शहरं
Join us  
Trending Stories
1
"खोलीत क्षेपणास्त्रे, गॅरेजमध्ये रॉकेट ठेवणाऱ्यांकडून...", हवाई हल्ल्यादरम्यान नेतन्याहू यांचा लेबनॉनला संदेश
2
भाजपच्या 'इलेक्शन मोड'साठी अमित शाहांची दहा सूत्री 'ब्ल्यू प्रिंट'!
3
'लाडक्या बहिणी' कमळाला मत देतील, म्हणून हा जुगाड; भाजप आमदाराचा व्हिडीओ वडेट्टीवारांकडून पोस्ट!
4
...अन् बलात्कारी, मर्डरर अमरसिंग ठाकूरचे एन्काऊंटर थोडक्यात हुकले!
5
राहुल गांधींचा पासपोर्ट रद्द करा... भाजप खासदाराचे लोकसभा अध्यक्षांना पत्र 
6
अंगावर डिझेल ओतून पेटवून घेण्याचा प्रयत्न, घरकुलाच्या जागेच्या मोजणीवरून वाद
7
अक्षय शिंदेच्या एन्काउंटरची सीआयडी व न्यायालयीन चौकशी केली जाणार 
8
माजी पोलीस महासंचालक म्हणाले, तर हे एन्काऊंटरच घडले नसते!
9
सर्वसामान्यांचे ₹ 1.8 लाख कोटी लुटणाऱ्यांची नावे उघड करा; राहुल गांधींचा SEBI वर हल्लाबोल
10
रशिया-युक्रेन युद्ध संपणार का? PM मोदी आणि झेलेन्स्कींची तीन महिन्यांत तिसऱ्यांदा भेट...
11
"मग नंतर तो कधी शिकणार?"; यशस्वी जैस्वालबद्दल पाकिस्तानी माजी क्रिकेटरचं रोखठोक मत
12
बदलापूर प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेचा मृतदेह अखेर नातेवाईक घेणार ताब्यात
13
"...तर विरोधकांचाही 'त्या' एन्काउंटरला पाठिंबा असेल"; नाना पटोलेंनी शिंदे सरकारला दिलं चॅलेंज
14
निवडणुकीदरम्यान मतभेद बाजूला ठेवा, गटबाजी खपवून घेणार नाही, अमित शाहांनी टोचले कान
15
Gayatri Shingne : राजेंद्र शिंगणेंविरोधात पवारांचा उमेदवार ठरला? गायत्री शिंगणे लढवणार विधानसभा!
16
राज्यातील विविध तीर्थक्षेत्र विकासांच्या ३०५ कोटी रुपयांच्या आराखड्यांना मंजुरी
17
६ लाख मोबाईल फोन बंद, ६५ हजार URLs ब्लॉक... सायबर फ्रॉड रोखण्यासाठी सरकारची मोठी कारवाई
18
जयंत पाटलांचं अजित पवारांना नवं चॅलेंज; "मोदींकडून एवढं काम करून घेतलं, तर..."
19
जोगेश्वरी पूर्व विधानसभा मतदारसंघावरून शिवसेना शिंदे गट आणि भाजपात रस्सीखेच
20
"आम्हा तिघांनाही CM व्हायचंय, पण निर्णय हायकमांडचा", रणदीप सुरजेवालांनी केले मोठे वक्तव्य

अंगणवाडी सेविकांची मानधनवाढ संघटनेच्या पाठपुराव्याचे यश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 30, 2018 10:39 PM

अंगणवाडी कर्मचाऱ्यांना एप्रिल महिन्यापासून ५ टक्के मानधन वाढ लागू करण्यात येणार आहे. याबाबत शासनाने २७ एप्रिल रोजी आदेश काढल्याने दिलासा मिळाला आहे. आयटक व अंगणवाडी कर्मचारी कृती समितीच्या सतत पाठपुराव्यामुळे हे यश पदरी पडल्याचा सूर बैठकीतून निघाला.

