क्रांती सेनेद्वारे जिल्हाधिकारी यांच्या मार्फत राष्ट्रपतींना निवेदनलोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : हिंदु क्रांती सेना द्वारे केरळ मध्ये गोहत्या करणाऱ्यांच्या विरुद्ध कार्यवाही करण्याच्या मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी यांना सादर करण्यात आले आहे. सदर निवदेन महामहीम राष्ट्रपतींना पाठविण्याची विनंती निवेदन देणाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना केल्याची माहिती आहे. गत काही दिवसात केरळमध्ये राजकीय कारणात गोहत्या करण्यात आली आणि आक्षेपरित्याने मोर्चा काढला. यामुळे हिंदु संस्कृती व सभ्यतेला धक्का बसला. ज्यांनी गो मातेची हत्या केली त्यांच्या विरुद्ध लवकरात लवकर कार्यवाही करून गोहत्या विरुद्ध कडक कायदा बनवित सुरक्षा देण्याची मागणी करण्यात आली आहे. महाराष्ट्रात गोहत्या विरुद्ध कायद्याची अंमलबजावणी करावी अन्यथा हिन्दु क्रांती सेनेच्यावतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल असा ईशारा देण्यात आला आहे. निवेदन देतेवेळी जिल्हाध्यक्ष राम दुबे, विद्यार्थी नेता तरुण शर्मा, सदस्य तुषार झोड, शहराध्यक्ष गुड्डू दुबे, चेतन काळे, रजत शेंडे, निखील देशपांडे, संकेत टोनपे, प्रज्वल ठाकरे, शांतनु देशमुख, अनिरुद्ध देशपांडे व आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
गोहत्या करणाऱ्यांविरुद्ध कार्यवाही करा
By admin | Published: June 04, 2017 1:04 AM