लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : सुरू असलेल्या भारनियमनाचा चांगलाच आर्थिक फटका शेतकºयांना सहन करावा लागत आहे. भारनियमनामुळे वेळीच पिकांना पाणी देता येत नसून शेतातील उभी पिके माना टाकत आहेत. शेतकºयांच्या कृषीपंपांना २४ तास विद्युत पुरवठा देण्यात यावा या मुख्य मागणीसह विविध मागण्यांसाठी शुक्रवारी संतप्त शेतकºयांनी महावितरणचे कार्यालय गाठून अधीक्षक अभियंतांच्या दालनात चक्क बेशरमाचे झाड ठेऊन महावितरणच्या शेतकरी विरोधी धोरणांचा निषेध नोंदविला.तालुक्यातील गोजी येथील शेतकºयांनी भारनियमन तात्काळ बंद करून कृषीपंपांना २४ तास विद्युत पुरवठा देण्याची मागणी यावेळी रेटून धरली. यावेळी संपप्त शेतकºयांनी भारनियमन बंद करण्यासाठी अनेकवार निवेदन दिले. पण या मागणीकडे नेहमीच दुर्लक्ष झाल्याचा आरोप करीत शेतकºयांनी थेट महावितरणचे अधीक्षक अभियंता सुनील देशपांडे यांच्या टेबलवर बेशरमचे झाड ठेवले. इतकेच नव्हे तर आंदोलनकर्त्यांनी अधीक्षक अभियंत्यांच्या दालनातच ठिय्या दिला. यावेळी संतप्त आंदोलनकर्त्यांचे म्हणणे ऐकून घेतल्यावर कानाला फोन लावून अधीक्षक अभियंता देशपांडे यांनी दालनाबाहेर पळ काढला.आंदोलनकर्त्यांनी निवेदनातून सिंचनावर भारनियमनाचा परिणाम होत असल्याने दिवसभर विद्युत पुरवठा करण्यात यावा, ग्रामीण पाणी पुरवठा योजनेकरिता थ्री-फेज लाईन देण्यात यावी, गावठाणात थ्री-फेज फीडर बसविण्यात यावे आदी मागण्या यावेळी करण्यात आल्या आहेत. यावेळी मागण्यांवर चर्चा झाली. परंतु, चर्चेअंती संतप्त शेतकºयांचे समाधान न झाल्याने शेतकºयांनी आक्रमक पवित्रा घेतला. महावितरणच्या अधिकाºयांनी योग्य दखल न घेतल्याचा आरोप करीत आंदोलनकर्त्यांनी आपला मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयाकडे वळविला.यावेळी जिल्हाधिकाºयांना विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले. येत्या चार दिवसात मागण्यांवर विचार न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशाराही निवेदनातून देण्यात आला आहे. अधीक्षक अभियंत्यांना निवेदन देताना किशोर मुंगले, वसंता नालट, दिलीप सिंगम, आनंद वरभे, किसना हायगुणे, गजानन घोडमारे, राकेश जांभुळे, जसवंत जुमडे, अवतार ढगे, गजानन महाजन, चंद्रशेखर कावडे, दीपक झाडे, हरिभाऊ उघडे, आरिफ पठाण, रोशन कावडे यांच्यासह परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थिती होती.मोर्चेकºयांकडून शिवीगाळ; महावितरणकडून तक्रार दाखलवर्धेच्या महावितरण अधीक्षक अभियंता कार्यालयावर विनापरवानगी मोर्चा नेत तेथील अधिकारी व कर्मचाºयांना शिवीगाळ करणाºया जमावाविरोधात महावितरण कडून पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे. येत्या काळात असे प्रकार घडू नये म्हणून कार्यालयीन वेळेत पोलीस संरक्षण मिळावे अशी मागणी महावितरणकडून पोलीस अधीक्षकांकडे करण्यात आली आहे. कृषिपंपाच्या वेळेत बदल करून मिळावा या मागणीसाठी काही शेतकºयांनी बोरगाव नाका, येथील महावितरणच्या अधीक्षक अभियंता कार्यालयावर मोर्चा नेला. शेतीला दिवसाही वीजपुरवठ्याची मागणी मोर्चेकºयांकडून करण्यात आली. कृषी पंपाच्या वेळेत बदल करणे शक्य नसल्याने चिडलेल्या जमावाने महावितरणच्या अधिकारी आणि कर्मचाºयांना अर्वाच्च भाषेत शिवीगाळ केल्याचा आरोप कर्मचाºयांनी केला. या प्रकरणी अखेर अधीक्षक अभियंता सुनील देशपांडे यांनी पोलीस अधीक्षकांची भेट घेत येत्या काळात असे प्रकार घडू नये म्हणून कार्यालयीन वेळेत पोलीस संरक्षण मिळावे अशी मागणी केली.अधीक्षक अभियंत्यानी काढला पळसंतप्त शेतकºयांनी निवेदन दिल्यानंतर अधीक्षक अभियंता देशपांडे यांच्याशी आपल्या मागण्यांवर चर्चा केली. यावेळी आंदोलनकर्त्यांचा आक्रमक पवित्रा पाहून अधीक्षक अभियंत्यांनी चर्चा अर्धवट सोडून फोन कानाला लावून दालनातून पळ काढला. त्यानंतर संतप्त शेतकºयांनी अभियंत्याच्या खुर्चीला निवेदन लावत टेबलावर बेशरमचे झाड ठेवून कार्यप्रणालीचा निषेध नोंदविला.
अधीक्षक अभियंत्यांना बेशरमचे झाड भेट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 03, 2017 11:39 PM
सुरू असलेल्या भारनियमनाचा चांगलाच आर्थिक फटका शेतकºयांना सहन करावा लागत आहे. भारनियमनामुळे वेळीच पिकांना पाणी देता येत नसून शेतातील उभी पिके माना टाकत आहेत.
ठळक मुद्देशेतकरी संतप्त : २४ तास वीज पुरवठा करा, महावितरणची आंदोलकांविरूध्द पोलिसात तक्रार