लोकमत न्यूज नेटवर्कआष्टी (शहीद) : ग्रामीण भागातील विद्यार्थी खेळाच्या प्रवाहात आणण्यासाठी शासनाने क्रीडांगण उपलब्ध करून दिले. लाखो रुपये खर्च करून उभारलेल्या इमारती व क्रीडांगण सोयी-सुविधांपासून वंचित आहे. येथे व्यायामशाळेत असंख्य तरूण व्यायामासाठी येतात. त्यांना कुठल्याच सुविधा नाही. प्रती महिना शुल्क आकारून वसूल केले जाते. मग, सुविधा का नाही, असा प्रश्न युवकांनी केला आहे. याप्रकरणी जिल्हा क्रीडा अधिकाºयांना निवेदन देण्यात आले आहे.तालुका क्रीडा संकुलामध्ये कबड्डी, क्रिकेट, बास्केटबॉल, बॅडमिंटन खेळण्यासाठी वेगवेगळे युनिट उभारण्यात आले. सोबतच व्यायामशाळा उभारून त्यामध्ये साहित्य उपलब्ध करून देण्यात आले. येथे व्यायामाकरिता येणाºया तरूणांकडून प्रती महिना १०० रुपये शुल्क आकारले जाते. आजच्या स्थितीत येथे एकूण ३५ युवक प्रत्येक महिन्याला एवढे रुपये जमा करतात. मात्र त्यांना कुठल्याही सुविधा करण्यात आल्या नाहीत.क्रीडांगणाच्या सभोवताल असलेले जाळीचे कुंपण तुटलेले आहे. जाळ्या चोरीला गेल्या आहेत. शौचालयाची उभारणी केली; पण त्याला कुलूप लावण्यात आले. यामुळे युवकांकडून लघुशंकेकरिता बाहेर खुल्या जागेचा वापर केला जातो. सभोवताल घाणीचे साम्राज्य पसरले आहे. व्यायामशाळेत फॅन, लाईट, आरशांची व्यवस्था नाही. पिण्याचे पाणी नाही. साफसफाई केली जात नाही. रंगरंगोटीदेखील खराब झाली; पण दुरूस्ती केली नाही. वीजपुरवठा खंडित झाल्यावर इनव्हर्टरची सुविधा नाही. लांब उडी मारण्यासाठी खड्डा खोदला; पण अद्याप काम झालेले नाही.सध्या व्यायामशाळा एक खासगी व्यक्ती सांभाळत आहे. या व्यक्तीकडून मनमानी करीत तरुणांना व्यायामासाठी केवळ २ तास इतकाच वेळ उपलब्ध असल्याचे सांगितले जाते. शासकीय व्यायामशाळा दिवसभर सुरू ठेवणे बंधनकारक असताना मनमानी कारभार सुरू असल्याच्या बाबीकडे युवकांनी लक्ष वेधले आहे. सदर खासगी व्यक्तीला हे अधिकार दिले कुणी, यावर कारवाईची मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.आष्टी तालुका क्रीडा संकुलाचे काम क्रीडा अधिकारी नाकट यांच्याकडे आहे. खासगी व्यक्ती ठेवता येत नाही. त्याला तात्काळ बंद करून व्यायामशाळा दिवसभर सुरू ठेवायला सांगतो. दुरुस्तीसाठी प्रस्ताव पाठविलेला आहे.- एन.एम. तारळकर, जिल्हा क्रीडा अधिकारी, वर्धा.
तालुका क्रीडा संकुल देखभालीअभावी वाºयावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 02, 2017 10:33 PM
ग्रामीण भागातील विद्यार्थी खेळाच्या प्रवाहात आणण्यासाठी शासनाने क्रीडांगण उपलब्ध करून दिले.
ठळक मुद्देव्यायामशाळा सोयी-सुविधांपासून वंचित : शुल्क आकारूनही आवश्यक सुविधा नाही