लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : शॉट सर्कीट झाल्याने उमरी येथे चार एकर शेतातील ऊसाला आग लागली. यात अकरा लाख रुपयांचे नुकसान झाले. ही घटना मंगळवारी रात्रीच्या सुमारास येथे घडली.उमरी येथील विजय आनंदराव पोफळे यांनी सर्वे क्र. ३ येथील २ हेक्टर शेतात ऊस लावला आहे. शेतातून गेलेल्या खांबांवरील तार लोंबकळत होते. याबाबत वीज वितरण कंपनीला वारंवार अर्ज व दूरध्वनीद्वारे माहिती देण्यात आली; पण तार व्यवस्थित करण्यात आले नाही. यामुळे ही घटना घडली. डिसेंबर महिन्याच्या अंतिम आठवड्यात या ऊसाची कापणी केली जाणार होती. आगीमध्ये चार एकरातील ऊस जळून खाक झाला. यात सुमारे ७ लाख ७० हजार रुपयांचे नुकसान झाले. शेतातील ४ लाख रुपयांचा ठिबक सिंचन संचही आगीत जळून खाक झाला. महावितरणच्या हलगर्जीमुळे पोफळे यांचे ११ लाख ७० हजार रुपयांचे नुकसान झाले. शेतकऱ्याच्या या नुकसानास वीज वितरण कंपनीचा हलगर्जीपणा जबाबदार आहे. यामुळे शेतकऱ्याला त्वरित नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी विजय पोफळे व परिसरातील शेतकºयांनी केली आहे.
वर्धा जिल्ह्यात शॉट सर्कीटमुळे ऊसाला आग, ११ लाखांचे नुकसान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 07, 2017 10:54 AM
शॉट सर्कीट झाल्याने उमरी येथे चार एकर शेतातील ऊसाला आग लागली. यात अकरा लाख रुपयांचे नुकसान झाले. ही घटना मंगळवारी रात्रीच्या सुमारास येथे घडली.
ठळक मुद्देउमरी येथील घटना भरपाईची मागणी