जिल्ह्यात १४ जलाशये : उन्हाळ्यात भयावह स्थितीचे संकेतरूपेश खैरी चर्धाहिवाळा संपत असून उन्हाळ्याची चाहुल लागली आहे. उन्हाळा येताच जिल्ह्यात पाणीटंचाई डोकेवर काढणे आलेच. गत उन्हाळ्याप्रमाणे यंदाच्या उन्हाळ्यात जिल्ह्यातील जलाशयांना कोरड पडण्याची स्थिती आताच निर्माण झाली आहे. हिवाळ्याच्या शेवटातच आठ जलाशयातील साठा १० दलघमीपेक्षा कमी झाला आहे. यामुळे उन्हाळ्यात जिल्ह्याची स्थिती भयावह होण्याचे संकेत आत्ताच मिळत आहे. यामुळे आतापासूनच पाण्याची बचत करण्याची गरज निर्माण झाली आहे. पाण्याचा साठा करून ते सिंचनाकरिता आणि अन्य गरजा पूर्ण करण्याकरिता जिल्ह्यात एकूण १४ जलाशय आहेत. यातील सहा जलाशयात जलसाठा असला तरी पोथरा, पंचधरा, डोंगरगाव, मदन, मदन (उन्नई), लालनाला, कार व सुकळी या आठ जलाशयातील साठा आताच खालावल्याची स्थिती आहे. असे असले तरी यंदाच्या उन्हाळ्यात जिल्ह्यात टंचाई जाणवणार नाही, असे पाटबंधारे विभागाकडून सांगण्यात आले आहे. जिल्ह्यात केवळ धाम प्रकल्पात पिण्याच्या पाण्याचे आरक्षण असून इतर जलसाठ्यातील पाणी शेतीच्या सिंचनाकरिता आरक्षित असल्याची माहिती आहे. सिचनाकरिता पाणी सोडण्याची अंमित तारीख २८ फेब्रुवारी आहे. यामुळे शेतकऱ्यांची मागणी झाल्यास या काळापर्यंत पाणी पुरविणे शक्य आहे. मार्च महिन्यात पारा भडकण्यास सुरुवात होते. यामुळे या काळात पाण्याची पातळी खालविण्याची शक्यता अधिक असते. यंदा तर फेब्रुवारीच्या प्रारंभीपासूनच पारा चढत आहे. पहिल्याच आठवड्यात पारा ३५ अंशावर पोहोचल्याचे दिसून आले आहे. यामुळे उन्हाळ्याच्या दिवसात यात आणखी वाढ होण्याचे संकेत आहे. पारा चढताच पाण्याची समस्या डोके काढणार यात शंका नाही. यामुळे वेळीच येणाऱ्या समस्येची दखल घेणे गरजेचे झाले आहे. पाण्याचा अपव्य टाळण्याची गरज उन्हाळा तोंडावर आला आहे. या दिवसात वर्धेत पाणीटंचाई डोके वर काढत असते. यावर आळा घालण्याकरिता आताच जनजागृती करणे गरजेचे झाले आहे. जमिनीतून होणारा पाण्याचा उपसा कमी करून पाण्याचा होणारा अपव्यय रोखण्याकरिता आताच उपाययोजना आखण्याची गरज निर्माण झाली आहे. प्रत्येकाने आपली जबाबदारी पार पाडल्यास यंदा काही काळ तरी पाणी टंचाईपासून मुक्ती मिळविणे शक्य आहे. पिण्याकरिता पाणी आरक्षितवर्धा जिल्ह्यातील मोठा प्रकल्प म्हणून नोंद असलेल्या धाम प्रकल्पात पिण्याकरिता पाण्याचे आरक्षण करण्यात आले आहे. यात उपलब्ध जलसाठ्यातील २० मिमी पाणी नागरिकांची तहाण भागविण्याकरिता आरक्षित करण्यात आले आहे. या व्यतिरिक्त येथे रेल्वेकरिता व उद्योगाकरिता पाणी आरक्षित असल्याची माहिती आहे. सध्या धाम प्रकल्पात ३१.४१ दलघमी जलसाठा उपलब्ध आहे. सिंचनाकरिता पाणी उपलब्ध सध्या रब्बी हंगाम सुरू आहे. या हंगामाकरिता शेतकऱ्यांना सिंचनाकरिता पाणी कमी पडणार नसल्याची स्थिती आहे. सिंचनाकरिता २८ फेब्रुवारीपर्यंत पाणी सोडण्याचा निर्णय झाला आहे. यात शेतकऱ्यांनी मागणी केल्यास त्यावर फेरविचार करून ही मुदत वाढविणे शक्य असल्याचे संबंधित विभागाकडून सांगण्यात आले आहे.
उन्हाळ्यापूर्वीच आठ जलाशये १० दलघमीच्या खाली
By admin | Published: February 07, 2017 1:05 AM