शहरं
Join us  
Trending Stories
1
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
2
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
3
२०१४ ला भाजपाला त्यांची खरी ताकद कळली, अन् त्यानंतर वाढतच गेली!.. जाणून घ्या काय घडलं?
4
"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार
5
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल
6
गावाकडे पण, इकडे शहरातपण यादीत नाव ...! राज्यातील दहा मतदारसंघात नवी मुंबईकरांची नावे
7
Champions Trophy Tour: पाकचा डाव फसला! BCCI च्या आक्षेपानंतर ICC नं सेट केला कार्यक्रम
8
मणिपूरमधील जिरीबाममध्ये तीन मृतदेह सापडले, मंत्री आणि आमदारांच्या निवासस्थानाबाहेर गोंधळ; संचारबंदी लागू
9
पाठिंबा दिलेल्या अपक्ष उमेदवाराला वंचितने दिले चाबकाचे फटके, काळेही फासले; असे का घडले...
10
IND vs AUS: टीम इंडियात बदल होणार? संघात या दोघांना मिळू शकते 'वाइल्ड कार्ड' एन्ट्री
11
दिलीप वळसे, मुश्रीफांना पाडण्याचे शरद पवारांचे आवाहन; अजितदादांवर म्हणाले, "तिथं काय बोलणार..."
12
भाजपानं घोषित केलेली 'भावांतर योजना' गेमचेंजर ठरणार?; शेतकर्‍यांची चिंता मिटणार
13
पत्रकार गुलाम आहेत; अमरावतीच्या सभेत राहुल गांधींचं विधान; पत्रकारांनी व्यक्त केला संताप
14
'बंटोगे तो कटोगें'वर कंगना यांचा घुमजाव; आधी म्हणाली, "हा विरोधकांचा मुद्दा" अन् नंतर...
15
भाजपच्या किती जागा येणार? जयंत पाटलांनी सांगितला आकडा; केली मोठी भविष्यवाणी!
16
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिराळा विधानसभेत टफ फाईट! सत्यजीत देशमुख की मानसिंगराव नाईक,कोण मारणार बाजी?
17
भारताने ब्रिटनच्या अर्थव्यवस्थेला मागे टाकले! माजी पंतप्रधान लिज ट्रस म्हणाल्या, "पश्चिमात्य देशांची प्रतिष्ठा संकटात"
18
त्यांना बॅगा, खोके पुरत नाहीत, कंटेनर लागतो; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्ला
19
धारावीची जमीन अदानींना द्यायची होती म्हणून सरकार चोरले; राहुल गांधींचा भाजपवर आरोप
20
'मिस्टर इंडिया'तील ही क्युट टीना आठवतेय का? आता तिला ओळखणं झालंय कठीण

निराधारांचे अनुदान तत्काळ जमा करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 11, 2019 10:09 PM

शासनाच्यो निराधार व गरीबांसाठी अनेक योजना आहे. परंतु दफ्तर दिरंगाईमुळे या योजनांचा लाभ लाभार्थ्यांना वेळेत मिळत नाही. त्यामुळे निराधारांना त्रास सहन करावा लागतो. याबाबत लोकमतने वृत्त प्रकाशित करताच या वृत्ताची दखल घेत आमदार डॉ. पंकज भोयर यांनी बैठक बोलावून निराधारांचे अनुदान त्यांच्या बँक खात्यात तत्काळ जमा करावे, असे निर्देश तहसीलदार सोनवणे यांना दिले.

ठळक मुद्देआढावा बैठक : आमदारांनी तहसीलदारांना दिले निर्देश

लोकमत न्यूज नेटवर्कघोराड : शासनाच्यो निराधार व गरीबांसाठी अनेक योजना आहे. परंतु दफ्तर दिरंगाईमुळे या योजनांचा लाभ लाभार्थ्यांना वेळेत मिळत नाही. त्यामुळे निराधारांना त्रास सहन करावा लागतो. याबाबत लोकमतने वृत्त प्रकाशित करताच या वृत्ताची दखल घेत आमदार डॉ. पंकज भोयर यांनी बैठक बोलावून निराधारांचे अनुदान त्यांच्या बँक खात्यात तत्काळ जमा करावे, असे निर्देश तहसीलदार सोनवणे यांना दिले.स्थानिक विश्रामृहात आमदार डॉ. पंकज भोयर यांनी संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ योजना अनुदान संदर्भात बैठक घेतली. बैठकीला तहसीलदार सोनवणे, नायब तहसीलदार तीनघसे, संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्ष हरीश पारिसे, सदस्य तथा भाजप तालुकाध्यक्ष अशोक कलोडे, रवींद्र शेळके, अशोक रतनवार, मोहन मसराम, ज्योती सुर्वे, विश्वेश्वर खोबे, राजू उडाण, वामन चौधरी, विजय खोडे आदींची उपस्थिती होती. यावेळी आमदार डॉ. भोयर यांनी संजय गांधी निराधार योजना व श्रावणबाळ योजनेचा आढावा घेतला. दोन्ही योजनांचे अनुदान राज्य शासनाकडून प्राप्त झाले असताना अद्याप अनुदानाचे वाटप झाले नसल्याबाबत विचारणा केली. तहसीलदारांनी या योजनांचे देयक तयार करण्याचे कार्य सुरू असून काही देयक कोषागारात येत्या दोन दिवसांत पाठविण्यात येईल, असे सांगितले. अनुदानाचे वाटप करताना कुठल्याही प्रकारची कुचराई न करता तत्काळ प्रत्येक लाभार्थ्याच्या खात्यात रक्कम करा तसेच संजय गांधी निराधार, श्रावणबाळ योजना, वृद्धापकाळ योजना, रेशनकार्ड व वर्ग २ च्या शेतजमिनी वर्ग १ मध्ये करण्यासाठी तातडीने शिबिर घेण्यात यावे, असे निर्देश दिले. त्यानुसार तहसीलदार सोनवणे यांनी १६ जुलैला सेलू, १९ ला हिंगणी, २२ ला केळझर, २५ ला येळाकेळी तर २७ ला झडशी येथे शिबिराचे आयोजन करण्यात येणार असल्याचे सांगितले.

टॅग्स :Tahasildarतहसीलदार