रमदात्यांवर आयुर्वेदोपचार : पंचकर्म उपचारांचाही उपक्रमलोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : पाणी फाऊंडेशनद्वारे सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धा घेतली जात असून आर्वी तालुक्यातील ५२ गावे झटत आहेत. शारीरिक श्रमाची सवय नसलेले हातही पाणीदार गावांसाठी श्रमदान करीत आहेत. हा उत्साह खंडित होऊ नये म्हणून महात्मा गांधी आयुर्वेद रुग्णालयाने श्रमदात्यांवर आयुर्वेदोपचार व पंचकर्म उपचार करीत अभिनव सहकार्य केले.शारीरिक श्रमाची फारसी सवय नसलेली अनेक मंडळी गावांत पोहोचून श्रमदान करीत आहे. स्वयंसेवी कार्यकर्ते व सहभागी ग्रामस्थांनाही या श्रमांमुळे थकवा येतो. हा थकवा दूर व्हावा म्हणून दत्ता मेघे अभिमत विद्यापीठाद्वारे संचालित महात्मा गांधी आयुर्वेद रुगणालयाद्वारे आयुर्वेदोपचार व पंचकर्म उपचार करण्याचा अभिनव उपक्रम राबवित आहे. काकडदरा या गावात आयुर्वेद रुग्णालयाच्या पथकाने श्रमदानही केले आणि श्रमदात्यांवर आयुर्वेद व पंचकर्म उपचारही केलेत. ही अभिनव मदत पाहून ग्रामस्थ, सामाजिक संस्था, संघटनांचे पदाधिकारी यांचा हुरूप आणखीच वाढत असल्याचे चित्र गावात पाहायला मिळाले.या उपक्रमात संस्थेचे विशेष कार्यकारी अधिकारी अभ्यूदय मेघे आणि अधिष्ठाता डॉ. श्याम भुतडा यांच्या मार्गदर्शनात डॉ. गौरव सावरकर, डॉ. अमोल देशपांडे, डॉ. वाटकर, डॉ. धिरज राजपूत, डॉ. मुजाहिद, डॉ. रवी देशमुख, पदव्युत्तर विद्यार्थी, इटर्न तथा पंचकर्म विभागाच्या १० स्त्री-पुरूष मसाजरनी सहभागी स्वयंसेवकांवर उपचार केलेत. मुख्यमंत्री कार्यालयाचे विशेष कार्यकारी अधिकारी सुमित वानखडे, उपविभागीय अधिकारी प्रकाश शर्मा व विविध संघटनांच्या प्रतिनिधींनी भेट देत या अभिनव उपक्रमाचे कौतुक केले.
पाणीदार गावांसाठी अशीही मदत... श्
By admin | Published: May 16, 2017 1:15 AM