ठळक मुद्देबोरगाव (मेघे) येथील आयटकच्या बैठकीचा सूर

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : अंगणवाडी कर्मचाऱ्यांना एप्रिल महिन्यापासून ५ टक्के मानधन वाढ लागू करण्यात येणार आहे. याबाबत शासनाने २७ एप्रिल रोजी आदेश काढल्याने दिलासा मिळाला आहे. आयटक व अंगणवाडी कर्मचारी कृती समितीच्या सतत पाठपुराव्यामुळे हे यश पदरी पडल्याचा सूर बैठकीतून निघाला. आयटक संघटनेची बैठक सुरेश गोसावी यांच्या अध्यक्षतेत व आयटक राज्य सचिव दिलीप उटाणे यांच्या उपस्थितीत बोरगाव (मेघे) येथील कार्यालयात पार पडली.बैठकीत १ मे कामगार दिन तथा अंगणवाडी कर्मचाºयांना पाच टक्के मानधन वाढ याबाबत चर्चा करण्यात आली. अंगणवाडी कर्मचाºयांना न्याय मिळवून देणारे आयटक नेते दिलीप उटाणे व सर्व अंगणवाडी कर्मचारी कृती समितीचे निमंत्रक यांच्याप्रती समाधानही व्यक्त करण्यात आले. शासनाने वार्षिक मानधन वाढ १० टक्के द्यावी, अशी मागणी आयटक व कृती समितीने केली होती. एक महिना संप केल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी मध्यस्ती करून आॅक्टोबर २०१८ पासून सेवा ज्येष्ठनेनुसार मानधन वाढ केली. प्रत्येक वर्षी ५ टक्के मानधन वाढ देण्याचे मान्य केले होते; पण शासन आदेश निर्गमित कररण्यात आलेला नव्हता. यासाठी कृती समितीच्यावतीने विधानसभेच्या बजेट अधिवेशनावर २७ मार्च रोजी मोर्चा काढला होता. तब्बल एक महिन्यानंतर शासन आदेश निर्गमित काढण्यात आल्याने अंगणवाडी कर्मचाºयांना दिलासा मिळाला आहे.या निर्णयाबाबत मुख्यमंत्री तथा महिला व बाल विकास मंत्री यांच्याबद्दल महाराष्ट्र राज्य अंगणवाडी बालवाडी कर्मचारी युनियन आयटक वर्धा जिल्हा शाखेच्यावतीने विजया पावडे, असलम पठाण, वंदना कोळणकर, मैना उईके, मंगला इंगोले, ज्ञानेश्वरी डंबारे, शोभा तिवारी, रंजना तांबेकर, वंदना खोब्रागडे, अल्का भानसे, माला भगत, प्रज्ञा ढाले, सुनंदा आखाडे, विमल कौरती, रेखा काचोरे, शबाना शेख , ज्योती कुलकर्णी, बबीता चिमोटे, सुनीता टिपले, सुरेखा रोहनकर, अरुणा नागोसे, यमूना नगराळे, सीमा गढिया, हिरा बावणे, शोभा सायंकार, इरफाना पठाण आदींनी कृतज्ञता व्यक्त केली.असे असेल वाढीव मानधनआता ९ वर्षांपर्यंत सेवा झालेल्या अंगणवाडी सेविकेला ६८२५ रुपये, १० ते१९ वर्षे सेवेवर ७०९८ रुपये, २० ते २९ वर्षे सेवा दिलेल्यांना ७१६१, ३० वर्षे पुर्ण सेवा देणाºयांना ७२२९ रुपये तर मदतनिसांना १ते ९ वर्षे ३६७५ रुपये, १० ते १९ वर्षे ३७८५ रूपये, २० ते २९ वर्षे ३८२२ व ३० वर्षे ३८५९ रुपये मानधन मिळेल.