लोकमत न्यूज नेटवर्कआष्टी (शहीद) : जिल्हा परिषद बांधकाम उपविभाग आर्वीचे उपविभागीय अभियंता अनिल भडांगे यांनी निवासस्थानासाठी चक्क गोदामाचा वापर केला आहे. शासनाला रहिवाशी पत्ता म्हणून वाहनचालक बकाराम गाडगे याच्या निवासस्थानाचा पत्ता दिला. याची तक्रार होताच कार्यकारी अभियंता तेलंग यांनी त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावत वेतनातून दोन वर्षाचा घरभाडे भत्ता कापण्याचे आदेश निर्गमित केले आहे. कार्यकारी अभियंता तेलंग यांनी बजावलेल्या नोटीसीत गाडीचे लॉगबुक तात्काळ सादर करून सहायक लेखा अधिकारी बांधकाम यांच्याकडे तपासणीस द्यावी, शासकीय निवासस्थानात आपले वास्तव्य असताना सुध्दा दमरहा वेतनात देय असलेला घरभाडे भत्ता स्वीकारला. याचा तीन दिवसात खुलासा सादर करावा अन्यथा वरिष्ठांकढे कार्यवाहीचा प्रस्ताव सादर करण्यात येणार असल्याचे नमुद आहे. प्रकरणाची कुणकुण लागताच उपअभियंता भडांगे १३ जुलैपासून रजा टाकून नाशिक येथे निघून गेले आहे. त्यामुळे प्रकरणामध्ये काय कारवाई होते याकडे जिल्हा परिषदेचे लक्ष लागले आहे. भाड्याच्या नावावर ६८ हजारांचा अपहारकार्यकारी अभियंत्याने बजावली नोटीसगोदामाचा वापर करून घरभाडे भत्त्यापोटी उपविभागीय अभियंता भडांगे यांनी ६८ हजारांचा अपहार केला. याप्रकरणी कारणे दाखवा नोटीस बजावली, चौकशी सुरू आहे. - अनिल तेलंग, कार्यकारी अभियंता, जिल्हा परिषद, वर्धा.आधीचे सर्व अधिकारी या गोदामातून राहायचे. कार्यकारी अभियंत्यांनी आधी सर्वांकडून घरभाडे भत्ता वसुल करावा मगच मी भरून देईल. ठेकेदारांना सोबत घेवून कामे करावीच लागतात. मला तक्रारीचा फरक पडत नाही. - अनिल भडांगे, उपविभागीय अभियंता, जि.प. बांधकाम उपविभाग, आर्वी.
उपविभागीय अभियंत्याचा प्रताप गोदाम दाखविले निवासस्थान
By admin | Published: July 17, 2017 2:05 AM