुळे शाळेतील इतर विद्यार्थ्यानी नवा आदर्श निर्माण होईल असा आशावाद त्यांनी व्यक्त केला. शाळेच्यावतीने वेळोवेळी विद्यार्थीनी करीता व्यक्तीमत्व विकासाचे शिबीर घेऊन त्यांच्यावर चांगले संस्कार केले जातात यामुळे अशा घटना सुखद आनंद देवून जातात, असे त्या म्हणाल्या.
विद्यार्थिनीचा प्रामाणिकपणा; प्राचार्या भारावल्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 20, 2018 9:23 PM
स्थानिक केसरीमल कन्या शाळेतील इयत्ता पाचवीच्या विद्यार्थिनीचा प्रामाणिकपणा पाहून शाळेच्या प्राचार्य भारावून गेल्या. बालपणापासून पालक व शिक्षकांनी दिलेल्या संस्कारामुळे ही घटना घडली, अशी प्रतिक्रिया प्राचार्या जयश्री कोटगीरवार यांनी व्यक्त केली आहे.
ठळक मुद्देकेसरीमल कन्या शाळेतील घटना : दोन विद्यार्थिनींना दिली स्कूल बॅग