लोकमत न्यूज नेटवर्कहिंगणघाट : येथील नगर पालिकेच्या सफाई कार्मचाऱ्याच्या मुलाने पालिकेच्या निर्माणाधीन इमारतीच्या तिसऱ्या माळ्यावर चढून वीरुगिरी करीत आंदोलन केले. ही घटना शुक्रवारी दुपारी १ वाजतादरम्यान घडली असून पोलिसांनी मोठ्या शिताफीने त्याला खाली उतरविल्याने मोठा अनर्थ टळला.प्राप्त माहितीनुसार येथील नगर पालिकेच्या सफाई कर्मचारी त्रिवेणी प्रेमलाल नक्के (मारवे) यांना १ डिसेंबर २०१२ रोजी विना स्वाक्षरीच्या पत्राने निलंबित केले. या विरुध्द त्यांनी औद्योगिक न्यायालयात दाद मागितली. न्यायालयाने त्यांच्या बाजूने निर्णय देत पालिकेला त्यांच्या सेवाकाळातील वेतन व नुकसान भरपाई देण्याचा आदेश दिला. पण पालिका प्रशासनाने नुकसान भरपाई देण्यास टाळाटाळ चालविली आहे. यासाठी त्रिवेणी नक्के व त्यांचा मुलगा पंकज हा पालिकेचे उंबरठे झिजवित आहे. मात्र न्याय मिळत नसल्याने आज संतप्त झालेल्या पंकज राजेंद्र मारवे (३२) याने कोणतीही पुर्वसूचना न देता इमारतीवर चढून थकबाकी दिली नाही तर उडी घेऊन आत्महत्या करण्याची धमकी दिली. पण नगराध्यक्ष बसंतानी व मुख्याधिकारी दंडवते दोघेही बाहेरगावी असल्याने निर्णय होऊ शकत नव्हता. म्हणून पोलिसांना पाचारण करण्यात आले. पोलिसांनी कर्मचारी मारोती उइके यांनी त्याची समजूत काढली. प्रशासकीय अधिकाºयांनी लेखी पत्र दिल्यानंतर पंकज खाली उतरला. पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन प्रतिबंधात्मक कारवाई केल्यानंतर सायंकाळी त्याची सुटका केली.
सफाई कर्मचाऱ्याच्या मुलाची वीरुगिरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 26, 2018 11:45 PM
येथील नगर पालिकेच्या सफाई कार्मचाऱ्याच्या मुलाने पालिकेच्या निर्माणाधीन इमारतीच्या तिसऱ्या माळ्यावर चढून वीरुगिरी करीत आंदोलन केले. ही घटना शुक्रवारी दुपारी १ वाजतादरम्यान घडली असून पोलिसांनी मोठ्या शिताफीने त्याला खाली उतरविल्याने मोठा अनर्थ टळला.
ठळक मुद्देपालिकेच्या इमारतीवर चढून केले आंदोलन