जीभेला जीभेला झालेली जखम लवकर बरी होते; पण जीभेमुळे झालेली जखम कधीच बरी होत नाही. म्हणून तिळ गुळ घ्या अन् गोड-गोड बोला असे म्हटल्या जाते. मधूर वाणी जीवनामध्ये आनंद, शांती, प्रेम व प्रसन्नता निर्माण करते. त्यामुळे प्रत्येकाने नेहमीच थोड बोलावे; पण गोड बोलले पाहिजे, असा सल्ला लोकमतशी बोलताना प्रा. राजश्री अजय देशमुख यांनी दिला.मन प्रसन्न राहिल्यास अशक्य कामही शक्य होते. जर ओठावर गुळाचा गोडवा आणि हृदयात तिहाची स्रिग्धता असेल तर जग जिंकता येते. धनुष्यातून निघालेला बाण आणि मुखातून निघालेल्या शब्द कधीच परत येत नसतो. त्यामुळे शब्दाने कुणाला घायाळ करण्यापेक्षा शब्दाने कुणाचे सांत्वन करणे केव्हाही चांगलेच आहे. परिणामी, बोलताना शब्दांना धार नसावी तर आधार असला पाहिजे. आज मनुष्यात अहंम खुप वाढला आहे. बोलताना स्वत:ऐवजी समोरच्या व्यक्तीला प्राधान्य दिले तर स्वत:चा अहंकार दुसऱ्यावर लादल्या जात नाही. म्हणून थोडं बोला; पण गोड बोला, असे यानिमित्ताने आपण सांगू इच्छित असल्याचे प्रा. देशमुख म्हणाल्या.जीवन क्षणभंगूर आहे. शेवटच्या क्षणी सोबत काहीच येत नसते. जर चिंरतन काही असेल तर ते म्हणजे दुसºयांच्या आयुष्यात निर्माण केलेला गोडवा. त्यामुळेच वेणूचा मधूर स्वर वाणीतून ओघळू द्या आणि जीवनाला दिव्य सुगंधाने सुमधूर बनवून पूर्णतेच्या मार्गावर अग्रेसर व्हा, असेही प्रा. राजश्री अजय देखमुख यांनी लोकमतशी बोलताना सांगितले.
थोडं बोला; पण नेहमी गोड बोला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2019 9:55 PM
जीभेला जीभेला झालेली जखम लवकर बरी होते; पण जीभेमुळे झालेली जखम कधीच बरी होत नाही. म्हणून तिळ गुळ घ्या अन् गोड-गोड बोला असे म्हटल्या जाते. मधूर वाणी जीवनामध्ये आनंद, शांती, प्रेम व प्रसन्नता निर्माण करते. त्यामुळे प्रत्येकाने नेहमीच थोड बोलावे; पण गोड बोलले पाहिजे, असा सल्ला लोकमतशी बोलताना प्रा. राजश्री अजय देशमुख यांनी दिला.
ठळक मुद्देराजश्री देशमुख यांचा सल्ला...