दोन महिन्यांपासून साहित्य नाही : शिक्षकांना तात्पुरती व्यवस्था करण्याच्या सूचना रूपेश खैरी वर्धाशासनाकडून साहित्य पुरविण्यात आले नसल्याने गत दोन महिन्यांपासून राज्यभरातील विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहार मिळाला नाही. हे साहित्य पुरविण्याकरिता असलेल्या कंत्राटदाराला अद्याप परवानगी नसल्याने ही अवस्था झाल्याचे पुढे आले आहे. शाळेतील चिमुकल्यांवर आहारापासून वंचित राहण्याची वेळ येवू नये, याकरिता वर्धेत जि.प. मुख्यकार्यपालन अधिकाऱ्यांनी शिक्षकांना त्यांच्या स्तरावर पोषण आहाराची व्यवस्था करण्याच्या सूचना केल्या आहेत.जिल्हा परिषद शाळेची घटती पटसंख्या व गावातील स्थितीवर मार्ग काढण्याकरिता शासनाच्यावतीने शालेय पोषण आहार योजना अंमलात आणली. ही योजना अंमलात आली त्या काळापासून ती वादाचीच अधिक ठरल्याचे समोर आले आहे. कधी शाळांना मिळणाऱ्या तांदळाचा दर्जा तर कधी इतर साहित्याचा असलेला तुटवडा यामुळे सदैव चर्चा झाली. आता साहित्य पुरविण्याकरिता असलेल्या कंत्राटदाराच्या पुरवानगीचा मुद्दा समोर आला आहे. जिल्ह्यातच नव्हे तर राज्यात आहाराचे साहित्य पुरविल्या गेले नसल्याने आॅगस्ट व सप्टेंबर महिन्यात अद्यापपर्यंत पोषण आहार योजना बंदच असल्याचे दिसून आले आहे.उपलब्ध होते नव्हते साहित्य संपले जिल्ह्यात १,२५५ शाळा शासनाच्यावतीने पुरविण्यात येत असलेल्या पोषण आहाराच्या साहित्याचे वाटप जिल्हा परिषद, नगर परिषद व अनुदिानित खासगी शाळांना पुरविण्यात येते. जिल्ह्यात अशा एकूण १ हजार २५५ शाळा आहेत. यात शालेय पोषण आहार आला नसल्याने या शाळेतील विद्यार्थ्यांना पोषण आहारापासून वंचित राहण्याची वेळ आली आहे. रोख किंवा उधारीवर तांदूळ खरेदीच्या सूचना शासनाच्यावतीने शालेय पोषण आहार पुरविण्यास अडचणी निर्माण होत असल्याने शिक्षकांनी त्यांच्या स्तरावर विद्यार्थ्यांना पोषण आहार देण्यासंदर्भात सूचना केल्या आहेत; मात्र गत वर्षापासून शिक्षकांच्या वेतनात नियमितता नसल्याने त्यांची आर्थिक स्थिती ढासळल्याचे बोलले जात आहे. शिक्षकांनी त्यांच्या संबंधातील व्यवसायिकाकडून रोख अथवा उधारीत तांदूळ खरेदीच्या सूचना सीईओंनी दिल्या आहेत. शालेय पोषण आहार योजना राबविण्याकरिता शासनाच्यावतीने साहित्य पुरविले जात आहे. यात बऱ्याच शाळांत विद्यार्थी संख्या कमी अधिक होत असल्याने काही प्रमाणात साहित्य शिल्लक राहते. यामुळे शिक्षकांकडून त्या साहित्याचा वापर करून विद्यार्थ्यांना पोषण आहार पुरविण्यात आला. आज शाळेतील शिल्लक साहित्य पुर्णत: संपले आहे. यामुळे विद्यार्थ्यांना आता आहार कसा द्यावा, असा प्रश्न त्यांना पडला आहे.
परवानगीत अडकला विद्यार्थ्यांचा पोषण आहार
By admin | Published: September 04, 2015 2:03 AM