पुुरुषोत्तम नागपुरेलोकमत न्यूज नेटवर्कवर्धा: सायकल चालवताना पायात घुसलेली लोखंडी सळई काढून रुग्णाचा पाय वाचवण्यात आर्वी येथील डॉक्टरांना यश आले आहे. विरुळ भागातील कुणाल प्रमोद कुडमेथी या १३ वर्षांच्या मुलाच्या पायात ही सळई मंगळवारी (दि. १०)
घुसली. सायकल शिकत असताना हा अपघात झाला. सायकल चालवताना तो खाली पडला आणि जमिनीवर असलेली ही गंजलेली सळई त्याच्या तळपायात शिरली. या विचित्र परिस्थितीत त्याला आर्वी येथील डॉ. रिपल राणे यांच्याकडे आणण्यात आले. त्याची पूर्ण तपासणी केल्यानंतर त्याच्या पायाची शस्त्रक्रिया करण्याचे ठरविले. त्यानुसार त्याच्या पायावर शस्त्रक्रिया करून डॉ. राणे यांनी त्याच्या पायातील ती सळई बाहेर काढली. या संपूर्ण शस्त्रक्रियेत त्याच्या पायाला कुठलीही अन्य इजा होऊ नये याची त्यांनी काळजी घेतली. शस्त्रक्रियेनंतर रुग्णाला त्याच्या पायावर चालवण्यात आले. डॉक्टरांच्या या यशाबद्दल त्यांचे कौतुक होत आहे व त्यांचे आभार व्यक्त केले जात आहेत.