लोकमत न्यूज नेटवर्कसेलू : नॅक मूल्यांकनाची पध्दती म्हणजे एक प्रकारे परीक्षाच होय तेव्हा नॅक मूल्यांकन रूपी परीक्षेत शहाणपण, चतुरता व कल्पकता या त्रिसूत्रीच्या माध्यमातून यश संपादन करता येऊ शकते, असे प्रतिपादन राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सिध्दार्थविनायक काणे यांनी केले.स्थानिक विद्याभारती महाविद्यालय सेलू येथे आयोजित दोन दिवसीय राष्ट्रीय चर्चासत्राच्या उद्घाटन समारंभात ते बोलत होते. चर्चासत्राच्या अध्यक्षस्थानी विद्याभारती संस्थेचे अध्यक्ष डॉ.आर.जी.भोयर होते. तर प्रमुख अतिथी म्हणून कुलगुरू डॉ.सिध्दार्थविनायक काणे , महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय एस.कानोडे, चर्चासत्राचे संयोजक डॉ.आशिष टिपले व प्रा.वैभव पिंपळे उपस्थित होते. प्रास्ताविक प्राचार्य डॉ.संजय एस कानोडे यांनी केले. चर्चासत्राची आवश्यकता विशद करतांनाच ग्रामीण भागातील महाविद्यालयांकरिता सदर चर्चासत्र उपयुक्त ठरेल असा विश्वास व्यक्त केला. तर उद्घाटनीय भाषणातून डॉ.सिध्दार्थविनायक काणे यांनी रा.तु.म.नागपूर विद्यापीठात विविध पदांंवर काम करतांनाचे अनुभव कथन करतांनाच नॅक मूल्यांकन प्रणाली व नॅक संस्थेवर प्रकाश टाकला. नॅक संस्थेव्दारे करण्यात येणारे मूल्यांकन विद्यापीठ व महाविद्यालयांसाठी अत्यंत महत्वपुर्ण प्रक्रिया आहे. त्यामुळे निश्चितच विद्यापीठांचा व महाविद्यालयांचा दर्जा सुधारणार आहे परंतु या संपूर्ण प्रक्रिये दरम्यान काही महत्वाच्या गोष्टींचा विचार होणे अपेक्षित आहे. त्या अनुषंगाने ग्रामीण व शहरी भागातील महाविद्यालयांची पार्श्वभूमी लक्षात घेऊन मूल्यांकन होणे आवश्यक आहे असे मत डॉ.आर.जी.भोयर यांनी व्यक्त केले. दुसऱ्या दिवशी पूणे विद्यापीठाचे डॉ. शिरीष चिंधाडे, डॉ. व्ही. आर. शिंगुस्कर पूणे यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रा.वसीम खान यांनी केले तर आभार डॉ.आशिष टिपले यांनी मानले. सदर चर्चासत्राकरिता विविध राज्यातून तसेच राज्यातील मुंबई, नागपूर, अमरावती, गोंडवाना, पुणे या सारख्या महत्वपुर्ण विद्यापीठासह इतरही विद्यापीठातील प्राचार्य, प्राध्यापक व आय.क्यू.ए.सी प्रमुखांची मोठ्या संख्येने उपस्थिती लाभली. यावेळी अनेक प्राध्यापकांनी आपले शोधनिवंध या चर्चासत्रात सादर केले. त्यावर मंथन करण्यात आले.
त्रिसूत्रीच्या माध्यमातून यश संपादन करता येते
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 07, 2019 12:10 AM
नॅक मूल्यांकनाची पध्दती म्हणजे एक प्रकारे परीक्षाच होय तेव्हा नॅक मूल्यांकन रूपी परीक्षेत शहाणपण, चतुरता व कल्पकता या त्रिसूत्रीच्या माध्यमातून यश संपादन करता येऊ शकते, असे प्रतिपादन राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सिध्दार्थविनायक काणे यांनी केले.
ठळक मुद्देसिध्दार्थविनायक काणे : दोन दिवसीय राष्ट्रीय चर्चासत्र