लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : देवळी पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या एका पोलीस शिपायाने वर्धेतील सुदामपुरी परिसरात असलेल्या राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली. सुधीर वैकुंठ उईके (४०), असे या शिपायाचे नाव आहे. ही घटना रविवारी सकाळी ११.३० वाजताच्या सुमारास उघडकीस आली. त्याच्या आत्महत्येचे कारण मात्र कळू शकले नाही.पोलीस शिपाई सुधीर उईके याने आपल्या खोलीत कुणी नसल्याचे हेरून सिलिंग फॅनच्या हुकला साडीचा गळफास लावून आत्महत्या केली. बराच वेळ झाला; पण सुधीर खोलीबाहेर न आल्याने कुटुंबियांनी त्याच्या खोलीचा दरवाना ठोठावला. आतून कुठलाही प्रतिसाद न मिळाल्याने दारातून आत डोकावून पाहिले असता सुधीर गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला. त्यांनी याची माहिती तात्काळ शहर पोलिसांना दिली. माहिती मिळताच वर्धा ठाण्याचे निरीक्षक चंद्रकांत मदने यांनी चमुसह घटनास्थळ गाठून मृतदेह ताब्यात घेत पंचनामा केला. सुधीरचा मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठविण्यात आला.घटनेची शहर पोलिसांनी नोंद घेतली. वृत्तलिहिस्तोवर सुधीरच्या आत्महत्येचे कारण कळू शकले नाही.वडील सेवानिवृत्त पीएसआय तर भाऊ पोलीस शिपाईमृतक पोलीस शिपाई सुधीर उईके याचे वडील वैकुंठ उईके हे सेवानिवृत्त पोलीस उपनिरीक्षक आहे. तर त्याचा भाऊ शहर पोलीस ठाण्यात शिपाई म्हणून कार्यरत आहे. सुधीरच्या पश्चात पत्नी, एक मुलगा व एक मुलगी असल्याचे सांगण्यात आले.नऊ महिन्यांपासून होता रजेवरदेवळी पोलीस ठाण्यात चालक म्हणून कार्यरत आलेला सुधीर गत नऊ महिन्यांपासून वैद्यकीय रजेवर होता. तो गत काही दिवसांपासून मानसिक दडपनात जीवन जगत असल्याची परिसरात चर्चा होती. याच दडपनाखाली त्याने आत्महत्या केली असावी, असे बोलले जात असून सुधीरच्या आत्महत्येचे कारण शहर पोलीस शोधत आहेत.सोमवारी होणार होता कर्तव्यावर रुजूगत नऊ महिन्यांपासून वैद्यकीय रजेवर असलेला पोलीस शिपाई सुधीर उईके सोमवारी कर्तव्यावर रुजू होणार होता. दरम्यान, त्याने रविवारी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. सुधीरच्या आत्महत्येमुळे पोलीस प्रशासनात हळहळ व्यक्त केली जात आहे.
पोलीस शिपायाची गळफास लावून आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 11, 2017 12:55 AM
देवळी पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या एका पोलीस शिपायाने वर्धेतील सुदामपुरी परिसरात असलेल्या राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली.
ठळक मुद्देकारण गुलदस्त्यात : देवळी ठाण्यात होता कार्यरत