लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : वाशीम जिल्ह्यातील एका छोट्याशा खेड्यातील एक वृद्ध दाम्पत्याला उपचाराकरिता सेवाग्राम रुग्णालयात आले. वृद्ध महिलेला तपासांती डॉक्टरांनी अॅन्जिओग्राफीची तपासणी सांगितली. त्याकरिता लागणारे पैसेही या दाम्पत्याकडे नसल्यामुळे मंगळसूत्र विकण्याचा निर्णय घेतला होता. ही बाब जिव्हाळा सेवाभावी संस्थेच्या लक्षात येताच संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी या दाम्पत्याला आर्थिक मदत करीत सौभाग्याचं लेणं वाचविलं आणि तपासणीचा मार्गही मोकळा झाला.वाशीम जिल्ह्यातील एका छोट्याशा गावात मोलमजुरी करुन आपला संसाराचा गाडा चालविणाºया वृद्ध दाम्पत्यातील वृद्ध महिलेला आजारपण आले. तपासणीकरिता त्यांनी थेट सेवाग्राम रुग्णालय गाठले. येथे डॉक्टरांनी अॅन्जिओग्राफी करण्यास सांगितले. हे दाम्पत्य अॅन्जिओग्राफी करण्यासाठी गेले असता त्यांना ६ हजार रुपयांचा खर्च सांगितला. इतके पैसे नसल्यामुळे दाम्पत्यापुढे मोठा पेच निर्माण झाला.दिवसभर फिरुनही हातात पैसे आला नसल्याने पतीने त्या वृद्ध महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र विकून तपासणी करण्याचा निर्णय घेतला. याची माहिती जिव्हाळा संस्थेला मिळताच युवकांनी लगेच रुग्णालय गाठून अॅन्जिओग्राफीसाठी ६ हजार रुपयाची मदत केली. सोबतच पुढील उपचाराकरिता सहकार्य करण्यासाठी होकार दर्शविला. त्यामुळे दूरवरुन उपचाराकरिता आलेल्या या वृद्ध दाम्पत्याला मोठा आधार मिळाला.
जिव्हाळ्याच्या मदतीने वाचलं सौभाग्याचं लेणं
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2019 9:28 PM
वाशीम जिल्ह्यातील एका छोट्याशा खेड्यातील एक वृद्ध दाम्पत्याला उपचाराकरिता सेवाग्राम रुग्णालयात आले. वृद्ध महिलेला तपासांती डॉक्टरांनी अॅन्जिओग्राफीची तपासणी सांगितली.
ठळक मुद्देसेवाभावी संस्थेचा पुढाकार : वृद्ध महिलेच्या उपचाराकरिता अर्थसहाय्य