शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
2
विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; निवडणुकीमुळे शाळांना तीन दिवस सुट्टी?
3
कार्यकर्ते लागले कामाला, मतदानासाठी बस निघाल्या गावाला!
4
सिमकार्ड कंपनीच्या कर्मचाऱ्यांनीच मारला ३० हजार लोकांच्या डेटावर डल्ला; भारतातील अनेकांची कोट्यवधींची फसवणूक!
5
कुलाब्यात ४ हजार पोलिसांचे टपाली मतदान; उद्यापर्यंत बजावता येणार हक्क!
6
पूर्व नागपुरात महायुती-महाविकास आघाडीसमोर बंडखोरांचे आव्हान
7
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
8
DRDO ला आणखी एक मोठं यश, गाइडेड पिनाका वेपन सिस्टीमची यशस्वी चाचणी
9
"जेव्हा पराभव समोर दिसतो, तेव्हा 'असे' नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न सुरू होतो"; प्रविण दरेकर यांचा सुप्रिया सुळेंना टोला
10
'पाकिस्तानचे अनेक देशांशी संबंध, पण...', भारत-रशिया मैत्रीवर जयशंकर यांची मोठी प्रतिक्रिया
11
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
13
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...
14
दिल्ली महापौरपदासाठी भाजपचा उमेदवार अवघ्या ३ मतांनी हरला; आपची महापालिकेवर सत्ता
15
“मोदींनी ११ वर्षात काय केले? महाराष्ट्राच्या निवडणुकीचा ३७० कलमाशी काय संबंध?”: खरगे
16
काव्या मारनने संघाबाहेर काढलं, त्यानेच टीम इंडियाला रडवलं! आता लागणार १० कोटींची बोली?
17
बाळासाहेबांची इच्छा आम्ही पूर्ण केली, छ. संभाजीनगरच्या नामकरणावरुन PM मोदींचा उद्धवसेनेवर 'बाण'
18
घुसखोरांनाही ४५० रुपयांत गॅस सिलेंडर देणार; काँग्रेस नेत्याच्या विधानानं नवा वाद
19
गाझामध्ये इस्रायलचं तांडव, संपूर्ण कुटुंब नष्ट; शेजारी म्हणाला, "केवळ एकच मुलगा वाचला, पण तोही...!"
20
"गद्दारी केली तर लाज वाटण्यासारखं काहीच नाही"; दिलीप वळसेंच्या लेकीचे शरद पवारांना प्रत्युत्तर

जि.प.सीईओंकडून मुख्याध्यापकाचे निलंबन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 06, 2017 11:11 PM

मनमर्जी काम चालणाऱ्या जिल्हा परिषदेच्या गवंडी येथील शाळेतील मुख्याध्यापक पा. ला. राठोड यांना जि. प. मुख्य कार्यपालन अधिकारी नयना मुंडे यांनी निलंबित केले आहे.

ठळक मुद्देयावले विरुद्धही पाठविला प्रस्ताव : गवंडीच्या शाळेतील मनमर्जी प्रकार भोवला

