शहरं
Join us  
Trending Stories
1
महाशक्तीचा महायुती, मविआच्या नाराजांवर डोळा, नेते फोडणार, १०० जागांची पहिली यादी येणार; बच्चू कडूंची घोषणा 
2
"नव्या जोडप्यांनी 16-16 मुलं जन्माला घालावीत, कारण..."; CM चंद्रबाबूंनंतर, आता स्टॅलिन यांचंही अजब आवाहन
3
ठाकरे गटात अन् काँग्रेसमध्ये किती जागांसाठी वाद? ‘मविआ’तील नेत्याने सगळेच सांगितले
4
काँग्रेस पोटनिवडणुकीतून मागे हटण्याच्या तयारीत? २-५ जागांवरून बिनसले; सपा एकटी लढण्याची शक्यता
5
मदरसे बंद करण्याची NCPCR ची शिफारस; सर्वोच्च न्यायालयाने घेतला मोठा निर्णय
6
ICU मध्ये प्रवेश न दिल्याने भाजपा आमदाराच्या भावाची दादागिरी; कर्मचाऱ्यांना लाथा-बुक्क्यांनी मारहाण
7
परी म्हणू की सुंदरा... तिच्या जबरदस्त खेळाने प्रतिस्पर्धी, तर सौंदर्याने चाहते घायाळ
8
“कोणताही विभाग हा एका पक्षाचा नसतो”; ठाकरे गट-काँग्रेस वादावर संजय राऊत स्पष्टच बोलले
9
करन जोहरच्या 'धर्मा प्रोडक्शन'ला मिळणार अदर पूनावालांचा 'बूस्टर', विकत घेणार अर्धा हिस्सा
10
मी मरता मरता वाचलो! मराठी अभिनेत्याने सांगितला घोडबंदर रस्त्यावरील जीवघेणा प्रसंग, राजकारण्यांना लगावला टोला
11
बँक उघडण्याची वेळ बदलणार; आठवड्यातून २ दिवस सुट्टी मिळणार, काय आहे नवा नियम?
12
मोदी सरकारमध्ये शिवराजसिंह चौहान यांचं वजन वाढलं! पंतप्रधान मोदींनी दिली मोठी जबाबदारी
13
चंद्रकांत पाटलांविरोधात भाजपचे बालवडकर दंड थोपटणार? बाहेरचा उमेदवार पुन्हा लादला, कोथरुडमध्ये बंडखोरीचे वारे
14
'या' हिरो बाईकने विक्रीबाबतचे सर्व रेकॉर्ड मोडले; ही नावे आहेत टॉप-5 मध्ये...
15
दिवाळीपूर्वी NTPC च्या शेअरधारकांसाठी मोठं गिफ्ट! कंपनी देणार Dividend, रेकॉर्ड डेट काय?
16
३ हजार वर्षांची प्राचीनता, कालातीत अखंड परंपरा; दिवाळी नेमकी का साजरी करतात? पाहा, महात्म्य
17
‘गण गण गणात बोते’चा नेमका अर्थ काय? गजानन महाराजांनी मंत्र का दिला? अखंड जपाने मिळेल पुण्य
18
मविआमध्ये 'सांगोला अन् दक्षिण'चा तिढा; महायुतीत 'करमाळा अन् मध्य'मध्ये स्पर्धा
19
आखाती देशांमध्ये १३ हजार लोकांचे नेटवर्क, हवालाद्वारे निधी... पीएफआय संदर्भात ईडीचा मोठा खुलासा
20
धक्कादायक! कोट, स्टेथोस्कोप... महिलेला डॉक्टर होण्याचे 'वेड'; डिग्रीशिवाय करत होती उपचार

तळेगाव, आंजी परिसराला वादळाचा फटका

By admin | Published: May 05, 2017 1:52 AM

जिल्ह्यात बुधवारी रात्री आलेल्या वादळी वाऱ्याचा चांगलाच फटका बसला. काही भागात या वाऱ्यासह पावसाच्या तुरळक सरी कोसळल्या.

आकोली, वायगाव येथे वीज पडून बैल ठार वर्धा : जिल्ह्यात बुधवारी रात्री आलेल्या वादळी वाऱ्याचा चांगलाच फटका बसला. काही भागात या वाऱ्यासह पावसाच्या तुरळक सरी कोसळल्या. या वाऱ्यामुळे आंजी भागातील वीज पुरवठा खंडित झाला. तळेगाव (श्यामजीपंत) परिसरातील शेतकऱ्यांचे कांद्याचे पीक उद्ध्वस्त झाले. वायगाव येथील शेतकऱ्याचे पॉलीहाऊस उद्ध्वस्त झाले. तर वीज कोसळून आकोली व वायगाव येथे वीज पडून बैल ठार झाला. तळेगाव परीसरात रात्रीच्या सुमारास जोरदार वादळी वारा व विजेच्या कडकडासह पाऊस झाला. याचा फटका कांदा उत्पादक शेतकऱ्यांना बसला. येथे शेतात काढुन ठेवलेले कांदाचे पीक पावसाने भिजल्याने शेतकऱ्यांचे नुकसान झाले. तर ग्रामपंचायत कार्यालयासमोर झाडाखाली उभ्या असलेल्या ग्रामपंचायतीच्या मालकीच्या ट्रॅक्टरवर झाड उन्मळुन पडल्याने ट्रॅक्टरचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. या नुकसानीचा सर्व्हे करून शेतकऱ्यांना मदत देण्याची मागणी करण्यात येत आहे.(लोकमत न्यूज नेटवर्क) दोन बैल ठार, गुरे बचावली आकोली- रात्री झालेल्या वादळी पावसात झाडाखाली बांधून असलेल्या बैलावर वीज कोसळली. यात बैल ठार झाला. इतर गुरे दावे तोडून पळाल्याने बचावली. यात शेतकऱ्याचे ४५ हजाराचे नुकसान झाले असून ऐन खरीपाच्या तोंडावर शेतकऱ्याचे कंबरडे मोडले. सदर घटना नजीकच्या खर्डा शिवारात घडली. लक्ष्मण पचारे रा. सुकळी (बाई) यांनी शेतातील झाडाखाली गुरे बांधली होती. आज सकाळी शेतात जावून पाहिले झाड जळालेले दिसले व बैल मृतावस्थेत आढळून आला. तलाठी संजय नासरे यांनी पंचनामा केला असून पशुवैद्यकीय अधिकाऱ्याने शवविच्छेदन केले. या शेतकऱ्याला शासकीय मदत देण्याची मागणी होत आहे. वायगाव लगतच्या तळेगाव (टालाटुले) येथील देवराव बळवंत देशमुख यांच्या शेतात रात्रीच्या सुमारास वीज कोसळली. यात एका बैलाचा मृत्यू झाला. घटनेची माहिती दिल्यानंतर पशुवैद्यकीय अधिकारी, तलाठी यांनी घटनास्थळाला भेट देत पाहणी केली. शेतकऱ्यांच्या झालेल्या या नुकसानीची भरपाई देण्यात यावी अशी मागणी होत आहे.