शहरं
Join us  
Trending Stories
1
हातात संविधानाची प्रत घेत प्रियंका गांधी यांनी घेतली लोकसभा सदस्यत्वाची शपथ  
2
Dada Bhuse : एकनाथ शिंदेंची माघार; दादा भुसे यांना उपमुख्यमंत्रिपदाची लॉटरी लागणार?
3
Sanjay Raut : "...तर त्यांनी हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंचं नाव घेऊ नये"; संजय राऊत कडाडले
4
"१२ तासांची शिफ्ट, सुटी नाही, सेटवरचं शेड्यूल खूप..."; अभिनेत्रीने सांगितला TV चा ड्रॉबॅक
5
धाड पडताच ईडीच्या टीमवर हल्ला, ईडीचे संचालक जखमी; दिल्लीतील धक्कादायक घटना
6
"त्या दोघांचं अफेयर...", कंगना राणौत-आदित्य पांचोलीच्या एक्स्ट्रा मॅरिटल अफेयर्सवर जरीना वहाबचा धक्कादायक खुलासा
7
Air India Express 'या' शहरांसाठी नवीन उड्डाणे सुरू करणार!
8
Maharashtra Politics : महाविकास आघाडीच्या प्रयोगाचा सर्वाधिक तोटा कोणाला झाला? काय सांगते आकडेवारी
9
KL राहुल की अक्षर पटेल? कुणाच्या गळ्यात पडणार कॅप्टन्सीची माळ? DC संघ मालकाने दिली हिंट
10
HAL, IREDA सह 'या' स्टॉक्सवर ब्रोकरेज बुलिश, खरेदीचा सल्ला; तेजी कायम राहण्याची शक्यता, तुमच्याकडे आहेत?
11
धावत्या ट्रेनमधून पडला मुलगा, पाठोपाठ घाबरलेल्या आईने मुलीसह खाली मारली उडी
12
'सिंघम अगेन'बद्दल नाना पाटेकरांचं रोखठोक मत; म्हणाले - "बाकीच्या लोकांच्या कुबड्या घेण्याची..."
13
...म्हणून तिनं अखेरचा कॉल केला; एअर इंडिया महिला पायलटच्या मृत्यूआधी काय घडलं?
14
IND vs AUS : ॲडलेड टेस्ट आधी कॅनबेरात काय करतीये टीम इंडिया? BCCI नं शेअर केला व्हिडिओ
15
भयंकर! श्रद्धा हत्याकांडाची पुनरावृत्ती; लिव्ह इन गर्लफ्रेंडचे ५० तुकडे केले अन् जंगलात फेकले
16
'पुष्पा २' प्रमोशनमधून फहाद फासिल गायब; अल्लू अर्जुन म्हणाला, "त्याच्यासोबत काम करणं..."
17
Adani Group Stocks: अदानी समूहाच्या शेअर्समध्ये सलग दुसऱ्या दिवशी बंपर तेजी; १०% पर्यंत स्टॉक्स वधारले
18
Reshma Shinde : 'रंग माझा वेगळा' फेम रेश्मा शिंदे या दिवशी बांधणार लग्नगाठ, मेहंदीच्या फोटोतून मिळाली हिंट
19
रेल्वेतील चादरी आणि ब्लँकेट किती दिवसांनी धुतात, रेल्वे मंत्र्यांनी काय दिले उत्तर?
20
Honda ACTIVA e चे बुकिंग कधीपासून सुरू होणार? जाणून घ्या स्कूटरची रेंज आणि फीचर्स...

एसटीअभावी विद्यार्थ्यांची पायपीट

By admin | Published: September 17, 2016 2:23 AM

परिवहन महामंडळाच्या बसगाड्या केव्हाही रस्त्याने बंद पडतात यात किंचितही शंका नाही.

बसफेरी होते वेळीच रद्द : पडेगाव ते चिकणी पायी प्रवासचिकणी (जामणी) : परिवहन महामंडळाच्या बसगाड्या केव्हाही रस्त्याने बंद पडतात यात किंचितही शंका नाही. असा कोणत्याही क्षणी रद्द होणाऱ्या एसटीचा फटका काय असतो, हे पडेगाव येथील विद्यार्थ्यांव्यतिरिक्त कोणीच सांगू शकत नाही. देवळी येथे शिक्षणाकरिता जाणाऱ्या या विद्यार्थ्यांना वेळप्रसंगी पायी जात दुसरे गाव गाठण्याची वेळ येते. पडेगाव या गावाची लोकसंख्या जवळपास दोन हजारावर आहे. गावात कुठलीही उच्च शिक्षणाची सोय नसल्याने येथील विद्यार्थी देवळी येथे शिक्षणाकरिता जातात. येथे जाण्याकरिता या विद्यार्थ्यांना एसटी बस शिवाय दुसरा मार्ग नाही. येथे वर्धा आगाराची वर्धा-राळेगाव (यशवंती) ही बस येते; परंतु ही बस आठवड्यात दोन ते तीन दिवस येतच नाही. यात कडी म्हणजे ही बस सदा नादुरुस्तच राहते. या बसची वेळ सकाळी ७ वाजताची आहे. म्हणून विद्यार्थी साडेसात वाजेपर्यंत वाट बघतात. बस न आल्यामुळे त्यांना चिकणी येथे यावी यावे लागते. चिकणीला येवून सुद्धा तासनतास थांबावे लागते. यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. हे नुकसान होऊ नये व विद्यार्थ्यांची पायपीट थांबावी याकरिता राज्य परिवहन मंडळाने येथे सुरळीत बससेवा देण्याची मागणी पालकांची आहे.(वार्ताहर)