लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : अंगाला चटके देणारी ऊन राहत असल्याने उन्हाळा नकोच असे अनेकजण सहज बोलतात. परंतु, जीवाची लाही-लाही करणारा उन्हाळा ऋतृ दिव्यांग असलेल्या दिलीप भिवगडे यांच्यासाठी रोजगार उपलब्ध करून देणारा ठरत आहे. दिलीप भिवगडे यांनी कुठलेही प्रशिक्षण घेतले नसले तरी ते नारळाच्या दोरीपासून पाणी थंड ठेवण्यासाठी बाटली तयार करतात. या बाटलीतील पाणी तपत्या उन्हातही थंड राहते. शिवाय त्यांनी तयार केलेल्या बाटलींची अनेकांकडून मागणी होत असल्याने दिलीपला सध्या रोजगारच उपलब्ध होत आहे.प्राप्त माहितीनुसार, ६१ वर्षीय दिलीप रामचंद्र भिवगडे हे रामनगर भागातील एसटी डेपो मार्गावर राहतात. त्यांनी कुठलेही प्रशिक्षण न घेता कृतीतूनच तपत्या उन्हातच प्लास्टिकच्या बाटलीतील पाणी थंड राहण्यासाठी नारळाच्या दोरीच्या आवरणाची एक विशिष्ट बॉटल विकसीत केली आहे. सदर नारळाच्या दोरीचे आवरण असलेली एक शिशी तयार करण्यासाठी त्यांना दीड दिवसांचा कालावधी लागतो. या विकसीत केलेल्या शिशीतील पाणी ४५ डिग्री तापमानातही अवघ्या अर्ध्या तासातच थंड येते.इतकेच नव्हे तर घरचे पाणी प्रवासादरम्यान प्रवास करणाऱ्याजवळ राहत असल्याने तो अनेक आजारांपासून दूर राहू शकतो. आपण तयार केलेल्या नारळाच्या दोरीच्या आवरणाच्या बाटल्या राज्य परिवहन महामंडळातील कर्मचारी आपल्यापासून घेत असल्याने आपल्यालाही दोन पैसे वाचत असल्याचे दिलीप सांगतो. एकूणच जीवाची लाही-लाही करणारा उन्हाळा दिव्यांग दिलीपसाठी आर्थिक आधार देणाराच ठरत आहे.एक बाटली तयार करण्यासाठी १०० रुपयांचा खर्चमागील वर्षी सुमारे ५० सदर बाटल्या तर यंदा आतापर्यंत १५ बाटल्या आपण तयार केल्या आहे. सदर नारळाच्या दोरीच्या आवरणाची बाटली तयार करण्यासाठी कमीत कमी १०० रुपयांचा खर्च येतो. सुमारे अर्धा किलो दोरी, लोखंडी कडी व पट्टी आदी साहित्य त्यासाठी लागतात. इतकेच नव्हे तर सदर एक बाटली तयार करण्यासाठी कमीत कमी दीड दिवसांचा कालावधी लागत असल्याचे दिलीप भिवगडे यांनी सांगितले.बैलाच्या घांगऱ्याही करतात तयारदिव्यांग असलेले दिलीप भिवगडे हे उत्कृष्ट व आकर्षक अशा बैलाच्या घांगºया तयार करतात. त्याची मागणी पोळा या सणादरम्यान राहते.
उन्हाळा ठरतोय दिव्यांग ‘दिलीप’साठी आधार देणारा ऋतू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 02, 2019 9:55 PM
अंगाला चटके देणारी ऊन राहत असल्याने उन्हाळा नकोच असे अनेकजण सहज बोलतात. परंतु, जीवाची लाही-लाही करणारा उन्हाळा ऋतृ दिव्यांग असलेल्या दिलीप भिवगडे यांच्यासाठी रोजगार उपलब्ध करून देणारा ठरत आहे.
ठळक मुद्देप्रशिक्षण न घेताच तयार करतो थंड पाणी ठेवण्याची बॉटल : मागीलवर्षी तयार केल्या होत्या ५० बॉटल