शहरं
Join us  
Trending Stories
1
नालासोपाऱ्यात कॅश ड्रामा! पैसे वाटपाच्या आरोपांवरून विनोद तावडेंना घेरले; तीन गुन्हे दाखल
2
Maharashtra Assembly elections 2024: कोणत्या मुद्द्यांभोवती फिरली प्रचारचक्रे ? 
3
नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी आज मतदान; काँग्रेस-भाजपमध्ये लढत 
4
झारखंड : दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला; अंतिम टप्प्याचे आज ३८ जागांवर मतदान
5
ज्यांच्या बळावर मतदान, त्यांचाच हिरावला अधिकार; दोन हजार पोलिसांचे बॅलेटच आले नाहीत
6
विधानसभा निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज; किती वाजता सुरू होणार मतदान? ‘या’ गोष्टी लक्षात ठेवाच
7
हल्ले, मारहाणीच्या घटनांनी राजकीय वातावरण तापले; प्रचारादरम्यान काय-काय घडलं?
8
३५ हजार पोलिसांचा फौजफाटा मुंबईत सज्ज; चार हजार जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई
9
मुंबईकरांना पहाटेच भाजीपाला पोहोचणार; धान्य, मसाला, फळ मार्केट राहणार बंद
10
वरळीतील १,३३९ मतदारांच्या सोयीसाठी; चक्क उड्डाणपुलाखाली दोन मतदान केंद्रे
11
मतदान शांततेत पार पाडा, जबाबदारी निभावा; पोलिस महासंचालक संजय वर्मा यांचे आवाहन
12
सुप्रिया सुळे, नाना पटोलेंनी बिटकॉइन स्कॅम केला, निवडणुकीत परदेशी चलनाचा वापर; भाजपाचा आरोप
13
डहाणूचा बविआ उमेदवार भाजपात आला, त्याचाच राग ठाकूर पिता-पुत्रांनी काढला? चर्चांना उधाण
14
रोहित पवारांच्या कारखान्यातील अधिकाऱ्याला पैसे वाटताना पकडले; पोलिसात गुन्हा दाखल
15
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप, देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
16
भाई ठाकूर यांचे भाऊ ते बविआ प्रमुख; विरारमधील 'राडा' प्रकरणाने चर्चेत आलेले हितेंद्र ठाकूर कोण?
17
“निवडणुकीत भाजपाचा पराभव झाल्यास त्याचे खापर विनोद तावडेंवर फोडले जाईल”: पृथ्वीराज चव्हाण
18
मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत असल्याने कारस्थान रचलं? विनोद तावडे म्हणाले, "मी तिकडे जाणार हे..."
19
Vinod Tawde: त्या हॉटेलात महिला, कोपऱ्या कोपऱ्यात लपलेल्या; क्षितीज ठाकुरांचे खळबळजनक आरोप
20
Maharashtra Assembly Election 2024 : लोकसभेवेळी धक्का देणारा मराठवाडा भाजपाला देणार साथ? हे मुद्दे ठरू शकतात 'मास्टर स्ट्रोक'

सुनील टालाटुलेशी भाजप व संघाचा संबंध नाही

By admin | Published: March 10, 2016 2:55 AM

सुनील टालाटुले या व्यापाऱ्याने शेतकऱ्यांच्या कापसाचे आठ कोटींचे चुकारे दिले नाही. यामुळे शेतकरी मेटाकुटीस आले आहेत.

रामदास तडस : जिल्हा बँक बुडविणाऱ्यांनी शेतकरी हिताचा देखावा करु नयेवर्धा : सुनील टालाटुले या व्यापाऱ्याने शेतकऱ्यांच्या कापसाचे आठ कोटींचे चुकारे दिले नाही. यामुळे शेतकरी मेटाकुटीस आले आहेत. याप्रकरणी पीडित शेतकरी नागपुरात उपोषणावर बसलेले आहे. या प्रकरणात काँग्रेसकडून भाजप व संघाला निशाना केला जात असताना खा. रामदास तडस यांनी यात उडी घेऊन जिल्हा बँक बुडविणाऱ्या काँग्रेस नेत्यांनी शेतकरी हिताचा देखावा करु नये, अशा शब्दात शरसंधान साधून सुनील टालाटुलेशी भाजप व संघाचा तीळमात्र संबंध नसल्याचा खुलासाही केला आहे. यामुळे या प्रकरणाला राजकीय रंग चढला आहे.सेलूची सूत गिरणी सुनील टालाटुले यांची खासगी मालकीची आहे. अनेक वर्षांपासून ते हा व्यवसाय करतात. गेल्या ३-४ वर्षा$ंपासून त्यांनी कापसाचे पैसे न दिल्याने शेतकरी अडचणीत आहेत. शेतकऱ्यांच्या मालाचे पैसे त्यांनी द्यायलाच पाहिजे होते.भाजप या प्रश्नांवर शेतकऱ्यांच्या बाजूने सुरूवातीपासूनच आहे. या प्रश्नासाठी गिरणी मालक व शेतकरी यांच्यासोबत अनेक बैठका घेतल्यात. प्रश्न सुटावा, यासाठी भाजप संघटनमंत्री डॉ. उपेन्द्र कोठेकर, आ. डॉ. पंकज भोयर, जिल्हाध्यक्ष राजू बकाने व माजी खासदार सुरेश वाघमारे यांच्यासह प्रयत्न केलेत. मात्र जिनिंग मालकाची संपत्ती वेगवेगळ्या ठिकाणी गहाण असून तो कर्जबाजारी असल्यामुळे प्रश्न सुटू शकला नाही, ही बाबही खा. तडस यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात नमुद केली आहे.काही काँग्रेस मंडळी राजकारण करून शेतकऱ्यांची दिशाभूल करीत राजकीय पोळी भाजून घेत आहेत. हा प्रकार निषेधार्थ आहे. ज्या काँग्रेसी मंडळींनी वर्धा जिल्हा बँक भस्मसात करून बुडविली. शेतकऱ्यांना लुबाडले आता शेतकऱ्यांबद्दल खोटा कळवळा दाखवून विनाकारण संघ व भाजपाला बदनाम करीत असल्याचा आरोपही खा. तडस यांनी केला आहे.आमची बांधलकी शेतकऱ्यांसोबत असून त्यांचे पैसे मिळावे, यासाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरू आहेत. संबंधित शेतकऱ्यांनी व नागरिकांनी काँग्रेस नेत्यांच्या चालबाजीला बळी पडू नये व प्रश्न विनाकरण चिघळवू नये. कायदेशीर मार्गाने शासनस्तरावर शक्य ती मदत करण्यास सरकार तयार आहे.काँग्रेस नेत्यांनी जिल्हा सहकारी बँक बुडविली असताना त्या बँकेला ना. नितीन गडकरी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांंनी ५० कोटी मिळवून दिले आहेत, असा टोलाही रामदास तडस यांनी लगावला आहे.(जिल्हा प्रतिनिधी)