येथील ग्रा.पं. संरक्षण भिंतीकरिता ८ लाख रु. व स्मशानभूमी सौंदर्यीकरण करण्याकरिता २० लाख रुपयांचा निधी देण्यात आला आहे. नागरिकांच्या सोईकरिता गावात हायमास्ट लावण्यात आला.
जयपूर येथील शेतकऱ्यांच्या आवागमन करण्यात अडचण येत असल्याने त्यांनी पुलाची मागणी केली होती. आ.डॉ. पंकज भोयर यांनी ६ लाख ५० हजार रुपयांचा निधी मंजूर केला होता. पुलाचे लोकार्पण आ.डॉ. पंकज भोयर यांच्या हस्ते या वेळी करण्यात आले. या प्रसंगी आ.डॉ. पंकज भोयर, सेलू पंचायत समितीचे सभापती अशोक मुडे, उपसभापती नरेश तलवारे, हमदापूर सर्कलचे जिल्हा पं. सदस्य किशोर शेंडे, भाजपाचे सेलू तालुकाध्यक्ष अशोक कलोडे, पं.स. सदस्य प्रणिता भुसारी. श. नलिनी बेले, तळोदीच्या सरपंच संगीता तोतडे, उपसरपंच बबिता नेहारे. श. जयपूरच्या सरपंच आशा गोडघाटे. शत्रुघन हजारे, गटविकास अधिकारी एस.पी. पडघम, ग्रा.पं. सदस्य राजेंद्र गोहणे, विनोद आदमणे, साधना धाबरडे, वैशाली भाबडे, राजेंद्र गोहणे, ग्रामसेवक करपाते, जयपूर येथील सरपंच आशा गोडघाटे, ग्रा.पं. सदस्य सविता वाघाडे, राजकुमार जंगले, राहुल भांदककर, संगीता बावणे, चंदा परचाके, पानतावणे, सुंदर करडे, विजय जंगले, मंगेश बरडे, दिलीप नाखले, गंगाधर मुडे व ग्रामस्थ उपस्थित होते. संचालन पोलीस पाटील विजय कोल्हे यांनी तर आभार सरपंच संगीता तोतडे यांनी मानले.
060921\img-20210906-wa0124.jpg
भूमिपूजन सोहळा