लोकमत न्यूज नेटवर्कदेवळी : येथील महिला तहसीलदार बाळू भागवत यांनी अंदोरी येथील प्रशांत चौधरी या शेतकऱ्याच्या श्रीमुखात लगावली. या प्रकरणी देवळी पोलीस ठाण्यात गुरूवारी आरोपी महिला तहसीलदारांविरुद्ध अदखलपात्र गुन्हा दाखल झाल्यानंतर शुक्रवारी प्रहारच्या पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांनी थेट तालुकाकचेरी गाठून जोरदार घोषणाबाजी करून निषेध नोंदविला. यावेळी आंदोलनकर्त्यांनी महिला तहसीलदार भागवत यांच्या निलंबणाची मागणी केली.तहसीलदार भागवत यांनी मंगळवारी अंदोरी येथील शेतकरी प्रशांत चौधरी यांना मारहाण केली. त्यानंतर सदर शेतकºयाने गुरूवारी देवळी पोलीस ठाणे गाठून घटनेची तक्रार नोंदविली. तक्रारीवरून या प्रकरणी तहसीलदार भागवत यांच्याविरुद्ध भादंविच्या कलम ३२३ अन्वये अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुरूवारी हा संपूर्ण घटनाक्रम घडल्यानंतर येत्या ४८ तासात आरोपी तहसीलदार भागवत यांच्यावर निलंबणाची कारवाई करण्यात यावी, अशी मागणी जिल्हाधिकाऱ्यांना सादर केलेल्या निवेदनातून प्रहारने केली होती. घटना घडून बऱ्याच तासांचा कालावधीत लोटला तरी आरोपी तहसीलदारांवर जिल्हा प्रशासनाने कुठलीही कारवाई न केल्याने अखेर संतप्त प्रहारच्या पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांनी मारहाण झालेल्या शेतकऱ्यासह शुक्रवारी सकाळी देवळीचे तहसील कार्यालय गाठले. तहसील कार्यालयाच्या आवारात सदर आंदोलनकर्त्यांनी येताच आरोपी तहसीलदारांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करून जिल्हा प्रशासनाच्या शेतकरी विरोधी धोरणांचा निषेध नोंदविला. शिवाय शेतकऱ्याला मारहाण करणाऱ्या तहसीलदार भागवत यांच्यावर तात्काळ निलंबणाची कारवाई करावी, अशी मागणी केली. सदर आंदोलनाची माहिती तहसील कार्यालयातील अधिकाऱ्यांना मिळताच नायब तहसीलदार प्रदीप वर्पे यांनी स्वत: आंदोलनकर्त्यांची भेट घेवून त्यांच्या मागण्या जाणून घेतल्या. तसेच मागण्यांचे निवेदनही स्विकारले. आंदोलनात प्रहारचे जिल्हाध्यक्ष प्रमोद कुऱ्हाटकर, हनुमंत झोटींग, वर्धा शहर अध्यक्ष विकास दांडगे, राजेश सावरकर, नितेश चतुरकर, अरविंद मसराम, तुषार वाघ, तुषार कोंडे, अमोद क्षीरसागर, शैलेश सहारे, हरिभाऊ हिंगवे, किरण ठाकरे आदी सहभागी झाले होते.कठोर कारवाईची शेतकरी संघटनेची मागणीवर्धा - शेतकऱ्याला मारहाण करणाऱ्या तहसीलदार बाळू भागवत यांच्यावर कठोर फौजदारी कारवाई करण्यात यावी. तसेच त्यांना तात्काळ निलंबित करण्यात यावे, अशी मागणी शेतकरी संघटनेच्यावतीने शुक्रवारी जिल्हाधिकाऱ्यांना सादर केलेल्या निवेदनातून करण्यात आली आहे. सदर निवेदन उपजिल्हाधिकारी कदम यांनी स्विकारले. निवेदन देताना माजी आमदार सरोज काशीकर, शेतकरी संघटनेचे सतीश दाणी, गजानन निकम, गणेश मुटे, सचिन डाफे, मंगेश मानकर, सारंग दरणे, धोंडबा गावंडे, खुशाल हिवरकर, पांडुरंग भालशंकर, शांताराम भालेराव, महादेव गोहो, माधुरी पाझारे आदींची उपस्थिती होती.
तहसीलदारांना निलंबित करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2018 10:38 PM
येथील महिला तहसीलदार बाळू भागवत यांनी अंदोरी येथील प्रशांत चौधरी या शेतकऱ्याच्या श्रीमुखात लगावली. या प्रकरणी देवळी पोलीस ठाण्यात गुरूवारी आरोपी महिला तहसीलदारांविरुद्ध अदखलपात्र गुन्हा दाखल झाल्यानंतर शुक्रवारी प्रहारच्या पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांनी थेट तालुकाकचेरी गाठून जोरदार घोषणाबाजी करून निषेध नोंदविला.
ठळक मुद्देशेतकऱ्याला मारहाण प्रकरण : प्रहारची तालुका कचेरीवर धडक