आॅनलाईन लोकमतकारंजा (घा.) : मनमर्जी काम चालणाऱ्या जिल्हा परिषदेच्या गवंडी येथील शाळेतील मुख्याध्यापक पा. ला. राठोड यांना जि. प. मुख्य कार्यपालन अधिकारी नयना मुंडे यांनी निलंबित केले आहे. ही कारवाई बुधवारी करण्यात आली. जि.प. अध्यक्ष नितीन मडावी यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला.जि. प. च्या स्थायी समितीच्या बैठकीत गवंडी शाळेमध्ये ४ डिसेंबरला उजेडात आलेल्या मुख्याध्यापकांसह शिक्षकांच्या गैरहजेरीचा व त्यांच्या खुर्चींना संतप्त ग्रामस्थांनी चपलांचा हार घातल्याचा विषय चांगलाच रंगला. याबाबतचे वृत्त लोकमतने प्रकाशित केले होते. स्थायी समितीच्या बैठकीत या प्रकारची माहिती जि. प. सदस्य राणा रनणवरे यांनी मांडला. त्याची दखल तातडीने घेऊन अध्यक्ष नितीन मडावी यांनी निलंबनाच्या आदेश निर्गमित करण्याचे सुचविले. गवंडी येथील मुख्याध्यापक, शिक्षक यांची अनेक तक्रार सहा महिन्यांपूर्वी करण्यात आली. त्यानंतर अनेक तक्रारी झाल्या. ग्रामसभेत ठराव घेण्यात आला. विद्यार्थ्यांनी लेखी बयान नोंदविले होते. पालकांच्यावतीने लेखी तक्रार पं. स. शिक्षण विभागाकडेही करण्यात आली होती; पण कार्यवाहीकडे दुर्लक्ष केले जात होते. त्यामुळे येथील मुख्याध्यापकांसह शिक्षकांच्या मनमानी कारभाराने कळस गाठला होता. अखेर सोमवारी ग्रामस्थांच्या सहनशिलतेचा बांध फुटला. त्याची दखल घेत मुख्याध्यापक राठोड यांना निलंबित केले आहे. तर गंगाधर यावले यांच्याही निलंबनाचा प्रस्ताव पाठविला आहे. जि.प. अध्यक्ष मडावी विद्यार्थ्यांशी संवाद साधून वास्तव स्थिती जाणून घेतली. यावेळी गट विकास अधिकारी सातघरे, गट शिक्षणाधिकारी बी. टी बोलणे हजर होते.लोकप्रतिनिधींनी गाठली गवंडीची जि.प. शाळाजि.प. अध्यक्ष नितीन मडावी, समाजकल्याण सभापती नीता गजाम, पं. स. सभापती मंगेश खवशी, जि.प. सदस्य सरिता गाखरे, सुरेश खवशी, रेवता धोटे, पं. स. सदस्य रोशना ढोबाळे यांनी शाळा गाठून विद्यार्थ्यांची संवाद साधला. यावेळी सरपंच सुशीला चौधरी, पंकज धारपुरे, जगन चौधरी, हेमंत किनकर, यादव बनगरे, रवी बमनोटे नागोराव उकल्ले यांची उपस्थिती होती.अध्यक्षांसमोर विद्यार्थ्यांनी वाचला समस्यांचा पाढाबुधवारी शाळेला सुट्टी असताना जि. प. अध्यक्ष नितीन मडावी यांनी गवंडी शाळा गाठून विद्यार्थ्यांशी संवाद साधला. जि.प. शाळेत शिक्षण घेणारे विद्यार्थी आले असताना त्यांनी शाळेतील शिक्षक काय करतात याचा पाढाच यावेळी जि.प. अध्यक्ष मडावी व संबंधितांसमोर वाचला. जि.प. सदस्य सरिता गाखरे यांनी वारंवार याची माहिती मुख्याधिकारी, शिक्षण सभापती यांना दिली. मात्र, त्यांनी दखल घेतली नाही. याकडे लक्ष दिले असते तर संतप्त ग्रामस्थांनी थेट शिक्षकांच्या खुर्चीला चपलांचा हार टाकला नसता. असे यावेळी सांगण्यात आले. जि.प. सदस्य गोखरे यांच्या विनंतीला मान देत जि.प. अध्यक्षांनी शाळा गाठली.शिक्षकावरही निलंबनाची कारवाई करण्याचे आश्वासनजि.प.ची शाळा गाठणाºया जि. प. अध्यक्षांसह संबंधित विभागाच्या अधिकाºयांनी संपूर्ण माहिती जाणून घेतल्यानंतर मुख्याध्यापावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. तक्रारी प्राप्त झाल्याने शिक्षकावरही निलंबनाच्या कार्यवाहीचे आश्वासन यावेळी दिले.