शहरं
Join us  
Trending Stories
1
आर्टिकल 370 वरून जम्मू-काश्मीर विधानसभेत गदारोळ, हाणामारी अन् पोस्टरही फाडलं; बघा VIDEO
2
“महाराष्ट्राच्या परिवर्तन हवे, जनतेच्या अपेक्षा पूर्ण करण्याचे काम करावे लागेल”: शरद पवार
3
"मित्रपक्षाने अशी दगाबाजी करणं..."; भास्कर जाधवांना संताप अनावर, काँग्रेसला सुनावलं
4
राज ठाकरेंच्या मनसेला आम्ही ऑफर दिली होती, पण...; CM एकनाथ शिंदेंचा दावा
5
ममता बॅनर्जींचा भाचा पश्चिम बंगालचा पुढील मुख्यमंत्री होणार? अचानक राजकीय चर्चांणा उधाण
6
"तुला जीवाची पर्वा आहे की नाही?”; लॉरेन्स बिश्नोई गँगच्या नावाने फॅशन डिझायनरला धमकी
7
शरद पवारांबाबत आक्षेपार्ह भाषा; टीकेची झोड उठल्यानंतर सदाभाऊंकडून दिलगिरी, म्हणाले...
8
Guruwar Astro Tips: कार्तिक महिन्यातला पहिला गुरुवार; झपाट्याने प्रगतीसाठी करा 'हे' चार उपाय!
9
भगीरथ भालकेंनी शरद पवारांशी गद्दारी केली; धैर्यशील मोहितेंची टीका; प्रणिती शिंदेंकडून पलटवार!
10
'फेक नॅरेटिव्ह'च्या फॅक्टरीचे शरद पवार मालक, देवेंद्र फडणवीसांचा हल्लाबोल
11
आधी आरोप, मग अजित पवारांना पवित्र करून घेतले, जयंत पाटील यांचे टीकास्र
12
"मला धमक्या मिळत आहेत...", विक्रांत मेस्सीचा खुलासा; 'द साबरमती रिपोर्ट' ठरलं कारण?
13
अशोक सराफ यांच्या नवीन मालिकेत 'ही' अभिनेत्री साकारणार प्रमुख भूमिका, नव्या प्रोमोने उत्सुकता शिगेला
14
WI vs ENG: कार्टीच्या विक्रमी सेंच्युरीच्या जोरावर कॅरेबियन संघाची मालिका विजयाची 'पार्टी'
15
बाळासाहेब ठाकरेंच्या एका वाक्याने निवडला गेला होता शिवसेनेचा उमेदवार; निकाल काय लागला?, वाचा...
16
"राहुल गांधींनी नागपुरात कोरं संविधान दाखवलं तर मुंबईत..., बाबासाहेबांचा 'हा' अपमान..."; VIDEO शेअर करत भाजपचा हल्लाबोल
17
भाजपच्या ४० बंडखोरांची सहा वर्षांसाठी हकालपट्टी, काही बंडखोरांवर अद्याप पक्षाकडून कारवाई नाही
18
परप्रांतीयांच्या मतांसाठी भाजपचे ‘मायक्रो मॅनेजमेंट’, राज्य, भाषानिहाय डेटा बँक करून जबाबदारी
19
'डिमोशन' झालं तरी KL Rahul मध्ये सुधारणा नाहीच; कसं मिळेल रोहितच्या जागी 'प्रमोशन'?
20
BSNL चा शानदार प्लॅन मिळवण्याचा आजचा शेवटचा दिवस, 365 दिवसांसाठी मिळेल 600GB डेटा!

रुग्णालयातच होणार नवजात बालकांची आधार नोंदणी

By admin | Published: September 09, 2016 2:16 AM

शासकीय व खासगी रुग्णालयात जन्मलेल्या नवजात बालकांची आधार नोंद करण्याचे आदेश शासनाने दिलेत.

निनावी नोंद : आधारलिंक करण्याच्या सूचनापुरूषोत्तम नागपुरे  आर्वीशासकीय व खासगी रुग्णालयात जन्मलेल्या नवजात बालकांची आधार नोंद करण्याचे आदेश शासनाने दिलेत. सर्व संस्थांमध्ये जन्मलेल्या बालकांची त्या-त्या आरोग्य संस्थेच्या प्रमाणित आॅपरेटरद्वारे आधार लिंक करण्याच्या सूचना सार्वजनिक आरोग्य विभागाने दिल्या. या पार्श्वभूमीवर नवजात बालकांची रुग्णालयातच आधार नोंदणी होणार आहे. नवजात बालकाचे नाव निश्चित न केलेल्या बालकांचीही आधार नोंदणी विना नावे करावी. अर्थात नवजात बालकाचे नाव निश्चित केले नसले तरी बेबी या नावाने त्याची आधार नोंदणी करण्याच्या सूचना आहे. नवजात बालकाचे नाव लगेचच निश्चित केले जात नाही. अशावेळी बालकाचे नाव बेबी, अशी नोंद करून आईचे नाव, ते बालक त्याच्या पालकाचे कितवे अपत्य आहे हे विचारात घेऊन त्या क्रमाकांचे मुल, अशी नोंद आधार यंत्रणेत केली जाणार आहे. यानंतर विना नावाची आधारमध्ये नोंदणी झालेल्या बालकाचे नाव आधारमध्ये ‘युडाई गव्हर्नमेंट डॉट इन’ या संकेतस्थळावर अद्यावत करता येईल. नोंदणी महानिबंधक कार्यालयातील नागरी नोंदणी यंत्रणा ही ‘चाईल्ड एनरॉलमेंट लाईट क्लाइंट’ या आधार नोंदणी यंत्रणेशी संलग्न केली जाईल. पाच वर्षांखालील बालकांच्या आधार नोंदणीमध्ये बोटांचे ठसे आणि बाहुलीची प्रतिमा ही बायोमॅट्रिक माहितीची नोंद घेतली जाणार नाही. याऐवजी त्यांचे आधार क्रमांक हे त्यांच्या पालकांच्या आधार क्रमांकाशी लिंक केले जाणार असल्याचेही सांगण्यात आले. यात दिनांक आणि लिंग याची माहिती घेतली जाते. त्या अनुषगांने राज्यात नवीन आधार लिंक जन्म नोंदणी कार्यान्वित करण्यात आली आहे.