लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : मागील काही दिवसांपासून मान्सूनच्या आगमनाबाबद हवामान खाते सातत्याने खोटी माहिती देत आहे. त्यामुळे जिल्ह्यासह राज्यातील शेतकऱ्यांच्या अडचणीत भर पडली आहे. हवामान खात्याच्या तुगलकी कारभारामुळे शेतकऱ्यांची फसवणूक होण्याची भीती असल्याने हवामान खात्याच्या अधिकाऱ्यांविरुद्ध फौजदारी कारवाई करण्यात यावी, अशी मागणी प्रहारच्यावतीने करण्यात आली आहे. तसे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना सादर करण्यात आले आहे.मागील काही दिवसांपासून हवामान खाते रोज काहीतरी खोटनाट बोलून शेतकरी व जनतेची बोळवण करीत आहे. मागील एक महिन्यांपासून आज किंवा उद्या पाऊस येईल, सहा दिवसांनी मान्सूनचे आगमन होईल, असे सांगत आहे. तर कधी १५ जुलै नंतर पावसाची शक्यता याच हवामान खात्याने वर्तविली होती. हवामान खात्याकडून जाहीर करण्यात आलेल्या माहितीमुळे काही शेतकऱ्यांनी कपाशीची लावण केली आहे. परंतु, अद्यापही जोरदार पाऊस जिल्ह्यात झालेला नाही. हवामान खाते उलटसुटल माहिती देऊन शेतकऱ्यांच्या अडचणीत भर टाकत असल्याने यावर्षीही शेतकऱ्यांना नापिकी तसेच दुबार पेरणीच्या संकटाला सामोरे जावे लागू शकते. त्यामुळे खोटे बोलणाऱ्या हवामान खात्याच्या अधिकाऱ्यांवर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. निवेदन देताना प्रहारचे जिल्हाध्यक्ष विकास दांडगे, भुषण येलेकार, वैभव शेंडे, रोशन दाभाडे, दादा बोरकर, प्रशिल धांदे, शुभम भोयर, प्रितम कातकीडे, नितीन काटकर, सचिन कोळसे, विवेक ठाकरे, बीपीन मोघे आदींची उपस्थिती होती.
हवामान खात्याच्या अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 21, 2019 11:42 PM
मागील काही दिवसांपासून मान्सूनच्या आगमनाबाबद हवामान खाते सातत्याने खोटी माहिती देत आहे. त्यामुळे जिल्ह्यासह राज्यातील शेतकऱ्यांच्या अडचणीत भर पडली आहे. हवामान खात्याच्या तुगलकी कारभारामुळे शेतकऱ्यांची फसवणूक होण्याची भीती असल्याने हवामान खात्याच्या अधिकाऱ्यांविरुद्ध फौजदारी कारवाई करण्यात यावी, अशी मागणी प्रहारच्यावतीने करण्यात आली आहे.
ठळक मुद्देप्रहारची मागणी : जिल्हाधिकाऱ्यांना साकडे