लोकमत न्यूज नेटवर्क वर्धा : सामान्यांसाठी असलेल्या जिल्हा सामान्य रुग्णालयाला बनावट औषधांचा पुरवठा झाल्याची गंभीर बाब अन्न व औषध प्रशासनाच्या तपासणीदरम्यान उजेडात आली होती. याबाबतचे वृत्त ४ ऑगस्ट रोजी 'लोकमत'ने प्रकाशित करून वाचा फोडली होती. अखेर या प्रकरणात अन्न औषध निरीक्षकांच्या तक्रारीनुसार अॅक्वेंटिस, काबीज या दोन पुरवठादारांसह दोघांवर शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे
एफडीएच्या चौकशीत तब्बल सहा लाख ३० हजार बनावट टॅबलेट्सचा रुग्णालयांना पुरवठा झाल्याची बाब उजेडात आली आहे. राज्यातील नागपूरसह काही जिल्ह्यांत बनावट औषधांचा साठा पकडला होता. त्या अनुषंगाने अन्न व औषध प्रशासनाने जिल्हा सामान्य रुग्णालयातील औषध भंडारातून २० सप्टेंबर २०२३ रोजी काही औषधांचे नमुने घेतले. ते तपासणीसाठी पाठविले होते. दरम्यान अॅझिमसिन बँडनेम असलेल्या औषधात अॅझिश्रीमायसिन हा मुख्य घटक आढळून न आल्याने अहवालाअंती अन्न व औषध प्रशासनाने हे औषध बनावट घोषित केले. जिल्हा सामान्य रुग्णालयाला या औषधाचा पुरवठा कोल्हापुरातील सुरेश दत्तात्रय पाटील मे, विशाल एन्टरप्राइजेस या कंपनीकडून झाल्याचे सांगण्यात आले. या औषधाचे उत्पादन ग्रीस्टल फॉम्युलेशन्स, प्लॉट क्रमांक एन ९९/२२ कोटद्वार, पौरी गर्हवाल, उत्तराखंड येथे झाले. त्याचा बॅच क्रमांक एएमटीक्यू /६७२०२२ आहे. चौकशीअंती या बनावट औषधांचा एकट्या वर्धा जिल्ह्यातच नव्हे, तर संपूर्ण महाराष्ट्रात पुरवठा झाल्याची बाब निदर्शनास आल्यानंतर अन्न व औषध प्रशासनाने संपूर्ण साठा ताब्यात घेतला. तक्रारीनंतर ठाणे येथील विजय शैलेंद्र चौधरी, संचालक काबीज जेनरीक हाउस, गाळे क्रमांक २२, एल- १/२/३, पूनम विहार, शांतीनगरसमोर, सेक्टर-२ अयप्पा स्वामी टेम्पलजवळ, मीरा रोड, तसेच मिहीर त्रिवेदी, मे अॅक्वेंटीस बायोटेक प्रा.लि. हाउस नं.७९९/३ मुद्रा कम्पाउंड, नारकोली, भिवंडी या दोन पुरवठादारांविरुद्ध, तसेच सुरत, दिंडोली येथील में. फार्मासिक्स बायोटेकच्या मालक प्रिती सुमित त्रिवेदी यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बनावट औषधांचा कारखाना भिवंडी अन् ठाण्यातफेब्रुवारी महिन्यात अन्न व औषध प्रशासनाने नागपुरात केलेल्या कारवाईत मोठ्या प्रमाणात बनावट औषधांचा साठा जप्त केला होता. त्यानंतर अन्न व औषध प्रशासनाने गती राज्यभरात तपासणी मोहीम राबविली. देत संपूर्ण अनेक ठिकाणांहून औषधांचे नमुने घेण्यात आले होते, एफडीए ने जिल्हा सामान्य रुग्णाल यातून घेतलेल्या नमुन्यात अॅझिमिसिन असे अॅडनेम असलेल्या औषधामध्ये अॅनिश्रोमायसिन हा मुख्य घटकच आढळून न आल्याने हे औषध बनावट घोषित केले. हा पुरवठा भिवंडी, ठाणे येथून झाल्याने भिवंडी, ठाणे येथेच बनावट औषधी तयार करण्याचा कारखाना असल्याचे उघड झाले आहे.
सखोल तपास केल्यास आंतरराष्ट्रीय टोळीचा पर्दाफाश बनावट औषध निर्मिती व विक्रीचे जाळे हे उत्तरांचल, तसेच हिमाचल येथे असल्याची माहिती आहे. या मागे आंतर- राज्यीय टोळी असून, या औषधांची निर्मिती कोठे झाली व त्यासाठी लागणारा कच्चामाल, पॅकिंग मटेरियल आदी साहित्य कोठून आणले, कोठे बनावट औषधांची विक्री झाली, याबाबतचा सखोल तपास पोलिसांनी केल्यास मौऊग रॅकेटचा पर्दाफाश होणार, यात शंका नाही.