शहरं
Join us  
Trending Stories
1
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
2
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
3
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
4
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
5
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
6
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
7
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
8
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
9
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
10
ढगाळ हवामानामुळे मुंबईत थंडी पळाली; बदलत्या हवामानाचा परिणाम
11
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
12
लॉटरी किंगकडून आठ कोटींची रक्कम जप्त
13
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
14
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
15
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
16
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
17
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
18
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
19
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
20
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा

पालिकेच्या नवीन इमारतीसह जलतरण तलावाचे काम थांबणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2018 11:41 PM

नगर पालिकेत भाजपाची सत्ता आल्यास शहर विकासासाठी निधी देण्याच्या घोषणा झाल्या; पण सध्या जिल्ह्यात निधी येत असला तरी पालिकेच्या वाट्याला काहीच येत नसल्याचे दिसते. परिणामी, प्रथम नगर परिषदेची इमारत व आता जलतरण तलावाचे काम थांबले आहे.

ठळक मुद्देनिधीअभावी अडकला ‘विकास’ : १.१० कोटीऐवजी ३७.५० लाख

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : नगर पालिकेत भाजपाची सत्ता आल्यास शहर विकासासाठी निधी देण्याच्या घोषणा झाल्या; पण सध्या जिल्ह्यात निधी येत असला तरी पालिकेच्या वाट्याला काहीच येत नसल्याचे दिसते. परिणामी, प्रथम नगर परिषदेची इमारत व आता जलतरण तलावाचे काम थांबले आहे.न.प. निवडणूक काळात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी निधीची कमतरता पडू देणार नाही, अशी ग्वाही दिली होती. वर्धेकरांनी ते ग्राह्य धरत भाजपाला सत्ता दिली. नगराध्यक्ष अतुल तराळे यांनी विकास कामांना प्रारंभही केला; पण याला पक्षच साथ देत नसल्याचे दिसून येत आहे. शासनाने शहर विकासासाठी आजपर्यंत १०० कोटींच्या वर निधी उपलब्ध करून दिला; पण तो बांधकाम विभागाकडे वळता करण्यात आला. यामुळे न.प. च्या तिजोरीत ठणठणाटच दिसतो. पालिकेच्या नवीन इमारतीचे बांधकाम सुरू आहे. त्यासाठी सुमारे १० कोटी गरजेचे असताना अद्याप निधीच देण्यात आला नाही. जलतरण तलावाचे नुतनीकरण केले जात आहे. यासाठी सुमारे १ कोटी १० लाख रुपये निधी अपेक्षित आहे; पण पालिकेला केवळ ३७.५० लाख रुपये मिळालेत. यामुळे जलतरणाचे काम रखडण्याची शक्यता आहे. निधीच मिळत नसल्याने सत्ताधारी नगरसेवकांतही कमालीची अस्वस्थता दिसून येत आहे.उपहारगृह आणि उद्यानाचा प्रस्ताव रद्दजलतरण तलावाच्या नूतनीकरणाचे काम पालिकेने हाती घेतले. यात ६० लाख रुपयाचे चार फिल्टर प्लाँट लावलेत. यातील दोन सुरु असताना दोन ‘स्टँड बाय’ असणार आहे. येथे स्प्रींग डायव्हींग, महिलांकरिता चेंजींग रूम व वॉश रूम तसेच टँकरच्या टाईल्स व वॉटर प्रुफींग करण्यात येणार आहे. यासाठी १ कोटी १० लाख रुपयाचा खर्च अपेक्षित असून पालिकेला ३७.५० लाख रुपयेच मिळाले आहेत. यामुळे उर्वरित काम कसे करायचे, असा प्रश्न पालिकेसमोर उभा ठाकला आहे. जलतरण तलावालगत मोकळ्या जागेवर उद्यान व उपहारगृह उभारणे प्रस्तावित होते; पण निधीच नसल्याने ते रद्द करण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे.निधीची आशा धूसरपालिकेच्या नवीन इमारत बांधकामासाठी १० कोटी व जलतरण तलाव नूतनीकरणास १ कोटींची गरज आहे. हा निधी अर्थसंकल्पात मिळण्याची अपेक्षा होती; पण तरतूदच करण्यात आली नाही. यामुळे पालिकेच्या तिजोरीत ठणठणाट राहणार आहेत. पूढील वर्षीच्या अर्थसंकल्पाची शाश्वती नाही. यामुळे उर्वरित कामांसाठी निधी मिळण्याची आशा धूसर झाली आहे. मग, ही कामेही अर्धवटच तर राहणार नाही ना, अशी भीती व्यक्त होत आहे.