लोकमत न्यूज नेटवर्कहिंगणघाट : शेतकऱ्यांचे कर्ज प्रकरणे त्वरित मंजुर करून कर्ज वाटप करण्यात यावे, बोंडअळीच्या नुकसान भरपाईची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात यावी, नाफेडने खरेदी केलेल्या तूर व चण्याचे चुकारे एका आठवठ्यात देण्यात यावे या मागण्यासाठी गुरूवारी दुपारी उपविभागीय अधिकाऱ्यांच्या कार्यालयात किसान अधिकार अभियानचे प्रमुख प्रविण उपासे यांनी केरोसीन अंगावर घेत अधिकाऱ्यांचे शेतकऱ्यांच्या समस्यांकडे लक्ष वेधले.यावेळी उपस्थित अधिकारी व अन्य कर्मचाऱ्यांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने पुढील अनर्थ टळला.यासंदर्भात प्रवीण उपासे यानी दिलेल्या माहितीनुसार, शेतकºयांच्या विविध समस्येबाबत यापूर्वी १५ जून ला एक निवेदन येथील उपविभागीय अधिकाऱ्यांना दिलेले होते. त्या निवेदनावर प्रशासनाकडून कोणतीही कारवाई न झाल्याने गुरूवारी किसान अधिकार अभियानचे २०० वर कार्यकर्ते प्रवीण उपासे यांच्या नेतृत्वात उप विभागीय कार्यालयात गेले. या ठिकाणी त्यांनी अधिकाऱ्यांना शेतकºयाच्या मागण्यांचे निवेदन दिले.व या मागण्यांकडे शासन लक्ष देत नाही असे म्हणत सोबत आणलेल्या बॉटल मधील केरोसीन प्रवीण उपासे यांच्यासह शेगाव (गोटाड्या) येथील तांनबाजी वैद्य , वाघोली येथील राजू गौळकार या दोन शेतककऱ्यांनी स्वत:च्या अंगावर केरोसीन ओतून घेतले. यावेळी उपस्थित असलेल्या अन्य कर्मचाऱ्यांनी तातडीने हालचाल करीत या तिघांनाही ताब्यात घेतल्याने पुढील अनर्थ टळला. यानंतर उपविभागीय अधिकारी समाधान शेंडगे यांनी सर्व आंदोलकाना चर्चेसाठी आपल्या कार्यालयात बोलावून त्याच्याशी सविस्तर चर्चा केली. त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. शासनाने मंडळ निहाय पीक कर्ज वाटप मेळावा आयोजित केलेला होता. या मेळाव्यात पोलीस पाटील, तलाठी,मंडळ अधिकारी ग्रा.पं.,सचिव तसेच राष्ट्रीयकृत बँकेच्या अधिकाऱ्यांना या आमंत्रित करण्यात आले होते. अर्ज द्या व कर्ज घ्या या मोहिमेनुसार अनेक शेतकऱ्यांना पीक कर्ज उपलब्ध करून देण्यात आले, परंतु ज्या शेतकऱ्यांचे जुने कर्ज तांत्रिक अडचणीमुळे कायम राहिले अशा शेतकऱ्यांची यादी संबंधित बँकेकडून मागितलेली आहे, व तसेच आदोलक शेतकरी नेत्यांना पण अशा शेतकऱ्यांची यादी मागितली आहे. त्यातील त्रुटी तपासून पुढील निर्णय घेण्यात येईल, बोंडअळीच्या नुकसान भरपाईची एक किस्त जमा झालेली असून येत्या एप्रिलपर्र्यत अन्य रक्कम दोन टप्प्यात जमा करण्यात येईल, अशी माहिती उपविभागीय अधिकारी समाधान शेंडगे यांनी आंदोलकांना दिली. नाफेड अंतर्गत खरेदी केलेल्या तूर व चण्याचे चुकाºयांची ७५ % रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झालेली असून उर्वरित रक्कमही लवकरच जमा होईल अशी माहिती सहाय्यक निबंधक मून यांनी दिली. घटनास्थळी पोलीस आलेया आंदोलनात सुरेश पेंदारे, अनिल पुसदेकर,आत्माराम उचले, हेमंत पोटदुखे,मोहन बोसुर,विनोद मोहदरे,श्याम उईके,आशिष डंभारे, वासुदेव पुरके ,नागो गेडाम,नत्थु आत्राम, किशोर झळके, रामचंद्र वैद्य, उमेश डुकरे, बाबूलाल येरेकर नाना वानखेडे, गणेश कोहळे, शुभास विरुटकर आशिष पोटरकर, श्रवण क्षीरसागर, दिलीप पंडित,भास्कर मडावी,गणेश टेकाम, दीपक येते,भूषण देहादराय,आशिष खिलेकर, ललित ठवरी,आदींसह शिक्षकावर निलंबणाची कारवाई करावी, अशी मागणी जोर धरत आहे.
अंगावर रॉकेल घेत वेधले शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे लक्ष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 05, 2018 11:46 PM
शेतकऱ्यांचे कर्ज प्रकरणे त्वरित मंजुर करून कर्ज वाटप करण्यात यावे, बोंडअळीच्या नुकसान भरपाईची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात यावी, नाफेडने खरेदी केलेल्या तूर व चण्याचे चुकारे एका आठवठ्यात देण्यात यावे या मागण्यासाठी गुरूवारी दुपारी उपविभागीय अधिकाऱ्यांच्या कार्यालयात किसान अधिकार अभियानचे प्रमुख प्रविण उपासे यांनी केरोसीन अंगावर घेत ....
ठळक मुद्देहिंगणघाट येथील प्रकार : एसडीओंनी केली आंदोलकांशी चर्चा